मुंबई : विदेशात कोरोना रूग्णसंख्येत वाढ ( Corona Patients Increase ) झाल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ब्राझील, चीन कोरिया यासारख्या निवडक देशांमधील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याचे देखील विमानतळावर सुरू केले गेले. मात्र राज्यामधील आरोग्यवस्था कोरोना महामारिच्या लाटेला थोपविण्यास सक्षम ( Public health system not capable ) आहे का यावर आरोग्य तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ( Maharastra Corona Update )
आरोग्यव्यवस्थेच्या आढाव्यासाठी मॉकड्रिल : पुढील काही दिवसात कोरोना विषाणूचा नवीन अवतार देशात जर झाला तर राज्याची आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे. याचा विचार आधीच करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगानेच केंद्र शासनाचे आरोग्य विभागाचे सचिव यांनी महत्त्वाचे पत्र राज्यांना पाठविले आहे. आणि आता राज्यांमध्ये आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती भक्कम आहे; कशी सक्षम आहे. या संपूर्ण महामारीला पुरे पडण्यास किती समर्थपणे उभी आहे. याचा आढावा देखील या मॉकड्रिल दिवशी म्हणजे 27 डिसेंबर 2022 रोजी घेतला जाणार आहे. तत्पूर्वी राज्यातील सार्वजनिक आरोग्याची स्थिती बाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.
देशात नव्या व्हेरियंटचे चार रूग्ण : भारतात आतापर्यंत कोविडच्या बीएफ ७ विषाणूचे केवळ चारच रुग्ण आहे आणि हे रुग्ण जुलै 2022 पासून तर आजपर्यंत केवळ चारच आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील प्रमुख निवडक डॉक्टरांशी झालेल्या बैठकीत सांगितले. चीनमध्ये कोरोना महामारी पसरण्याचे नेमके कारण काय या डॉक्टरांच्या प्रश्नानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी उत्तरा दाखल सांगितले की, चीनमध्ये वय 60 पेक्षा कमी असणारे 40 टक्के लोक ज्यांचे लसीकरण झाले नाही आहे. त्यामुळे तेथे बाधितांचे प्रमाण असंख्य झालेले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे हे देखील या बैठकीमध्ये हजर होते. त्यांनी ह्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे ईटीव्ही सोबत संवादात मांडले.
राज्यात रुग्ण स्थिती : कालपर्यंत महाराष्ट्र शासनाकडे नोंदल्या गेलेल्या माहितीनुसार कोरोनाचे 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात आज पर्यंत एकूण 79,87,948 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 32 नवीनरुग्णाांचे निदान झालेल्या असून राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यू दराचे प्रमाण 1.82 टक्के इतके आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 8,58,61,429 प्रयोगशाळा नमनुयाांपैकी 81,36,511,09.48 टक्के इतके नमनुे पॉझिटिव्ह आले आहेत.
रूग्णांची काल पर्यंतची स्थिती : महाराष्ट्र राज्यात 25 डिसेंबर रात्री बारा वाजेपर्यंत 148 कोविड रुग्णाचे निदान झालेले आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक संख्या 50 ठाणे जिल्ह्यात 10 तर पुणे जिल्ह्यात 42 रुग्ण आणि अकोला येथे 15 कोविड रुग्णांची नोंद झालेली आहे. दोन अंकी कोविड सक्रिय रुग्ण संख्या आलेले कमी जिल्हे आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही कोविड रुग्ण ऍक्टिव्ह नाही तर काही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन अशी संख्या आहे. ह्या बाबत नर्सेस संघटनेच्या कार्यकर्त्या त्रिशिला कांबळे यांनी सांगितले की, यात जर वाढ झाली तर मनुष्यबळ पुरेसे नाही. सरकार पाहिजे तेवढे मनुष्यबळ वेळीच पुरवत नाही विविध साधनांची पूर्तता वेळीच होत नाही मग उद्या हाहाकार उडाल्यास नवल कसले.
राज्यातील आरोग्ययंत्रणेची स्थिती : कोरोना बाधित झालेले रुग्ण स्थिती आज राज्यात 32 नवीन रुग्णाांची नोंद झाली. आता पर्यंत राज्यातील करोना बाधित रुग्णाांची एकूण सांख्या 81,36,511 झाली आहे. तमिळनाडू राज्यात 70 हजार सुसज्ज बेड तर महाराष्ट्रात केवळ 22 हजार सुसज्ज बेड आहेत यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय जन आरोग्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉक्टर अभय शुक्ला यांनी ई टीव्ही भारत सोबत बातचीत करताना राज्यातील विदारक स्थिती मांडली. ते म्हणाले की, "दिल्ली या राज्यामध्ये एकूण 27000 सुसज्ज बेड आहेत असे हॉस्पिटल आहेत. खरे तर दिल्ली हे एक मोठे शहर आहे आणि ते केंद्रशासित राज्य देखील आहे. मात्र दिल्लीमध्ये सत्तावीस हजार सुसज्ज बेड असले आरोग्य यंत्रणा आहेत. दिल्लीच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील आकडेवारी पाहता धक्कादायक बाब उघड होते. राज्यात केवळ 22000 फक्त बेड असलेले हॉस्पिटल आहेत. दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्र अजूनही सहा हजार बेडने मागे आहे. यामुळेच मुंबई शहर असो व पुणे किंवा नागपूर औरंगाबाद, नाशिक, जळगाव धुळे सोलापूर कोविडचे रुग्ण किंवा कोविड सारखेच लक्षण असलेले रुग्ण किंवा इतर साथीचे आजार यामध्ये गंभीर स्थिती असताना सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णास बेड मिळत नाही. असे विश्लेषण जन स्वास्थ्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉक्टर अभय शुकला यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद करताना मांडले. तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि आंध्र या काही राज्यांमध्ये तर 70 हजार अशी सरकारी बेडू उपलब्ध आहेत की जिथे मोफत उपचार होऊ शकतो म्हणजे ही राज्य महाराष्ट्राच्या तुलनेने प्रगतिशील आहे. हे आपल्याला या संदर्भात म्हणता येतं अशी टिपणी देखील डॉक्टर अभय शुक्ला यांनी केली. आणि जन स्वास्थ अभियान याच सार्वजनिक आरोग्याच्या सुधारण्यासाठी महाराष्ट्र आणि देशाच्या पातळीवर हा मुद्दा लावून धरत आहे. जनतेमध्ये सातत्याने ते पाठपुरावा करत आहेत."
अपुर्ण मनुष्यबळाती स्थिती : तर मार्ड संघटनेचे डॉ. प्रवीण ढगे यांनी सांगितले की, शासनाने कोविडच्या महामारीच्या काळामध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारावर कोणत्याही शहाणपण घेतल्याचे अद्यापही जनतेला दिसत नाही. अद्यापही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था प्रचंड अस्वस्थ आणि मरणपंथाला लागल्याचे अनुभवत आहे. बंदपत्रिक डॉक्टरांची भरती परिपूर्ण अनेक ठिकाणी मनुष्यबळ अपुरा आहे नर्सेसची संख्या कमी आहे. याचं उदाहरणच द्यायचं तर पुण्यासारख्या 35 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी ससून रुग्णालय होते. तेव्हा लोकसंख्या अत्यंत कमी होती आज लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे 35 लाखाच्या तुलनेमध्ये ससून सारखे आणि त्याच्याहून सुसज्ज असे किमान दोन ते तीन रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
सरकारने लक्ष देण्याची मागणी : यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली की, चीनमध्ये जी चिंताजनक स्थिती आहे. त्या संदर्भात शासनाला आम्ही डॉक्टरांनी सांगितले आहे की तिकडची माहिती सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. तसेच लोकांनी सार्वजनिक ठिकाणी आता मास्क वापरणे तात्काळ सुरू केले पाहिजे. तसेच शासनाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तिच्याकडे युद्धपातळीवर लक्ष दिले पाहिजे.
सरकारने आढावा घ्यावा : आरोग्य अधिकाराबाबत काम करणाऱ्या कार्यकर्त्या मुक्त श्रीवास्तव यांनी सांगितले की, मागील महाराष्ट्रातील कोरोना महामरीचा अनुभव विरोधी पक्षांकडे आहे आणि शासनाकडे पण आहे. त्यांनी हजारो डॉक्टर्स, नर्स इतर कर्मचारी यांची भरती तात्काळ केली पाहिजे. प्राणवायू सोया, ऑक्सिजन हॅलो प्लांट सुसज्ज केले पाहिजे. उद्या लागणाऱ्या औषधांचा पुरवठा आजच शासनाने केला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक शाळा ज्यांना योग्य ते निर्देश आजच दिले गेले पाहिजे.