मुंबई- कोरोना हा संपूर्ण जगाचा कर्दनकाळ ठरला आहे. आणि त्यावर तोडगा म्हणजे त्यावर मात करण्यासाठी विकसित झालेली लस. भारतातील लसीकरणाचा कार्यक्रम जोरदारपणे सुरु असून मनोरंजनसृष्टीतही अनेकांचे लसीकरण झालेले आहे. राज्य शासनाने दिलेल्या मुभेनुसार अनेक निर्माते आणि निर्मितीसंस्थांनी आपल्या कामगारांचे, स्टाफचे, कलाकारांचे लसीकरण करून घेतले आहे. आणि अजूनही काही लसीकरण मोहिमा राबविल्या जाता आहेत.
विनोदी कार्यक्रमांच्या टीआरपी मध्ये अव्वल
वेट क्लाउड या निर्मितीसंस्थेतर्फे सुरु असलेला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम विनोदी कार्यक्रमांच्या टीआरपी मध्ये अव्वल आहे. आत्ताच शिथिल झालेल्या लॉकडाऊन आधी, महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या शुटिंगवर बंदी घातल्यामुळे, हास्यजत्रा ची टीम महाराष्ट्राबाहेर शूटिंग करीत होती. आता त्यातील सर्वजण मुंबईत परतले असून आता पुन्हा पूर्वीच्या जागी चित्रीकरण केले जात आहे. नुकतीच सगळ्यांच्या लाडक्या महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमने मालाड येथील लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये करोनाची लस घेतली.
सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन
महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्याचे कलाकार सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आणि त्यांना हसवत आहेत. सोनी मराठी वाहिनी आणि वेट क्लाउड प्रोडक्शन यांच्याकडून सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांना लस देण्यात आली. या कठीण काळात हास्यजत्रा ही टेन्शनवरची लस ठरत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी प्रहसनांचा कार्यक्रम प्रसारित होतो.
हेही वाचा- राज्यात शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात