ETV Bharat / state

MVA Maha Morcha : राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीचा 'एल्गार'; महामोर्चाची तयारी पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) वादग्रस्त केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात ( Governor Bhagat Singh Koshyari controversial statement ) राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारकडून आज (17 डिसेंबर) रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल महामोर्चाचे ( Maha Vikas Aghadi Maha Morcha ) आयोजन करण्यात आले आहे. "महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल" या घोषवाक्याखाली महाविकास आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. या मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिली आहे.

MORCHA
Maha Vikas Aghadi Maha Morcha
author img

By

Published : Dec 16, 2022, 10:40 PM IST

Updated : Dec 16, 2022, 10:47 PM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari controversial statement ) यांच्यासह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीचा हल्लाबोल महामोर्चा ( Mahavikas Aghadi Maha Morcha) शनिवार 17 डिसेंबरला होणार आहे. परवानगी मिळो या ना मिळो हा मोर्चा निघणारच, असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. महाराष्ट्र भरातून कार्यकर्ते या मोर्चासाठी सामील होतील याची खबरदारी महाविकास आघाडीने घेतली आहे. परवानगीच्या प्रतिक्षेत असलेल्या या मेळाव्याला परवानगी मिळाली आहे.

महामोर्चाला येथून सुरूवात : महाविकास आघाडीकडून उद्या 17 डिसेंबरला (State Government) राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल महामोर्चाचे आयोजन केले आहे. भायखळा येथे असलेल्या रिचर्ड अँड कृडास मिलच्या येथून या मोर्चाला सकाळी १० वाजता सुरुवात होईल. तिथून सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत चालत या मोर्चाची सुरुवात भायखळा येथून सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असलेल्या टाइम्स ऑफ इंडिया इमारती जवळ हा मोर्चा थांबणार आहे. मात्र या ठिकाणीही मंच बांधण्याची परवानगी महाविकास आघाडीला मिळालेली नाही. एखाद्या मोठ्या ट्रकवर येथे मोर्चा संपल्यानंतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील. हे अंतर जवळपास साडेचार किलोमीटर एवढे आहे. आधी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान भायखळा येथून ते आझाद मैदानी पर्यंत हा मोर्चा निघणार होता. मात्र तीन मोठ्या पक्षांचे कार्यकर्ते नेते यासोबतच इतर लहानपक्षचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आल्यास मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होऊ शकते.

महाविकास आघाडी पत्रकार परिषद

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची तयारी: महाविकास आघाडीचा हल्लाबोल महामोर्चा ही यशस्वी व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत नाही. मात्र ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मोर्चासाठी सामील होतील, याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. जवळपास एक लाख कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील. याबाबत नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस कडून आखले जातेय. ज्या भागामध्ये ग्रामपंचायत निवडणुका नाहीत, त्या भागातील सर्व कार्यकर्त्यांना आणण्यासाठी चे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस करत असून पश्चिम महाराष्ट्र या भागातील जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख या सर्वांवर कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी दिली आहे. स्वतः अजित पवार जातीने या सर्व नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. तसेच या मोर्चा बाबत नियोजनावर देखील अजित पवार यांनी लक्ष ठेवला आहे. यासोबतच कायदेशीर परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा अजित पवार करत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष: ठाकरे कथा मुंबईत आणि उपनगरामध्ये मजबूत पक्ष मानला जातो. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील जास्तीत जास्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते स्थानिक नेते संपर्क प्रमुख गटप्रमुख या मोर्चाला उपस्थित राहतील. यासोबतच आपल्या संपर्कातील कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त या मोर्चात सामील करून घेतील. याबाबतचे नियोजन ठाकरे गटांकडून आखण्यात आला आहे. यासाठी अनिल परब सुभाष देसाई अनिल देसाई या नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मुंबईत असलेल्या ठाकरे गटांच्या शाखातून या मोर्चाच्या नियोजनासाठी बैठका घेतल्या जात असून जास्तीत जास्त कार्यकर्ते आणण्यासाठीचे नियोजन आठवड्यापासूनच सुरू झाला आहे. काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील काँग्रेस नेते वर्षा गायकवाड असलम शेख भाई जगताप चरण सिंह सप्रा यांच्यावर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आयोजनाची जबाबदारी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. अधिकाअधिक काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते या मोर्चासाठी सामील व्हावे, यासाठीच नियोजन आणि बैठका काँग्रेस पक्षात देखील सुरू झाल्या आहेत.

POLICE
पोलीस परवानगी पत्र

अद्याप मोर्चाला परवानगी नाही: महाविकास आघाडीच्या हल्लाबोल महामोर्चासाठी अद्यापही पोलीस परवानगी मिळालेली नाही. मात्र आमच्या मोर्चाला परवानगी मिळाली नाही तरीदेखील आम्ही मोर्चा काढणारच असा, इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. विरोधी पक्षाच्या अशा महामोर्चांना सत्ताधारी पक्ष कधीही परवानगी देत नाही. मात्र हा मोर्चा शांततेच्या मार्गाने निघणार असून, या मोर्चामध्ये कोणतेही असवैधानिक कार्य होणार नाही. याची काळजी तिन्ही पक्षाचे नेते घेणार असल्याचं ही अजित पवार यांनी स्पष्ट केला आहे.

हे नेते होणार मोर्चामध्ये सामील: तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते या महामोर्चात सामील होणार आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव, ठाकरे नेते आदित्य ठाकरे सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, अंबादास दानवे, अरविंद सावंत, संजय राऊत यांच्यासह इतर नेते देखील सामील होणार आहेत. तर तेथेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुप्रिया सुळे छगन भुजबळ, महेश तपासे यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. मात्र मोर्चाला शरद पवार याची हजेरी असेल का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर तिथेच काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, हे नेते उपस्थित असणार आहेत. यासोबतच समाजवादी पक्षाचे अबू आजमी, रईस शेख सी पी आय पक्षाचे प्रकाश रेड्डी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते देखील या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत.

हे आहेत महामोर्चाचे मुख्य मुद्दे:

  • राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
  • भाजप नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांबाबत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध
  • कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी विधानांचा निषेध
  • सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान.
  • सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा महिला तसेच इतर नेत्यांबाबत केलेल्या बेताल वक्तव्यांचा निषेध
  • महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याबद्दल निषेध

Last Updated : Dec 16, 2022, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.