मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं जागा वाटपाबाबत सातत्यानं बैठका होत आहेत. याबाबत महाविकास आघाडीचा नेत्यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित करण्यात आला आहे. मात्र, हा फॉर्मुला मागेपुढे होऊ शकतो, अशी माहिती प्रवक्ते काका कुलकर्णी यांनी दिली आहे.
काय आहे फॉर्मुला? : 2019 चा लोकसभा निवडणुकी ज्या पक्षांनी आपल्या जागा निवडून आणल्या होत्या, त्याच जागा त्या पक्षाला देण्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 22 जागा देण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या वाट्याला राज्यात 14 जागा येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर लढण्याची शक्यता आहे. दोन जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात येणार आहे, मात्र वंचित बहुजन आघाडीला शिवसेनेच्या कोट्यातून जागा द्यायचा का? अशा प्रश्न उपस्थित होत आहे. तसं झाल्यास शिवसेना 20 जागा तसंच वंचित दोन जागा असं सूत्र ठरण्याची शक्यता आहे. या दोन जागांपैकी एखादी जागा वंचितला, दुसरी जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरीला पक्षाला देण्याबाबतही विचार सुरू आहे.
एकदाचे काय ते ठरवा : महाविकास आघाडीचं जागावाटप झालं, अशी चर्चा असतानाच वंचित बहुजन आघाडीनं मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडीला आघाडीसोबत महाविकास आघाडीला जुळवून घ्यायचं नाही, हे सुरुवातीपासूनच दिसत आहे. म्हणूनच त्यांनी आता केवळ 44 जागांवर चर्चा केली आहे. वंचितचा विचार करायचा नसेल, तर 48 जागा जाहीर करूनच टाका, असं वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले. या संदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या 44 जागांचं वाटप झाल्याच्या बातम्या पाहण्यात आल्या. चार जागा शिल्लक असून त्यावर चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीला आमचं सांगणे आहे की, सुरुवातीपासून तुम्हाला आमच्या सोबत जुळवून घ्यायचं नाही. हे आम्हाला माहिती आहे. ते लोकांनाही दिसून आलेलं आहे. त्यामुळं आता उगाच वेड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाण्यात अर्थ नाही.
हेही वाचा -