मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे मातेरे करण्याचा विडा या राजकारण्यांनी उचलला आहे. मात्र शरद पवार खंबीर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मदतीने सगळे पुन्हा नव्याने सुरू करू अशा आशावाद संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
-
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE
">महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFEमहाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE
हा राजकीय भूकंप नाही : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर टांगती तलवार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे फार काळ मुख्यमंत्री पदावर राहणार नाहीत. त्यामुळे हा भाजपने घेतलेला टेकू आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. आम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा एकत्र येऊन उभे राहू असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अपात्र ठरणार आहेत, ही स्पष्ट बाब आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल असेही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्यासोबत झाले बोलणे : उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाने मोठा रोष व्यक्त केला. मात्र शरद पवार यांच्यासोबत आपले बोलणे झाले आहे. शरद पवार यांनी मी खंबीर नेता आहे. त्यामुळे लोकांच्या पाठिंब्याने आपण पुन्हा नव्याने सुरू करू असे शरद पवार यांनी आपल्याकडे स्पष्ट केल्याचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मदतीने आपण पुन्हा नव्याने सुरू करू असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. जनता हे खेळ फार काळ सहन करणार नसल्याचे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.
काय आहे प्रकरण : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दुपारी दीड वाजता राजभवनाकडे प्रयाण केले. त्यांच्यापाठोपाठ सागर या बंगल्यातून त्याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि वर्षा या बंगल्यातून एकनाथ शिंदे हे सुद्धा राजभवनाकडे निघाले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. तर याचवेळी शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू होती. यावेळी शरद पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांबाबत विचारले असता, त्यांनी आपल्याला या बैठकीबाबत कल्पना नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
हेही वाचा -