ETV Bharat / state

महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव; पाहा राजकीय नेत्यांच्या घरचा गुढीपाडवा

author img

By

Published : Apr 13, 2021, 12:40 PM IST

Updated : Apr 13, 2021, 2:04 PM IST

राजकिय नेत्यांच्या घरचा गुढीपाडवा
राजकिय नेत्यांच्या घरचा गुढीपाडवा

13:42 April 13

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या निवास्थानी केले गुढी पूजन; आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर

12:56 April 13

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या निवास्थानी केले गुढी पूजन

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमधील निवासस्थानी गुढी उभारून पूजन केले. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना गुडीपाडव्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाला हरवण्यासाठी शासनाने जाहीर केलेले नियम पाळावेत. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरकडे जावे आणि वेळोवेळी आरोग्याची काळजी घ्यावी असे, आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

12:40 April 13

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 'देवगिरी’ निवासस्थानी उभारली गुढी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘देवगिरी’ निवासस्थानी गुढी उभारुन पूजन केले. यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा पार्थ पवार उपस्थित होते. वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारे नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

12:19 April 13

बाळासाहेब थोरातांनी सप्तनी केली गुढीची पूजा; कोरोना संकट दूर होण्याची प्रार्थना

महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या घरी गुढी उभारून सप्तनी पूजा केली. यावेळी थोरातांनी कोरोनाचे संकट दूर होऊन सगळ्यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना केली. 

11:51 April 13

महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव; पाहा राजकीय नेत्यांच्या घरचा गुढीपाडवा

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षांचा पहिला दिवस. गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला ओळखलं जातं. महाराष्ट्रात हा सण अगदी उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. या नववर्षाच्या निमित्ताने एकमेंकाना शुभेच्छा दिल्या जातात. गुढी पाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. तिची विधिवत पूजा केली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गुढीपाडवा साजरा केला जातो. मग तो सामान्य माणूस असो किंवा राजकीय नेता. आज महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या घरात गुढीपाडवा साजरा केला. चला तर मग पाहुयात राजकीय नेत्यांच्या घरचा गुढीपाडवा.

Last Updated : Apr 13, 2021, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.