ETV Bharat / state

Supriya Sule NCP President : सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी का तयार नाहीत? जाणून घ्या... - राष्ट्रवादीच्या अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पक्षातील उत्तराधिकारी म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नावांची चर्चा होती. त्यातच सुप्रिया सुळे ह्याच वारसदार होतील असेही म्हटले जात होते. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी स्वत:हून आपण अध्यक्ष पदासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. यामागे नेमके काय कारण असू शकते हे जाणून घेऊया.

Supriya Sule
सुप्रिया सुळे
author img

By

Published : May 9, 2023, 3:48 PM IST

मुंबई : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजवून देणाऱ्या शरद पवार यांच्या राजीनामानाट्य नंतर सुप्रिया सुळे ह्या त्यांच्या राजकीय वारसदार होतील अशी जोरदार चर्चा पक्षात आणि विविध स्तरावर सुरू होती. मात्र शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यामुळे ही चर्चा आता तूर्तास का होईना थांबली आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वत:हून आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितल्याने आता चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे शरद पवार यांनीही सांगितले आहे.

Supriya Sule NCP President
सुप्रिया सुळे अध्यक्षपदासाठी का तयार नाहीत

काय म्हणाले शरद पवार? : भविष्यात लोकसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी पक्षाला कशा प्रकारे वाढवता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या पक्षाचे चारच खासदार आहेत. हा एक अंकी आकडा कसा दोन अंकात नेता येईल ह्या दृष्टीकोनातून पक्ष मतदारांशी जोडलेला असणे गरजेचे आहे. त्यासोबत त्यांच्या बारामती मतदारसंघावर त्यांचे बारीक लक्ष आहे. आपण स्वत:हून जबादारी घ्यायची तयारी देखील असावी लागते. त्यामुळे मतदारांशिवाय कोणतीही जबाबदारी आपण स्वीकारू इच्छित नाही असे सुप्रिया यांनी कळवले असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

संसदेत उत्तम कामगिरी : सुप्रिया सुळे ह्या गेल्या पंधरा वर्षांपासून खासदार म्हणून सक्रिय राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी संसदेत आतापर्यंत सात वेळा उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्नांची समज आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे केंद्रात सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदाराची अद्यापही आवश्यकता आहे. पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी अन्य राज्यांमध्ये पक्ष वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या दृष्टीने सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष पद घेण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar News : सामनातील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर
  2. Jitendra Awhad On The Kerala Story: द केरळ स्टोरीच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या - जितेंद्र आव्हाड
  3. Nana Patole on MLAS disqualification : सत्तासंघर्षाच्या निकालात नेमके काय घडणार? नाना पटोले म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.