ETV Bharat / state

NCP Political Crisis : शरद पवारांची 'पॉवर'; बंडानंतर पहिल्यांदाच शक्तीप्रदर्शन, पारावरून ठोकले भाषण - शरद पवार कराडमध्ये

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत (NCP Political Crisis) फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा रणशिंग फुंकले (Maharashtra Political Crisis) आहे. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. शरद पवार यांनी सोमवारी कराडमध्ये शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांनी केलेल्या बंडावंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 3, 2023, 6:01 PM IST

मुंबई/सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Political Crisis) नेते अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी रविवारी शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा (Maharashtra Political Crisis) देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतीत शरद पवार हे कराडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आहेत. शरद पवार यांनी प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

  • स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावर येऊन आज चव्हाण साहेबांना अभिवादन केले. चव्हाण साहेबांचे वैशिष्ट्य होते की सामान्य माणसांचा अधिकार जतन केला पाहिजे. या राज्यात त्यांनी नवी पिढी तयार केली. जिल्ह्याजिल्ह्यात तरूणांचा संच उभा केला. या माध्यमातून… pic.twitter.com/pkHDx1COll

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशाच्या विकासामध्ये सर्वसामान्यांचा हातभार लागला पाहिजे. त्यांनी या राज्यांमध्ये नवीन पिढी तयार केली. जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये तरुणांचा संच उभा केला. त्या माध्यमातून महाराष्ट्रातून प्रगती पथावर नेला. यशवंतराव चव्हाण आज नसले तरी त्यांचे विचार तुमच्या माझ्या मनात आहेत - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

पृथ्वीराज चव्हाणांनी केले शरद पवारांचे स्वागत - शरद पवार हे कराड येथे आले होते. त्यावेळी सातारा जिल्हा आणि परिसरातील लाखो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी कराड, सातारा येथे आले होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचे कराडमध्ये स्वागत केले.

काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोब खंबीर उभा आहे. शरद पवार हे कराडमध्ये येत असल्याने त्यांची मी स्वागत केले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करणार आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना साईडलाईन करुन अजित पवार यांना भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला आहे - पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस ज्येष्ठ नेते

शरद पवारांचे शक्तिप्रदर्शन - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच जनतेसमोर आले. शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडखोरीवर सूचक वक्तव्य करत इशारा दिला आहे. राज्यामध्ये मागील काही काळापासून जातीयवादी दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु पुढील सहा महिने, एका वर्षात सर्वांना जनतेसमोर जायचे असल्याचा टोला देखील शरद पवार यांनी लगावला. शरद पवार हे सोमवारी सकाळीच मोठ्या ताफ्यासह पुण्यावरून कराडकडे रवाना झाले होते. कराडला जात असताना शरद पवार यांचे विविध ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला उभे राहून लाखो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती
  2. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील बंडाचे ईडी कारवाई हे कारण नाही - शरद पवार
  3. Maharashtra Political Crisis : साहेबांकडे जावे की दादांकडे; आमदारांची झाली गोची, पाहा आकडेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.