मुंबई : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी २०२३ या वर्षातील (Maharashtra Public Holiday 2023) सार्वजनिक सुट्ट्या शुक्रवारी जाहीर केल्या. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सुट्ट्या मिळाल्या (state government employees Holidays) आहेत. मात्र, त्यातील चार सुट्ट्या शनिवार आणि रविवार आल्यामुळे (Maharashtra Government Calendar) बुडाल्या आहेत.
२६ जानेवारी, गुरुवार रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. १८ फेब्रुवारी, शनिवार रोजी महाशिवरात्रीची सुट्टी आहे. १९ फेब्रुवारी, रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. ७ मार्चला होळी असल्याने, 8 मार्च बुधवार रोजी रंगपंचमी आहे. २२ मार्च, बुधवार रोजी गुढीपाडवा आहे. ३० मार्च, गुरुवार रोजी रामनवमी आहे. ४ एप्रिल, मंगळवार रोजी महावीर जयंती आहे. ७ एप्रिल, शुक्रवार रोजी गुड फ्रायडे आहे. १४ एप्रिल, शुक्रवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. १ मे, सोमवार रोजी महाराष्ट्र दिन आहे. ५ मे, शुक्रवार रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. २८ जून, बुधवार रोजी बकरी ईद आहे. २९ जुलै, रविवार रोजी मोहरम आहे. १५ ऑगस्ट, मंगळवार रोजी स्वातंत्र्यदिन आहे. १६ ऑगस्ट, बुधवार रोजी पारसी नववर्ष दिन आहे. १९ सप्टेंबर, मंगळवार रोजी गणेश चतुर्थी आहे. २८ सप्टेंबर, गुरुवार रोजी ईद ए मिलाद आहे. २ ऑक्टोबर, सोमवार रोजी महात्मा गांधी जयंती आहे. २४ ऑक्टोबर, मंगळवार रोजी सरा आहे. १२ नोव्हेंबर, रविवार रोजी दिवाळी लक्ष्मीपूजन आहे. २७ नोव्हेंबर, सोमवार रोजी गुरूनानक जयंती आहे. ख्रिसमस २५ डिसेंबर, सोमवार रोजी आहे. अशा मिळून २४ सार्वजनिक सुट्ट्या सरकारने जाहीर केल्या आहेत.
महाशिवरात्री, रमझान ईद आणि मोहरम हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि दिवाळी लक्ष्मीपूजन रविवारी असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्ट्या बुडाल्या आहेत.