मुंबई : अजित पवार यांचा सरकारमध्ये सहभाग झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मंत्रीपदाचे शपथ घेणारे इतर 8 आमदारही सहभागी झाले होते. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
-
There was nothing new as such. We and Chief Minister Shinde have worked together in the cabinet. We have experience for the cabinet. Most of them were ministers in that cabinet. BJP also has some ministers, like Radhakrishna Vikhe Patil - when he was in Congress, I worked with… pic.twitter.com/I1rM4DoKu0
— ANI (@ANI) July 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">There was nothing new as such. We and Chief Minister Shinde have worked together in the cabinet. We have experience for the cabinet. Most of them were ministers in that cabinet. BJP also has some ministers, like Radhakrishna Vikhe Patil - when he was in Congress, I worked with… pic.twitter.com/I1rM4DoKu0
— ANI (@ANI) July 4, 2023There was nothing new as such. We and Chief Minister Shinde have worked together in the cabinet. We have experience for the cabinet. Most of them were ministers in that cabinet. BJP also has some ministers, like Radhakrishna Vikhe Patil - when he was in Congress, I worked with… pic.twitter.com/I1rM4DoKu0
— ANI (@ANI) July 4, 2023
'सर्व व्यवस्थित सुरू आहे' : अजित पवार म्हणाले की, 'आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे. आम्हाला मंत्रिमंडळाचा अनुभव आहे. आमच्यापैकी बहुतांश मंत्री त्या मंत्रिमंडळात होते. भाजपमध्येही काही मंत्री आहेत, जसे की राधाकृष्ण विखे पाटील. ते काँग्रेसमध्ये असताना मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे यात नवे काही नाही. सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत आहेत'.
'नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही' : बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. देशात सर्व विरोधक विस्कळीत झाले असल्याचे ते म्हणाले. अजित पवार म्हणाले की, आम्ही सर्व विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. देशाला सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. सर्व विरोधक विस्कळीत झाले आहेत'. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देश आगेकूच करत असल्याचेही अजित पवार म्हणाले.
5 जुलैला बैठक : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व खासदार, आमदार, विधान परिषदेचे सदस्य, जिल्हाप्रमुख आणि राज्य प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांनी त्यांना 5 जुलै रोजी एमईटी वांद्रे येथे उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी देखील सर्व सदस्यांना त्याच दिवशी (5 जुलै) वाय. बी. चव्हाण सभागृहात बोलावले आहे.
खातेवाटपावर चर्चा झाली : अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी अजित पवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अद्याप खातेवाटप होणे बाकी आहे. मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकांच्या शेजारी बसल्याचे दिसून आले.
ज्यांच्यावर टीका, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले : वर्षभरापूर्वी उद्धव सरकारमधून बंडखोरी करताना शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीचे मंत्री निधीचे समान वाटप करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. मात्र आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्याच मंत्र्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ शिवसेनेच्या या मंत्र्यांवर आली आहे. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबतीत झाला आहे.
हे ही वाचा :
- Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी कोणाची? खरा प्रतोद कोण? विधानसभा अध्यक्ष म्हणतात...
- Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक संपली; कट्टर विरोधक बसले शेजारी, खातेवाटपाबाबत चर्चा
- Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाने बोलवली पदाधिकाऱ्यांची बैठक, ठाकरे पवारांची साथ देणार का?