मुंबई Maharashtra Rain Alert : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर देशातील अनेक भागात पुन्हा पावसानं हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, या आठवड्यात मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
Current district & station Nowcast warnings at 1730 IST Date, 5th September. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
https://t.co/AM2L3hjkRWhttps://t.co/uP8lcY7kk6
If you observe any weather, kindly report it at: https://t.co/5Mp3RJYA2y@moesgoi @DDNewslive @ndmaindia@airnewsalerts pic.twitter.com/Enk41EgUON
">Current district & station Nowcast warnings at 1730 IST Date, 5th September. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) September 5, 2023
https://t.co/AM2L3hjkRWhttps://t.co/uP8lcY7kk6
If you observe any weather, kindly report it at: https://t.co/5Mp3RJYA2y@moesgoi @DDNewslive @ndmaindia@airnewsalerts pic.twitter.com/Enk41EgUONCurrent district & station Nowcast warnings at 1730 IST Date, 5th September. For details kindly visit:
— India Meteorological Department (@Indiametdept) September 5, 2023
https://t.co/AM2L3hjkRWhttps://t.co/uP8lcY7kk6
If you observe any weather, kindly report it at: https://t.co/5Mp3RJYA2y@moesgoi @DDNewslive @ndmaindia@airnewsalerts pic.twitter.com/Enk41EgUON
राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभागानं ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ७ ते ८ सप्टेंबरसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. तर रत्नागिरीमध्ये सोमवारपासूनच यलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय. आयएमडीनुसार या संपूर्ण आठवड्यात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या गुजरातमध्येही विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
-
𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚 𝙅&𝙆(4.9.23)
— Meteorological Centre Srinagar (@metsrinagar) September 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩:Clear whole J&K.
𝙁𝙤𝙧𝙚𝙘𝙖𝙨𝙩 𝙛𝙤𝙧 𝙣𝙭𝙩 2 𝙬𝙚𝙚𝙠𝙨:
Mainly hot & Dry. A brief spell of Light Rain May occur at isolated places on 5th evening. Overall, there's NO forecast of any Major Rain/Snowfall. pic.twitter.com/cqUvHXkDcQ
">𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚 𝙅&𝙆(4.9.23)
— Meteorological Centre Srinagar (@metsrinagar) September 4, 2023
𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩:Clear whole J&K.
𝙁𝙤𝙧𝙚𝙘𝙖𝙨𝙩 𝙛𝙤𝙧 𝙣𝙭𝙩 2 𝙬𝙚𝙚𝙠𝙨:
Mainly hot & Dry. A brief spell of Light Rain May occur at isolated places on 5th evening. Overall, there's NO forecast of any Major Rain/Snowfall. pic.twitter.com/cqUvHXkDcQ𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚 𝙅&𝙆(4.9.23)
— Meteorological Centre Srinagar (@metsrinagar) September 4, 2023
𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩:Clear whole J&K.
𝙁𝙤𝙧𝙚𝙘𝙖𝙨𝙩 𝙛𝙤𝙧 𝙣𝙭𝙩 2 𝙬𝙚𝙚𝙠𝙨:
Mainly hot & Dry. A brief spell of Light Rain May occur at isolated places on 5th evening. Overall, there's NO forecast of any Major Rain/Snowfall. pic.twitter.com/cqUvHXkDcQ
विदर्भात ८ सप्टेंबरपर्यंत पाऊस : हवामान खात्यानं विदर्भात ८ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम, तर काही भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशातही ८ सप्टेंबरपर्यंत असंच हवामान राहील. तर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशात आजपासून शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हैदराबादमध्ये शाळा बंद : तेलंगाणातील हैदराबादमध्ये मंगळवारी संततधार पावसामुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली. इथं हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासोबतच आयएमडीनं केरळच्या पठाणमथिट्टा आणि इडुक्की जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच पुढील ४८ तासांत ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक : हवामान खात्यानं पुढील पाच दिवसांत राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलीय. सोमवार ते बुधवार या कालावधीत आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, रायलसीमा आणि यानामच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि ८ सप्टेंबर रोजी उत्तर कर्नाटकात पाऊस पडू शकतो. तर दक्षिण कर्नाटक आणि किनारपट्टीच्या भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल, बिहार आणि ईशान्य भारत : आयएमडीनुसार पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील भागात बुधवारपर्यंत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे बिहारच्या अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, 6 सप्टेंबरपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तर ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये उद्या आणि परवा म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम ते बर्यापैकी पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : Maharashtra Rain Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सप्टेंबरमध्ये राज्यात समाधानकारक पाऊस