ETV Bharat / state

India Aghadi : इंडिया आघाडीच्या पूर्वतयारीसाठी महाविकास आघाडीची 23 ऑगस्टला अंतिम बैठक

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपा विरोधात इंडिया आघाडीची स्थापन केली आहे. इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीसाठी आज मुंबईत महाविकास आघाडीने बैठकीचे आयोजन केले होते.

India Aghadi
India Aghadi
author img

By

Published : Aug 20, 2023, 10:43 PM IST

Updated : Aug 20, 2023, 10:52 PM IST

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व लहान-मोठे पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केलीय. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे नियोजनाबाबत बैठकीचे सत्र सुरू आहे. बैठकीच्या नियोजनाबाबत रविवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयाचा आढावा घेण्यात आला आहे.

बैठकांचे सत्र सुरू : मुंबईतील होणाऱ्या बैठकीच्या तयारीसाठी आज काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला. ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठकीतील कामांच्या विभागणीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच १ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीसाठीच्या तयारीला उद्यापासून सुरुवात केली जाणार आहे. इंडिया आघाडीची बैठक दोन दिवसांची असल्याने सर्व मोठे नेते 31 ऑगस्ट रोजी मुंबईत येणार आहेत. इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांची मुंबईतील पंचतारांकित ग्रँड हयात हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक 1 सप्टेंबर रोजी ग्रँड हयातमध्येच होणार आहे.

इंडिया आघाडीची इंडिया मुंबईत बैठक : आघाडीची तिसरी बैठक मुंबईत ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. बैठक आयोजनाची मुख्य जबाबदारी ठाकरे गटाकडे आहे. तर मविआ मधील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष तिघेही एकत्रितपणे बैठकीच्या आयोजनाच्या तयारीला लागले आहे.

अंतिम बैठक 23 ऑगस्ट : इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पुन्हा एकदा 23 ऑगस्टला होणार आहे. 23 ऑगस्टच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांवर अंतिम जबाबदारी वाटून देण्यात येणार आहे.

बैठकीला नेते उपस्थित : या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी मंत्री, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र वर्मा, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे आदि उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar on Ajit Pawar : अशा भेकड लोकांना जनताच जागा दाखवेल: शरद पवारांचा बंडखोरांवर हल्लाबोल
  2. Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा 'Formula' ठरला? सतेज पाटील म्हणाले...
  3. CWC : कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाची वर्णी?

Last Updated : Aug 20, 2023, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.