मुंबई Maharashtra Weather Update : सध्या हिवाळी सुरू आहे, थंडीची हुडहुडी सर्वत्र जाणवू लागली आहे. पहाटे-पहाटे घराबाहेबर पडून अनेकजण गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडं थंडीमुळं काहीजण शेकोटीचा आसरा घेत आहेत. अशातच आता हवामान विभागाकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऐन थंडीत आता पाऊस पडणार आहे. मुंबईसह राज्यातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागात पुढील चार दिवस, म्हणजे 27 नोंव्हेबरपर्यंत पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
मुंबईसाठी यलो अलर्ट : राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. दुसरीकडं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण, तसेच पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिवाळ्यात पावसाचे कारण काय? : यावर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस पडला नाही. तसेच आता हिवाळ्यात पाऊस येण्याचं कारण म्हणजे, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरकडचे वारे प्रशांत महासागराकडे जाऊ शकत नाही. याठिकाणी तापमान जास्त असेल तर तिथे हवेचा दाब कमी होतो. तर दुसरीकडं हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील तापमान वाढलय. सध्या 30 ते 31 अंश सेल्सिअस एवढे तापमान आहे. यातून जे बाष्प निर्माण होतेय, ते दक्षिणेच्या दिशेने येत आहे. त्यामुळं पावसाची शक्यता निर्माण होत आहे, असं ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी म्हटलं आहे.
मुसळधार पावसाची शक्यता : राज्यात 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. दुसरीकडं कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण, तसेच पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हेही वाचा -