ETV Bharat / state

Sant Dnyaneshwar Maharaj : महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न संत ज्ञानेश्वर महाराज

author img

By

Published : Nov 5, 2022, 7:38 PM IST

महाराष्ट्रातील प्रत्येक कुटूंबातील ओठांवर ज्यांचे नाव आहे, असे संत ज्ञानेश्वर महाराजांचा (Maharshtra sant dnyaneshwar maharaj) जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात झाला. ज्ञानेश्वरी सारखी अद्भुत ग्रंथ संपदा देणाऱ्या ज्ञानेश्वरांना पिढ्यान पिढ्या सन्मानाने आठवणीत ठेवले जाईल. जाणुन घेऊया त्यांच्या जीवनप्रवासा विषयी. Sant Dnyaneshwar Maharaj

Sant Dnyaneshwar Maharaj
संत ज्ञानेश्वर महाराज

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाराष्ट्राचे (Maharshtra sant dnyaneshwar maharaj) एक अनमोल रत्न ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील परमार्थाच्या क्षेत्रातील न भूतो न भविष्यति असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर. Sant Dnyaneshwar Maharaj

महाराजांचे कुटूंब : ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला.

महाराजांचे बालपण : आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले.

चौघा भावंडांची हेटाळणी : त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे, असे ब्राह्मणांनी सांगितले होते.

पैठणला विद्वत्ता सिद्ध केली : आपली मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे, यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिल्या गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

परिवर्तनाची दिशा मिळाली : फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना (Wrote dnyaneshwari Granth) केली. देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या रचना मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात. संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे.

मराठीत तत्त्वज्ञानाविषयक विचार : त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात, असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

ज्ञानेश्वरीची शब्दरचना : संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत ज्ञानेश्वरीची शब्दरचना केली. संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म – वारकरी संप्रदायाचा प्रसार (Spread Varkari Sect) केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने आहेत. भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

उल्लेखनीय चमत्कार : ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत. ज्यामुळे जगाला संत ज्ञानेश्वरांची ओळख पटली. त्यापैकी एक म्हणजे त्यांचे शिष्य सच्चिदानंद यांच्या प्रेताचे पुनरुज्जीवन होय. आणि दुसरा महत्वाचा चमत्कार म्हणजे रेड्या कडून करवुन घेतलेले वेद पठन हेय. वयाच्या १२ व्या वर्षी, ज्ञानेश्वर आपल्या गरीब आणि बहिष्कृत भावंडांसोबत पैठणच्या पुजाऱ्यांकडे दयेची याचना करण्यासाठी पैठणला गेले. तेथे त्यांचा अपमान व विटंबना करण्यात आली. या मुलांना गुंडगिरीचा त्रास होत असताना, जवळच्या रस्त्यावर एक माणूस रेड्याला हिंसकपणे मारहाण करत होता. यामध्ये तो जखमी रेडा रडून रडून खाली कोसळला.

रेड्याचे वेद पठन: ज्ञानेश्वरांनी त्या माणसाला रेड्याच्या काळजीपोटी तसे न करण्यास सांगितले. एका पशूबद्दल अतिकाळजी असण्यासाठी आणि वेदांच्या शिकवणींबद्दल बेफिकीर असल्यासाठी ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांची थट्टा केली. ज्ञानेश्वरांनी प्रतिवाद केला की, खुद्दवेदांनीच सर्वच जीवन पवित्र आणि ब्रह्माचे प्रकटीकरण मानले आहे. आणि प्राण्यांनाही वेद शिकता आले पाहीजे, असे संतप्त पुरोहितांनी निदर्शनास आणून दिले. निश्चल ज्ञानेश्वरांनी मग रेड्याच्या कपाळावर हात ठेवला आणि वेद पठन केले. त्यानंतर तो रेडा खोल आवाजात खरोखरच वेद म्हणू लागला.

चांगदेवांचे आव्हान : आणखी एका चमत्कारात म्हणजे, ज्ञानेश्वरांना कुशल योगी असलेल्या चांगदेवांनी आव्हान दिले होते. चांगदेवांनी आपल्या जादुई सामर्थ्याने वाघावर स्वार होऊन पराक्रम केला होता. त्यानंतर चालत्या भिंतीवर स्वार होऊन ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना नम्र बनवले. ज्ञानेश्वरांनी ६५ श्लोकांमध्ये चांगदेव पासष्टी या नावाने चांगदेवांना सल्ला दिला. नंतर चांगदेव हे ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांचे शिष्य बनले.

समाजात सम्मिलित केले : ज्ञानेश्वरांसह संपुर्ण कुटूंब भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी झाले. त्यांनी विचार केला की 'आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे.' शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.

ज्ञानेश्वरांचे कार्य : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

समकालीन संत : ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव लिहिल्यानंतर ही भावंडे पंढरपूरला गेली. तिथे त्यांची भेट नामदेवांशी झाली, जे ज्ञानेश्वरांचे जवळचे मित्र बनले. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि तिथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी संप्रदायात दीक्षा दिली. ज्ञानेश्वरांच्या अभंग नावाच्या भक्ती रचना याच काळात रचल्या गेल्या असे मानले जाते. पंढरपूरला परतल्यावर, ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना मेजवानी देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये बहिरात यांच्यानुसार, तेथे 'गोरोबा कुंभार, सावता माळी, अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि पारिसा (भागवत ब्राह्मण)' यांसारखे अनेक समकालीन संत सहभागी झाले होते, असे सांगितले जाते.

संजीवन समाधी : संत ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी (Alandi) येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली. इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे. Sant Dnyaneshwar Maharaj

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.