मुंबई - या महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवालांच राज्य सुरू आहे. तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत. पेशवे काळातील घाशीराम कोतवालांचा कार्यकाळ बघा. त्यांनी लुटमार आणि दरोडेखोरी केली. घाशीराम कोतवाल यांच्यावरत पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती. लुटमार करून ते वरिष्ठांना पैसे पोचवायचे. घाशीराम कोतवाल नाटक महाराष्ट्रात खूप गाजलं आहे. ती एक विकृती होती. आज महाराष्ट्रात घाशीराम कोतवाल राज्य असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीय लेखातून भाजपा आणि मित्र पक्षांवर टीका केली आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा छाती फुटेपर्यंत नैतिकतेचे फुगे फुगवत आहे. त्यांच्याकडे नैतिकता तरी शिल्लक आहे का? म्हणून आज आम्ही म्हटलं आहे की, नैतिकतेचं ऑडिट केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होतं. काय खरं? काय खोटं? कुठे काय मुरलं? या सगळ्याचं ऑडिट होतं. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा नैतिकतेचे ऑडिट होणं गरजेचं आहे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचं एक नाटक केलं आहे.
-
ऐसी बात बोलिए,
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
के कोई न बोले झूठ...
और ऐसी जगह बैठिए
के कोई न बोले *उठ..!* pic.twitter.com/AXdQzy8XGr
">ऐसी बात बोलिए,
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2023
के कोई न बोले झूठ...
और ऐसी जगह बैठिए
के कोई न बोले *उठ..!* pic.twitter.com/AXdQzy8XGrऐसी बात बोलिए,
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 9, 2023
के कोई न बोले झूठ...
और ऐसी जगह बैठिए
के कोई न बोले *उठ..!* pic.twitter.com/AXdQzy8XGr
तुम्ही सगळे नवाब मलिक यांचे बाप- पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "जर तुमच्यात खरंच नैतिकता असेल तर मग प्रफुल पटेल यांच्या विषयी काय भूमिका आहे? दोघांचे अपराधसारखे आहेत. प्रफुल पटेल हे अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. आम्ही नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नसल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मग तुम्ही कशाला काय लावत आहेत? आज सकाळी शिंदे गटाचा पोपट बोलत होता. आम्ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. अरे मग, तुम्ही सगळे नवाब मलिक यांचे बाप आहेत. बेईमान आणि गद्दार लोक आहात.
तुमच्यावर भयंकर आरोप आहेत. त्यामुळे तुम्ही ईडी आणि सीबीआयला घाबरून पलायन केले. तुमच्या मागे इडी लागली आहे. अटक वॉरंट काढले आहेत. तुम्ही आम्हाला काय सांगत आहात?-खासदार-संजय राऊत
किरकोळ लहान मासे का पकडत आहेत- ललित पाटील प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील आमली पदार्थ तस्करीचे मोठे प्रकरण समोर आले. पण, अद्यापही तस्करी थांबलेली नाही. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ससून ड्रग्स प्रकरणांमध्ये धरपकड चालू आहे. पकडापकडीचा लग्नाचा खेळ चालू आहे. ते सुद्धा नाटक बंद करा. या प्रकरणात दोन मंत्र्यांचा थेट सहभाग आहे. या प्रकरणात दोघेही कॅबिनेटमधील मंत्री आहेत. ललित पाटीलला वर्षभर ससूनमध्ये ठेवण्यात आलं. त्याचं साम्राज्य होतं. त्याला संरक्षण देण्याचं काम या दोघांनी केलं. पोलिसांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे, असं काँग्रेसचे आमदार रवींद्र धनगेकर यांनी सांगितले आहे. पोलीस किरकोळ लहान मासे का पकडत आहेत? मंत्रिमंडळातील दोघे आहेत. त्यांना हात लावून दाखवण्याची हिम्मत दाखवा. या प्रकरणी स्थापन केलेली एसआयटी कुठे आहे, असा प्रश्न खासदार राऊत यांनी केला.
हेही वाचा-