मुंबई - राज्यात आज ११५१ नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले आहे. ( Maharashtra Corona Update 23rd February 2022 ) तर आज २,५९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातील कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ७७,०२,२१७ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.९७ टक्के इतके झाले आहे.
२३ बाधितांचा मृत्यू
आज राज्यात ११५१ नवीन बाधितांचे निदान झाले. तर २३ करोना बाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृतयूदर १.८२ % एवढा आहे. आजपयंत तपासण्यात आलेल्या ७,७४,८४,१४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६१,४६८ (१०.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६४,०५० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत १६८ नवे कोरोना रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद
ओमायक्रॉन बद्दलची माहिती –
आजपर्यंत राज्यात एकूण ४५०९ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यापैकी ४३४५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ८९०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ८०४४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. तर ८६० नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.