ETV Bharat / state

Honey Production : जांभळापासून होणार मधनिर्मिती, खादी ग्रामोद्योग महामंडळाचा उपक्रम - Honey production from the purple tree

राज्यातील आदिवासी भागातील तसेच ग्रामीण भागातील जनतेला रोजगाराभिमुख व्यवसाय निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळ सध्या नवनवीन उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत मुंबईपासून जवळ असलेल्या बदलापूर शहरांमधील दहिवली परिसरात जांभळांच्या झाडांपासून मध निर्मिती करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली आहे.

Honey Production
Honey Production
author img

By

Published : May 19, 2023, 8:23 PM IST

Updated : May 19, 2023, 9:23 PM IST

महामंडळाचे सभापती रवींद्र साठे माहिती देतांना

मुंबई : २० मे जागतिक मधदिन दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने राज्यातील मधूमक्षिका पालन व्यवसायाला चालना कशी देता येईल याचा विचार खादी, ग्रामोद्योग महामंडळाने केला आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील मांगुर गावात मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना देण्यात आली आहे. या गावातील सुमारे 80 टक्के लोक मधुमक्षिका पालन करतात. अशा पद्धतीने मधुमक्षिका पालन करणाऱ्या गावांची निर्मिती करणे, संबंधित गावातील रोजगारासाठी इच्छुक असलेल्या ग्रामस्थांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देणे यासाठी महामंडळाने आता पुढाकार घेतला आहे.

सातारा जिल्ह्यातील मांगुर गावाप्रमाणे आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मधुमक्षिका पालन करणाऱ्या गावाचा महामंडळाच्या वतीने शोध घेतला जात आहे. जे गाव मधुमक्षिका पालनासाठी तयारी दर्शवले अशा गावाने त्यासंदर्भातला ठराव खादी ग्रामोद्योग महामंडळाला पाठवणे आवश्यक आहे. अशा गावांना महामंडळातर्फे प्रशिक्षण, व्यवसायासाठी अनुदान, मदत करण्यात येणार - रवींद्र साठे, सभापती, खादी ग्रामोद्योग, महामंडळ

जांभळापासून करणार मधनिर्मिती : जांभूळ हे फळ मधुमेहासाठी अत्यंत परिणामकारक असल्याचे मानले जाते. त्यामुळे या फळापासून मध निर्मिती केली तर, ती मधुमेही व्यक्तींसाठी उपयोगी ठरू शकते. हे फळ अत्यंत औषधी, गुणकारी आहे. त्यामुळे जांभळापासून मध निर्मिती करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र राज्य खादी, ग्रामोद्योग महामंडळातर्फे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईपासून जवळ असलेल्या बदलापूर येथील दहिवली परिसरात असलेल्या शेकडो जांभळांच्या झाडांचा उपयोग करण्यात येणार आहे असेही साठे यांनी सांगितले.

तेराशे झाडे महामंडळाने घेतली प्रकल्पासाठी : बदलापूर येथील दहिवली परिसरात 1 हजार 300 पेक्षा अधिक जांभळांची झाडे आहेत. या जांभळांच्या झाडापासून मिळणाऱ्या जांभळाच्या माध्यमातून आता मध निर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय, मंजुरी खादी ग्रामोद्योग महामंडळाने घेतली आहे. बदलापूर परिसरात आदिवासीबहुल गावे आहेत. या गावातील लोकांना रोजगार मिळावा, त्यांनी निर्माण केलेल्या मधासाठी त्यांना योग्य बाजारपेठ, योग्य किंमत मिळवून देण्यासाठी ही खादी आणि ग्रामोद्योग महामंडळ प्रयत्न करणार आहे.

पहिलाच प्रकल्प असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद : खादी, ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने बदलापूर परिसरात राबवण्यात येणारा मध निर्मिती प्रकल्प आता मधुबन या नावाने ओळखला जाणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील गरीब, कष्टकरी आदिवासी बांधवांना रोजगार मिळेल. तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल. जांभळाच्या झाडापासून मद निर्मिती करणारा पहिलाच प्रकल्प या पट्ट्यात राबवला जात असल्याबद्दल स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा -

  1. Serious Allegations Against Thackeray : ठाकरे कुटुंबाकडून वसूल केली जाते खंडणी, भाजपच्या 'या' आमदाराने केला मोठा गौप्यस्फोट
  2. Sanjay Raut visit to Nanded : लोकसभेत जिंकलेल्या 19 जागांवर शिवसेनेचाच उमेदवार असेल -संजय राऊत
  3. Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना 24 मेपर्यंत अटकेपासून संरक्षण

Last Updated : May 19, 2023, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.