ETV Bharat / state

Mumbai Crime News: उशीच्या सहाय्याने केला मालकिणीचा खून; मोलकरणीच्या प्रियकरासह मुलाला अटक - maid killed owner with help of two accomplices

जेष्ठ महिला नागरिकेच्या हत्येतील आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३०२, ३९७, १२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरीण शबनम परवीन शेख व तिच्यासोबत असणारा शहजाद शेख, मोहम्मद शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना कोर्टात हजर केले. तेव्हा त्यांना 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Mumbai Crime News
मोलकरीणीने केला मालकीणीचा खून
author img

By

Published : Apr 23, 2023, 7:04 AM IST

मुंबई : 20 एप्रिलला जेष्ठ महिला नागरीक (वय ६९ वर्ष) ऑर्लेम, मालाड पश्चिम या त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये पडून मयत झाल्याबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली. तेव्हा त्या बेशुध्द अवस्थेत पडलेल्या आढळल्या. त्यांना तात्काळ शताब्दी हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले. त्याबाबत मालाड पोलीस ठाण्यात अपमृत्यु कलम १७४ सीआरपीसी अन्वये दाखल करण्यात आला होता.

महिलेचा मृत्यू संशयास्पद : तांत्रिक चौकशीत मयत महिलेच्या घरात काम करणारी अपंग महिला व एक मुलगा घरातुन बाहेर पडताना आणि त्याचवेळी कोवीड मास्क व टोपी घातलेला एक वयस्कर इसम घरामध्ये जाताना दिसला. त्यामुळे महिलेचा मृत्यू पोलिसांना संशयास्पद वाटत होता. मृत महिलेचा नातू निल गोपाल रायलोबे (वय २६ वर्षे) याने घरातील पाहणी केली. तेव्ही त्याला आजीचे २ मोबाईल, तिचे घड्याळ आणि आजीच्या गळ्यातील सोनसाखळी या वस्तु चोरीस गेल्याचे आढळले. त्यामुळे त्याच्या तक्रारीवरून मालाड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३०२, ३९७, १२०(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

तांत्रीक तपास : मोलकरीण शबनम परवीन शेख व तिच्यासोबत असणारा शहजाद शेख यांच्याकडे कसून तपास केला. तेव्हा त्यांना मास्क परिधान करून मृत महिलेच्या घरात प्रवेश करणारा इसम हा मोहम्मद उमेर शेख (वय ७१ वर्षे) असल्याबाबत माहिती मिळाली. आरोपी मोहम्मद उमेर शेख यांचा तांत्रीक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे ता. वसई, जि. पालघर येथून ताब्यात घेवून मोहम्मद उमेर शेख याला मालाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

तीन आरोपींना अटक : शबनम शेख, शहजाद शेख व मोहम्मद उमेर शेख यांना समोरासमोर बसवून त्यांच्याकडे तपास केला. तेव्हा त्यांना मृत महिलेला कट रचुन चोरीच्या उद्देशाने उशीच्या सहाय्याने गळा दाबून जीवे ठार मारल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक तपास चालू आहे. या गुन्ह्यात एकुण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजेच मालाड पोलीसांनी हा गुन्हा 24 तासात उघड केला आहे.

हेही वाचा : Delhi Crime News : प्रेयसी टाकत होती लग्नासाठी दबाव, पिच्छा सोडवण्यासाठी प्रियकराने केली तिची गळा दाबून हत्या!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.