ETV Bharat / state

Sharad Pawar On Ajit Pawar : 'राजीनाम्याबाबत अजित पवारांना आधीच माहित होते', शरद पवारांचा खुलासा - sharad pawar press conference

शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेताना अजित पवारांबाबत मोठा खुलासा केला. माझ्या राजीनाम्याची अजित पवारांना पूर्वीपासूनच कल्पना होती, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar Ajit Pawar
शरद पवार अजित पवार
author img

By

Published : May 5, 2023, 9:21 PM IST

मुंबई : शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. 'मी तुमच्या भावनांचा अपमान करू शकत नाही. राजीनामा मागे घेण्याची तुमची मागणी मी मानत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मी मागे घेत आहे', असे ते यावेळी म्हणाले.

'अजित पवारांना राजीनाम्याची माहिती होती' : ज्यांनी राजीनामे दिले आहेत त्या सर्वांचे राजीनामे आम्ही फेटाळून लावल्याचे शरद पवार म्हणाले. पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची माफी मागितली. तसेच अजित पवारांना माझ्या राजीनाम्याची माहिती होती, असे देखील ते म्हणाले. यामुळे ते माझ्या निर्णयाचे समर्थन करत होते, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला अजित पवार गैरहजर : आजच्या पत्रकार परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, प्रत्येकजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत आणि काही नाहीत. समितीने हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयानंतर मी माझा निर्णय मागे घेतला. आज सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो माझ्यापर्यंत पोहोचवला.

'आम्ही सर्व एकत्र आहोत' : शरद पवार म्हणाले की, 'या निर्णयातून सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. म्हणूनच इथे कोण उपस्थित आहे आणि कोण नाही, असा प्रश्न उभा करणे किंवा त्याचा अर्थ शोधणे योग्य नाही. समितीत ज्येष्ठ नेते आहेत. सर्वजण एकत्र येऊन चर्चा करत आहेत'. शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली होती.

राजीनाम्यानंतर गदारोळ झाला होता : यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी समितीही स्थापन केली होती. या समितीत त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचा समावेश होता. त्यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर पक्षात जोरदार विरोध झाला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पवार यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. अनेक नेत्यांनी आपल्या पदांचे राजीनामेही दिले होते. त्यानंतर पवार यांनी आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी मागितला.

हेही वाचा

  1. Sharad Pawar Young Brigade : शरद पवारांची यंग टीम आली समोर; अजित पवार, सुप्रिया सुळे गायब
  2. Ajit Pawar and Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेला गैरहजर; शरद पवार म्हणाले...
  3. MNS On Sharad Pawar Resignation: भाकरी थांबली, म्हणून शरद पवार खेळले हा डाव- मनसेची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.