ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ४,९२२ नवीन रुग्णांचे निदान, ९५ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ५,८३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १७,१५,८८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८८ टक्के इतके झाले आहे.

maharasthtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 5, 2020, 8:28 PM IST

मुंबई - राज्यात आज (शनिवारी) ४,९२२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,४७,५०९ वर पोहचला आहे. तसेच राज्यात आज ९५ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७,६९४ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८२,८४९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

८२,८४९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -
राज्यात आज ५,८३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १७,१५,८८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८८ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१२,०५,११८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,४७,५०९ नमुने म्हणजेच १६.४९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,६०,६८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५,८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८२,८४९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा - कोरोना महामारी संपल्याचे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही - WHO

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, गेल्या काही दिवसात ही रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.