ETV Bharat / state

निवडणुकीसाठी माहिम विधानसभा मतदारसंघातील तयारी पूर्ण; दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था

माहिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना आज सकाळीच ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन तसेच निवडणुकीसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. सर्व साहित्य घेऊन कर्मचारी विविध मतदान केंद्रावर जाणार आहेत. मतदान केंद्रावर जाण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

माहीम विधानसभा मतदार संघ
author img

By

Published : Oct 20, 2019, 4:42 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीनिमित्त उद्या मतदान होणार आहे. मतदान सुरळीतपणे, मुक्तपणे व्हावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आज सकाळपासूनच मुख्य निवडणूक कार्यालयात लगबग दिसून आली. मतदान काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, माहिम मतदार संघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

माहीम विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

माहिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना आज सकाळीच ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन तसेच निवडणुकीसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. सर्व साहित्य घेऊन कर्मचारी विविध मतदान केंद्रावर जाणार आहेत. मतदान केंद्रावर जाण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ४० हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची निवडणूक कार्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्यांची जबाबदारी पी.आर.ओ आणि शिपाई यांच्याजवळ असणार आहे.

माहिम विधानसभा मतदारसंघातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काही मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या मतदारसंघात २४९ पोलिंग स्टेशन आहेत. यापैकी २७ केंद्रे ही संवेदनशील आहेत आणि त्यापैकी २० केंद्रात वेब कास्टिंग करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पावसाचे वातावरण पाहता मतदान केंद्रात पावसामुळे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती माहिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांनी दिली.

हेही वाचा- घाटकोपर पश्चिम विधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज

Intro:मुंबई ।
विधानसभा निवडणूकनिम्मित उद्या मतदान होणार आहे. होणारे मतदान सुरळीतपणे मुक्तपणे व्हावे, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळपासूनच मुख्य निवडणूक कार्यालयात लगबग दिसून आली.Body:माहीम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना आज सकाळीच ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन तसेच निवडणुकीसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. सर्व साहित्य घेऊन हे सर्व कर्मचारी विविध मतदान केंद्रावर जाणार आहेत. मतदान केंद्रावर जाण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. चाळीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी या यांची नेमणूक करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीसाठी लागणारे साहित्य यांची जबाबदारी पीआरओ आणि शिपाई यांच्याजवळ असणार आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काही मतकेंद्रात सखी मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या मतदारसंघात 249 पॉलिग स्टेशन आहेत. यापैकी 27 केंद्र ही संवेदनशील आहेत. आणि त्यापैकी 20 केंद्रात वेब कास्टिंग करण्यात आली आहे. दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पावसाचे वातावरण पाहता मतदान केंद्रात पावसामुळे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. असे माहीम विधान सभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांनी सांगितले.

बाईट

निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारलेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.