ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये समृद्धी महामार्गाचे काम वेगात, 25 टक्के काम पूर्ण - समृद्धी महामार्ग आणि लॉकडाऊन

मुंबई ते नागपूर प्रवास सुपर फास्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार 10 एप्रिलपासून समृद्धीच्या कामाला सुरुवात झाली असून कामाने वेग पकडला आहे. अगदी लॉकडाऊन सुरू असतानाही आत्तापर्यंत 25 टक्के काम पूर्ण झाले आहे.

लॉकडाऊनमध्ये समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग, 25 टक्के काम पूर्ण

author img

By

Published : Apr 24, 2020, 2:46 PM IST

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह राज्यातील काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यात मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाचाही समावेश आहे. त्यानुसार 10 एप्रिलपासून समृद्धीच्या कामाला सुरुवात झाली असून कामाने वेग पकडला आहे. तर, आत्तापर्यंत 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत 17 हजार 500 मजूर काम करत आहेत.

मुंबई ते नागपूर प्रवास सुपर फास्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या, प्रकल्पाला जोरदार विरोध झाला आणि आजही विरोध होत आहे. मात्र, तरीही प्रकल्पाचे काम कुठेही थांबलेले नाही. अगदी लॉकडाऊन सुरू असतानाही काम सुरू आहे. जनता कर्फ्यू लागल्यानंतर अर्थात 22 मार्चपासून हे काम बंद होते. त्यामुळे एकीकडे मोठे आर्थिक नुकसान होत होते. तर, दुसरीकडे 17 हजार 500 मजूर बसून होते. हे मजूर एकार्थाने विलगीकरणातच होते. ज्या 16 कन्स्ट्रक्शन पॅकेजमध्ये काम सुरू आहे. त्यातील काही 2 ते 3 पॅकेज वगळले तर इतर सर्व ठिकाणे ग्रीन झोनमध्ये लोकवस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे या कामाला परवानगी देण्याची मागणी एमआरडीसीकडून प्रत्येक पॅकेजमधील जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली होती.

ही मागणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळाली आणि 10 एप्रिलपासून कामाला सुरुवात झाल्याची माहिती अनिलकुमार गायकवाड, सह व्ययस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी यांनी दिली आहे. 17 हजार 500 मजुरांची योग्य ती काळजी घेत काम सुरू आहे. तर, मुंबई-ठाणे-पालघरमध्ये कॊरोनाचे हॉटस्पॉट असल्याने काम संथगतीने सुरू असून बाकी ठिकाणी कामाने वेग पकडला आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. यात भराव टाकणे, रस्त्याची कामे आणि पुलाच्या कामाचा समावेश आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले. तर, कामाचा वेग येत्या काळात वाढवत प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.