ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : राजेश टोपेंसह सुनील भुसारा यांनी अजित पवारांची घेतली भेट, मनधरणी की गट बदलला? - वाय बी चव्हाण सेंटर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असलेले माजी राज्यमंत्री राजेश टोपे आणि सुनिल भुसारा यांनी रात्री उशीरा अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार यांचे आणखी दोन मोहरे अजित पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 7, 2023, 9:48 AM IST

Updated : Jul 7, 2023, 11:17 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून या काका पुतण्यात कुरघोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे किती आमदार कोणासोबत आहेत, याबाबत अजूनही संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच खंदे समर्थक म्हणून शरद पवार यांच्या गोटात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि सुनील भुसारा यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. आमदार राजेश टोपे आणि सुनील भुसारा हे अगोदरच्या दिवशी शरद पवार यांच्या सोबत होते. तर दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या भेटीसाठी गेल्याने खळबळ उडाली आहे.

रात्री उशिरा झाली भेट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे घेतलेल्या बैठकीला हजर माजी आरोग्य मंत्री, आमदार राजेश टोपे व सुनील भुसारा हे हजर होते. यावेळी त्यांनी आपण शरद पवार यांच्याच बाजुने असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी हे दोन्ही आमदार अजित पवार यांच्या भेटीला गेले. अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी या दोन्ही आमदारांनी रात्री उशिरा अजित पवार यांची भेट घेतली.

संख्याबळासाठी दोन्ही पवारांची धावाधाव : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजही मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे बंडखोर नेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असल्याचे सांगत आहेत. त्यांच्याबरोबर आमदारांचे मोठे पाठबळ असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्याकडे सध्या राष्ट्रवादीच्या 35 आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार यांच्याकडे 18 आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर झालेल्या शरद पवारांच्या पहिल्या बैठकीत उपस्थित असलेले राजेश टोपे व सुनील भुसारा हे आमदार दुसऱ्या दिवशी अजित पवार यांच्या भेटीला गेले. त्यामुळे हे दोन्ही आमदार अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची चिन्ह दिसत आहेत.

मनधरणी करण्यासाठी भेट : या बैठकीनंतर बोलताना आमदार सुनील भुसारा यांनी ते शरद पवार यांच्या सोबतच असून अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतलल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटू नये, हीच त्यांच्या सर्वांची इच्छा असून जे काही घडले, ते बरोबर नाही. परंतु आपापसातील मतभेद विसरून पुन्हा पक्ष एकजूट व्हावा यासाठी ते प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु आमदार राजेश टोपे व आमदार सुनील भुसारा यांनी अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही केली का याबाबत मौन बाळगले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी सुद्धा देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतल्याने ते सुद्धा अजित पवार यांच्या गटात प्रवेश करतात का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीत पडलेली फूट खरी; अनेक वर्षांच्या कटुतेचा हा परिणाम - पृथ्वीराज चव्हाण
  2. Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वरून रात्री उशिरा पडले बाहेर, नवीन राजकीय खलबते

Last Updated : Jul 7, 2023, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.