मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सेवा विधेयकावर (Delhi Services Bill) आम आदमी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या सर्व विरोधी खासदारांचे आभार मानले आहेत. विशेषत: केजरीवाल यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Former Prime Minister Dr. Manmohan Singh), झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन (Shibu Soren of Jharkhand Mukti Morcha) यांचे विशेष आभार मानले आहेत. दिल्ली सेवा विधेयकावर 'आप' विरोधकांसोबत आल्याने विरोधकांच्या एकजुटीला त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यातच काँग्रेसला देखील महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आप पक्षाचा फायदा होणार आहे.
राज्यातील राजकीय समीकरणे बदलली : महाराष्ट्र राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याचबरोबर २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नक्की काय चित्र असेल? हे सांगणे कठीणच आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी (Eknath Shinde rebellion from Shiv Sena) करत ४० आमदारांसह भाजपासोबत घरोबा केला होता. त्यानंतर राज्यात शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले. या सरकारला एक वर्ष होत नाही, तोच माजी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी (Rebellion of Ajit Pawar in NCP) करत काही समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात बंडखोडी झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. अशात काही महिन्यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (local bodies Elections) या सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
काँग्रेस - आप साथ साथ? : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही स्वबळावर लढवली जाणार असा नारा तत्कालीन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला होता. त्यावर आजही काँग्रेस ठाम आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षानेही मुंबई तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दिल्ली सेवा विधेयकावर (Delhi Services Bill) विरोधी पक्षाने विशेष करून काँग्रेसने दिलेली साथ ही आपसाठी लाख मोलाची ठरली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आप पक्ष, काँग्रेस यांच्यामध्ये तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती सूत्रांकडून भेटते आहे.
आम आदमी पक्ष पूर्ण ताक्तिनिशी लढणार : याविषयी बोलताना आप पक्षाचे उपाध्यक्ष, धनंजय शिंदे म्हणाले की, केंद्रात दिल्ली सेवा विधेयक अगोदर लोकसभेत, नंतर राज्यसभेत मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले. मोदी सरकारच्या विरोधात देशातील २६ पक्ष एकत्र आले. त्यांनी इंडियाही आघाडी बनवली. या आघाडीतील सर्वच पक्षांनी दिल्ली सेवा विधेयकाच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या बाजूने मतदान केले. त्याबद्दल या सर्वांचे आभार मानतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या इंडियाचा एकमेव उद्देश म्हणजे २०२४ ला मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचणे आहे. आम आदमी पक्ष हा आगामी निवडणुका स्वतंत्र लढवणार की इंडिया सोबत जाणार असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, या विषयी आमचे दिल्लीचे नेतृत्व अंतिम निर्णय घेईल. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग त्या ग्राम पंचायत असतील, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगर पालिका या सर्व आम आदमी पक्ष पूर्ण ताक्तिनिशी लढणार असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -