ETV Bharat / state

Valentine Day Appeals: 'प्रेम करा; पण जोडीदार निर्व्यसनी निवडा', व्हॅलेंटाईन डे निमित्ताने महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे आवाहन

आज १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे. हा प्रेमाचा दिवस या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या निमित्ताने अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देत असतात. परंतु या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या वतीने आजच्या तरुणाईला निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील नरिमन पॉईंट या परिसरामध्ये समुद्रकिनारी कृत्रिम घोड्यावर स्वार होऊन महाराष्ट्राच्या तरुण व तरुणांनी वरात काढून आयुष्यात निर्व्यसनी राहण्याचे धडे देण्याबरोबर आयुष्याचा जोडीदार सुद्धा निर्व्यसनी निवडा असे आवाहन केले आहे.

Valentine Day Appeals
व्हॅलेंटाईन डे
author img

By

Published : Feb 13, 2023, 9:22 PM IST

महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचा अनोखा उपक्रम

मुंबई: आजच्या परिस्थितीत व्यसनाधीनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एका दिलखुलास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरिमन पॉईंट येथे समुद्रकिनारी झालेल्या कार्यक्रमात व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रू. कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन हे थोड्या वेळची करमणूक असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे प्रेम. मनाचा व शरीराचा सुंदर बंध म्हणजे प्रेम. हे बंध अडीअडचणीत दुःखात आधार ठरतात. व्यसने आधारापोटी कवठाळली जातात. परंतु व्यसनेही आधार नाहीत हे समजून घेतले पाहिजे. जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा भक्कम आधार आपणास ढासळताना दिसत असतो. याच उद्देशाने हे तरुण येथे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मौजमजा आणि फेरफटका मारण्यासाठी आलेल्या तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचे पत्रक देत त्यांना याबाबत आवाहन करताना दिसून आले.

नको मला बंगला गाडी, शोधेनं मी व्यसनमुक्त गडी: मागील दोन वर्ष करोनाच्या महामारीमध्ये अनेक तरुण देशोधडीला लागले. अनेक जणांचे रोजगार गेले. पगार अर्ध्यावर आले आणि या कारणाने अनेक तरुण व्यसनाकडे वळले गेले, व्यसनाधीन झाले. म्हणूनच या तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी सर्वोत्तम परी प्रयत्न केले जात आहेत. आजची तरुणाई व्यसनाकडे आकर्षित होऊ नये. कारण व्यसन हे तात्पुरते स्वरूपाचे असून ते नंतर संपूर्ण शरीराची हानी करणारे असते. म्हणूनच तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आला. उपस्थित तरुण-तरुणींना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. प्रेम करा; मात्र जोडीदार निर्व्यसनी निवडा, असा संदेश महाराष्ट्रातील लेकी रस्त्यावर उतरून देत असल्याची माहिती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली. तसेच हा व्यसनमुक्तीचा लढा यापुढेही अखंडपणे चालू राहील असे सांगत, व्यसनमुक्त जीवनच सुख समृद्ध बनू शकते. म्हणूनच निर्व्यसनी आयुष्याची कास धरली असेही त्या म्हणाल्या.

व्यसन ही आयुष्याची बरबादी: उपस्थित तरुणांनीसुद्धा आपली मते व्यक्त करताना व्यसन हे संपूर्ण आयुष्याची बरबादी आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते माणसाला लाभदायक आहे. असे वाटत असले तरीसुद्धा त्यामुळे संपूर्ण आयुष्याची बरबादी होते. म्हणूनच आम्हीसुद्धा निर्व्यसनीच जोडीदार निवडणार असे त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा: Pawar on Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे सभ्य नेते! 'त्या' खुलाशावर शरद पवारांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.