ETV Bharat / state

कोरोनाचा फटका: राज्यातील स्थायी व इतर समित्यांच्या निवडणुकांना सरकारची स्थगिती - latest corona news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एप्रिलच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतमधील स्थायी, विषय समित्या व सदस्य निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Mar 28, 2020, 10:40 AM IST

मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि मुंबईत आढळून येत आहेत. देशभरातही रुग्णांची संख्या मोठी आहे. नागरिकांनी गर्दी करू नये आणि विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतमधील स्थायी, विषय समित्या व सदस्य निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

राज्याच्या नगर विकास विभागाने तसे पत्र सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे महाराष्ट्रात 159 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 86 रुग्ण मुंबई आणि परिसरातील आहेत. देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली. त्यानंतरही नागरिक रस्त्यावर उतरत असल्याने कर्फ्यू लावण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन केले आहे. 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन असून यापुढेही कोरोनावर नियंत्रण मिळवता आले नाही तर हा लॉकडाऊन आणखी काही काळ वाढवला जाऊ शकतो.

परिपत्रक
परिपत्रक

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमधील स्थायी समिती व इतर समित्यांच्या निवडणुका दरवर्षी एप्रिलमध्ये होतात. देशात कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यात आरोग्य विषयक आणीबाणी असल्याने तसेच कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुकांना स्थगिती असेल, असे राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.