मुंबई : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून, आता निकालाला काही तास उरले आहेत. इथे महाराष्ट्रात काही गोष्टी वेगाने घडू लागल्या आहेत. आमच्याकडे बहुमत असल्याने आमच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे सत्ताधारी सांगत आहेत. तर विरोधक आमचा कायद्यावर विश्वास आहे. त्यामुळे निकाल संविधानाचे पालन करुन देण्यात येईल असे दावे प्रतिदावे सुरू आहेत. त्यावर माजी खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या मुंबईत येणार असून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. देशातील सर्व विरोधी नेत्यांना एकत्र आणण्याच्या नितीश कुमारांच्या प्रयत्नांना उद्धव ठाकरे पाठिंबा देत आहेत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींना दिली. यावेळी राऊत यांनी उद्याच्या निकालासंदर्भातही प्रतिक्रिया दिली. तसेच युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही उद्याच्या निकालासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
या देशात लोकशाही जिवंत आहे की नाही याचा निर्णय उद्या होणार आहे आणि आपली न्यायव्यवस्था कोणाच्या दबावाखाली कार्यरत आहे की नाही हे देखील ठरवले जाईल - खासदार संजय राऊत
आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संविधानाचे पालन केले तरच देशाचे भले होईल - आदित्य ठाकरे
16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय उद्या सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ निकाल देण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे. उद्या सर्व काही स्पष्ट होईल, मीही 16 आमदारांपैकी एक असे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने येईल असे मला वाटते. आम्हाला त्याची चिंता नाही - शिवसेना नेते संजय शिरसाट
राज्यातील सत्ता संघर्षावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता संघर्षाचा निकाल लागण्या आगोदरच त्यावेळचे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. न्यायालय जो निर्णय देईल ते मान्य असल्याचे झिरवाळ यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितल्याचे पटोले म्हणाले. ते आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
सुप्रीम कोर्टाच्या निकाल10 प्रमाणे निकाल दिल्यास आमदार आपात्र ठरतील. या सोळा आमदांरामुळे राज्यातील सरकाळ कोसाळेल - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल राजकीय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही कमालीची उत्सुकता लागली आहे. न्यायमूर्ती शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत असून त्यापूर्वी निकाल येण्याची शक्यता आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्जल निकम आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कायद्याचा विद्यार्थी म्हणून मीही या निकालाबद्दल उत्साहित आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाशी संबंधित 8 ते 9 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. या घटनेबाबत विविध कायदेशीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. विशेषत: 16 आमदारांची अपात्रता, नवीन सभापतींची नियुक्ती, उपराष्ट्रपतींविरोधातील विश्वासदर्शक ठरावाचा मुद्दा, दोन्ही गटांच्या व्हीपचा मुद्दा, अशा स्थितीत राज्यपालांची कारवाई. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय पहिला मुद्दा घेऊन हा संपूर्ण वाद विधिमंडळाकडे पाठवते की यासंदर्भात आपली निरीक्षणे नोंदवते हे पाहणे रंजक ठरेल- उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान,, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील - असीम सरोदे कादेतज्ञ
- Nitish Kumar Mumbai Visit: नितीश कुमार उद्या मुंबईत घेणार उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळाचे वेधले लक्ष
- Neet Exam : धक्कादायक प्रकार; परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परिधान करायला लावले उलटे अंतर्वस्त्र
- Bus Accident In Gandhinagar : खासगी बसची एसटीला जोरदार धडक, बसची वाट पाहणाऱ्या 10 प्रवाशांवर काळाचा घाला.