ETV Bharat / state

तीन राज्य गमावल्यानंतर काँग्रेसला राज्याच्या राजकारणात बसणार मोठा फटका, जाणून घ्या राजकीय विश्लेषण - Maharashtra Politics

Assembly Election 2023 : विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेस पक्षाला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा आणखी वाढला आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Assembly Election 2023
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 11:07 AM IST

Updated : Dec 5, 2023, 2:03 PM IST

मुंबई Assembly Election 2023 : देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून तेलंगाणा वगळता तीनही राज्यांत भाजपाचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसला आपली सत्ता राखता आली नाही. या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा फटका राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेसला बसण्याचं बोललं जातं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपात काँग्रेस पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत काँग्रेसनं चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालाचा परिणाम राज्यातील निवडणुकीत होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस नमतं धोरण घेणार का : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरु असून जागा वाटपात तिघांचं एकमत होत नाही. काँग्रेस पक्षानं केलेल्या जास्त जागांच्या मागणीमुळे ही प्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे. आपल्याला ठाकरे गट आणि शरद पवार गटापेक्षा जास्त जागा मिळाव्या, या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कल काँग्रेसच्या बाजूने लागेल, असा अंदाज अनेक सर्व्हेंमधून वर्तवल्यामुळं काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली होती. मात्र तेलंगाणा सोडून काँग्रेस पक्षाला आपली सत्ता राखण्यात यश आलं नसल्यानं काँग्रेस पक्षाची महविकास आघाडीत बार्गेनिंग पॉवर कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यामुळं महायुती अधिकच बळकट झाली. महाविकास आघाडीला येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीला जर तगडं आव्हान द्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाला आता जागा वाटपात अॅडजेस्टमेंट करण्यासाठी आपली कमी जागांवर समाधान मानणं, ही सध्याची गरज असल्यानं ते करावंच लागणार आहे. त्यातच आता 'इंडिया' आघाडीचे सभासद असलेले, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जीदेखील काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त करत काँग्रेसचं महत्त्व कमी झाल्याचं अधोरेखित केलं आहे. एकूणच अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती, 'आम्ही म्हणू ते घडलंच पाहिजे' असा आग्रह धरण्यासारखी राहिलेली नाही.

काँग्रेस पक्ष करणार होता जास्त जागांवर दावा : लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीत जागा वाटपाचं सूत्र ठरलं असून ठाकरे गट 19 जागा, काँग्रेस 13 ते 15 जागा आणि शरद पवार गट 10 ते 12 जागा लढण्याची शक्यता आहे. 5 राज्यांच्या निकालांतर काँग्रेस नेते अतिरिक्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार होते. चार पैकी तीन राज्यात काँग्रेस पक्षाला बसलेल्या फटक्यामुळं त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं बोललेलं जात आहे. यापूर्वी देखील ठाकरे आणि पवार गट काँग्रेस पक्षाला अतिरिक्त जागा देण्यासाठी तयार नव्हते.

निकालाचा कोणताही फरक नाही : महाविकास आघाडीमध्ये यापूर्वीच लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. काँग्रेस पक्षानं बार्गेनिंग वगैरे शब्दाला थारा दिलेला नाही. त्यामुळं तीन राज्यातील निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि राजकारणावर होणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

बार्गेनिंग पॉवर राहिली नाही : काँग्रेस पक्ष कृतिपेक्षा वल्गना करण्यात तरबेज आहे. यापूर्वी बार्गेनिंग पॉवर अपेक्षित तशी नव्हती, आता तर शिल्लक राहिली नाही. काँग्रेसनं आत्मचिंतन करणं गरजेचं असल्याचं शिवसेना ( शिंदे गट) प्रवक्ता संजू भोर पाटील यांनी म्हटलं आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपाला कौल दिला आहे. काँग्रेसकडं तळागाळात पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्ते शिल्लक राहिले नसल्यामुळे महाविकास आघाडीत त्यांची बार्गेनिंग पॉवर निश्चितच कमी झाली आहे.

ठाकरे आणि पवार गटांचा विरोध कायम : महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आल्यानं प्रत्येकाला अॅडजस्ट करावंच लागणार आहे. काँग्रेस पक्षानं बार्गेनिंग पॉवरच्या नावाखाली लोकसभेसाठी अतिरिक्त जागा मागितल्याचं तर ठाकरे गट आणि पवार गट यांचा विरोध कायम राहून काँग्रेस स्वबळावर तर पवार-ठाकरे एकत्र लढू शकतात. काँग्रेस बार्गेनिंग पॉवर बाजुला सारून महाविकास आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीला सामोरं जाईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात, वंचित आघाडीची नाराजी कायम
  2. Sanjay Raut On Sharad Pawar : शरद पवारांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह? पवारांनी उत्तर द्यावे - संजय राऊत
  3. Sunil Tatkare On Sharad Pawar : शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य - सुनील तटकरे

Last Updated : Dec 5, 2023, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.