रायगड - विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात (Student Bus Accident Raigad) रायगड जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील खोपोली पुनश्च परिसरात ४८ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली आहे. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक (Students Injured in Bus Accident) आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Raigad Bus Accident) दाखल करण्यात आले आहे.
Marathi Breaking Live : विद्यार्थ्यांच्या बसला खोपोलीजवळ अपघात; अनेकांची प्रकृती चिंताजनक
22:09 December 11
विद्यार्थ्यांच्या बसला खोपोलीजवळ अपघात; अनेकांची प्रकृती चिंताजनक
21:47 December 11
मोताळा शहरात भरदिवसा घरफोडी, एक लक्ष रुपयांच्या रोख रकमेसह 6 तोळे सोन्याचे दागीने लंपास
बुलढाणा - गेल्या गत काही दिवसांपासून मोताळा शहरात चोरीचे सत्र सुरुच आहे मात्र अजुनही पोलिस प्रशासनाला चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही त्यामुळे चोरटे भरदिवसा पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून जबर चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी मोताळा येथे उघडकीस आला आहे. शहरातील चंद्रशेखर संचेती यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा डल्ला मारला असुन एक लक्ष रुपये रोख रकमेसह पाच तोळे सोन्याचे दागिने असा एकुण 4 लक्ष रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
21:47 December 11
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला - खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
लातूर : भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्याचा अर्थ महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज संघटनांनी समजून घेतला असता तर बरे झाले असते. परंतू ते समजून न घेताच चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला अन चंद्राकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. एखाद्या वरिष्ठ नेत्यावर अशा पद्धतीने शाईफेक करणे निंदणीय आहे. शाईफेक करणा-या समता सैनिकावर दाखल केलेले गुन्हे योग्य असून त्याचा पोलीस तपास करतील असे वक्तव्य नांदेडचे लोकसभेचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज (11 डिसें) लातूरात केले आहे.
20:53 December 11
अनैतिक संबंधातून वडाप व्यावसायिकाची दगडाने ठेचून हत्या, १२ तासात संशयिताला अटक
सातारा - पाटण तालुक्यातील वडाप व्यावसायिकाच्या खुनाचा १२ तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जंगलात लपून बसलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. नारायण तुकाराम मोंडे (रा. भैरेवाडी, ता. पाटण), असे संशयिताचे नाव आहे. अनैतिक संबंधातून संशयिताने गावातीलच सिताराम बबन देसाई यांची दगडाने ठेचून हत्या केली होती.
20:53 December 11
मित्राच्या वाढदिवसाला चक्क रेडा गिफ्ट
बीड - दोस्तीच्या दुनियेत राहताना आपल्या दोस्ताला खुश करण्यासाठी कोण.. कधी.. काय करेल ? याचा नेम नाही. असाच काहीसा प्रत्यय आलाय बीडमध्ये.. निमित्त होतं ते वाढदिवसाचं.. आणि या वाढदिवसाला आपल्या दोस्ताला आवडणारी भेट म्हणून, 10 मित्रांनी मिळून चक्क एक रेडा गिफ्ट केलाय.
19:17 December 11
1994 च्या दंगलीतील आरोपी 18 वर्षांपासून होता फरार; अखेर गोरेगावमधून अटक
मुंबईतील गोरेगाव परिसरातून 18 वर्षांपासून फरार असलेल्या तबरेज अझीम खान या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो 1992 च्या दंगलीतील आरोपी आहे आणि 2004 मध्ये कोर्टाने त्याला फरारी घोषित केले होते. याबाबतची माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली आहे.
19:04 December 11
हल्ला करायचा होता का निषेध; चंद्रकांत पाटलांचा सुषमा अंधारेंना सवाल
पुणे: शाईफेक प्रकरणात चंद्रकांत दादा पाटलाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनाच विचारलं की हल्ला करायचा होता का निषेध, असा प्रश्न मी सुषमा अंधारे यांना विचारला असल्याचे स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलेला आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज एकाच मंचावर आले होते पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाला आल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील माध्यम अशी बोलत होते.
19:04 December 11
'मैना' अडकली विजेच्या खांबात; अग्निशमन जवानांनी खांब कापून मैनेला काढल सुखरूप बाहेर
ठाणे : 'मैना' पक्षी उडत उडत खोपा समजून एका विजेचा खांब असलेल्या पाईपच्या मध्यभागी अडकल्याची घटना समोर आली आहे. या मैनेला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर लोखंडी खांब असलेला पाईप ग्राइंडर मशीनच्या साह्याने कापून तिला सुखरूप काढून जीवदान दिले आहे.
19:03 December 11
कोविड वॉरियर्सची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक होणार
मुंबई - मुंबईत कोरोना काळात रुग्णांवर उपचार करताना कर्मचारी कमी पडत होते. अशावेळी तात्पुरत्या स्वरूपात नर्स, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचा-यांना नियुक्त करण्यात आले. कोरोनाच्या महामारीदरम्यान सेवा देणाऱ्या १२०० कर्मचाऱ्यांना मुंबईत स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली जाणार आहे. या सर्व कोविड वॉरियर्सना स्वच्छता दूत म्हणून समाविष्ट करणार असल्याची घोषणा मुंबई महानगरपालिका आयुक्त - प्रशासक डॉ इक्बाल सिंग चहल यांनी केली आहे. त्याबाबतचे विभागाअंतर्गतचे आदेशही देण्यात आल्याचे चहल यांनी सांगितले.
19:03 December 11
महाविद्यालयीन विद्यार्थ्यास सेल्फी काढणे बेतले जिवावर
जालना- सुट्टी असल्याने खरपुडी येथे फिरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यास सेल्फी काढणे महागात पडले आहे. सेल्फी काढतांना तोल जाऊन त्याचा मोबाईल पाण्यात पडला. मोबाईल काढण्याच्या प्रयत्नात त्याचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे.अर्णव कैलाश गिरी(वय 15) असे त्याचे नाव आहे.
19:03 December 11
पन्नास हून अधिक आजारांवर होणार मोफत उपचार
मुंबई - मागील काही दिवसांपासून मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे. यामुळे मुंबईकरांना विविध आजारांनी ग्रासले आहे याच पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या मागाठाने विधानसभा क्षेत्रात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी हजेरी लावून विविध तपासण्या करून घेतल्या. नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू,ऑर्थोपेडिक, किडनी संबंधित आजार, त्वचा संबंधित आजार, हृदयविकार एन्जोप्लास्टी,एन्जिओग्राफी, स्त्रीरोग, कर्करोग चाचणी नाक,कान,घसा आणि सर्वसाधारण तपासणी बरोबरच पन्नास हून अधिक आजारांच्या या ठिकाणी तपासणी करण्यात आल्या. यातील गरजू रुग्णांवर मोफत उपचार देखील केले जाणार आहेत.
17:46 December 11
छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी होते - नाना पटोले
अकोला - लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचे नेतृत्व तसे राहावे असे वाटणे हे काही गैर नाही. कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असा शोध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यातील एका कार्यक्रमात लावला. ते जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील कुणबी समाजाच्या कार्यक्रम ठिकाणी माध्यमांशी बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले यांच्याही समाजामध्ये विपर्यास निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
17:46 December 11
सीबीआय चौकशी लावली तरी मी शरण येणार नाही - जितेंद्र आव्हाड
ठाणे - राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणूका कधी लागतील हे आतच सांगता येत नाही. विद्यमान सरकारला अनुकूल वातावरण दिसत नसल्याने निवडणुका होणार नाहीत. आणि त्याच्या बाजूने अनुकूल वातावरण निर्माण होईल अस मला वाटत नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. एकीकडे आता ठाणेकर जनता आत पर्याय शोधत असून आगामी पालिका निवडणुकीत मतविभागणी होणार असून याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचे भाकीत आव्हाडांनी केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदीवसानिनित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ठाण्यातील एनकेटी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अनेक वक्त्याकडून कार्यकर्त्यांना धडे देण्यात आले होते. त्यावेळी आव्हाडांनी वरील विधान केले.
17:23 December 11
डम्पिंग ग्राउंड बाबत दिवेकरांची फसवणूक!तातडीने डम्पिंग ग्राऊंड बंद करा,अन्यथा आंदोलन!भाजपच्या रोहिदास मुंडेंचा इशारा
ठाणे - सुमारे एक वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेची निवडणुक जवळ आली असताना, दिवा डम्पिंग बंद केले सांगता. मात्र अद्यापही दिव्यात कचरा टाकण्याचे थांबवत नाही. आजही डम्पिंग सुरूच आहे. त्यामुळे पहिल्यांदा ५ लाख दिवेकारांची फसवणूक थांबवा, तसेच आठ दिवसात डम्पिंग बंद करा, अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आणि खोटी आश्वासनप्रशासनाविरोधात आणि खोटी आश्वासन देऊन दिवा शहरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विरोधात दिवावासीयांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप दिवा शीळ मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे दिला.
17:22 December 11
मुंबईतील जी - २० बैठकीसाठी जे. जे. रुग्णालयाची २० वैद्यकीय पथके तैनात
मुंबई - देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या जी-२० परिषेदेसाठी राज्य सरकारने तयारीचा वेग वाढविला आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण १४ बैठका होणार असून त्यातील ८ बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात ४ तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. यापैकी १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत मुंबईत पहिली बैठक होत असून या बैठकीत येणाऱ्या जी - २० सदस्य देशांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी वैद्यकीय सुविधांसाठी मुंबईत जे जे रुग्णालयाच्या २० टीम तैनात करण्यात येणार आहेत.
17:22 December 11
मुंबई पालिकेचे २० दिवसांहून अधिक काळ कॅगद्वारे ऑडिट सुरूच
मुंबई - मुंबई महापालिकेकडून कोरोनासह इतर कामांवर केलेल्या खर्चाची केंद्र सरकारच्या कॅगद्वारे चौकशी करण्यात येत आहे. नोव्हेंबर पासून सुरु झालेले ऑडिटचे काम गेल्या २० दिवसातून अधिक काळ सुरु आहे. या कालावधीत पालिकेच्या कोरोना दरम्यान करण्यात आलेल्या खर्चाचे ऑडिट करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. मात्र कॅगकडून सर्वच कामांचे ऑडिट केले जात असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले आहे.
17:00 December 11
अंगावर थुंकल्याच्या वादातून दुचाकीचालकाचा भर रस्त्यात खून
ठाणे : दुचाकीचालक रस्त्याने जात असतानाच पायी जाणाऱ्या तरुणाच्या अंगावर थुंकल्याच्या वादातून दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने भर रस्त्यात दुचाकी चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरातील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. कैफ जावेद खान ( वय, १९, रा, मुंब्रा ) आहे अटक तरुणाचे नाव आहे. तर विजय पटवा (वय ५२,) असे खून झालेल्या दुचाकी चालकाचं नाव आहे.
16:58 December 11
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाहीफेक च्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
पुणे :- काल पिंपरी चिंचवड येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाही फेक करण्यात आली.या शाही फेक प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड येथील 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जी शाही फेक करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.
16:58 December 11
शिक्षण आणि आरोग्यसेवेचा सामूहिक विकास आवश्यक; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिमोग्लोबिनोपॅथी केंद्र, सिपेट इमारतीचे उद्घाटन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन पथदर्शी उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने झाले, नागपुरात ते आले असता हा सोहळा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले, नागपूरात आज 11 योजनांचे लोकार्पण होत आहे. यात चंद्रपूरातील दोन संस्थांचा समावेश आहे. सिपेटद्वारे रोजगार निर्मिती आणि हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनात नवी दिशा मिळणार आहे. शिक्षण आणि आरोग्यसेवेचा विकास हा सामुहिकरित्या होणे गरजेचे आहे. तरच वंचित घटक विकासाच्या प्रक्रियेत येऊ शकतात. चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी भारत गमावू शकत नाही. या संधीचे सोने करण्यासाठी स्थायी विकास महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्या पायाभूत सुविधा अद्यावत करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले
15:58 December 11
शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा अपघात; पायी जात असताना दिली धडक, तिघे गंभीर
ठाणे - शिर्डी येथील साईबाबा मंदिरात पायी जात असलेल्या तीन भाविकांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे तिघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
15:47 December 11
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
पुणे - शाई फेक करणाऱ्या तिघांवर राजकीय दबावापोटी 307 सारखे गंभीर कलम लावले आहे. याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत अस वकील सचिन भोसले यांनी सांगितलं आहे. तिन्ही आरोपींना आज मोरवाडी कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना पिंपरी- चिंचवडमधील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टाच्या आवारात सर्वपक्षीयांनी शाइफेक करणाऱ्या व्यक्तीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम हटवावे अशी मागणी केली.
15:35 December 11
समृद्धी महामार्गावरील पूल अचानक कसा पडला? उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
मुंबई - समृद्धी महामार्ग होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणले गेले, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण कार्यक्रमात करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आरोपांना ठाकरी शैलीत प्रत्युत्तर दिले. जनतेच्या करातून हा महामार्ग झाला आहे. २१० किलोमीटरचा मार्ग खुला करण्यासाठी योग्य असताना अचानक पूल पडला. आता हा पूल पडला की पाडला माहित नाही, असा संशय घेत एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
15:06 December 11
समृद्धी महामार्ग लोकार्पण; सिन्नरच्या शेतकऱ्यांकडून काळे झेंडे दाखवत निषेध
सिन्नर ( नाशिक ):- समृद्धी महामार्गाच्या लगत शेतकऱ्यांसाठी वहिवाट रस्ता हा वॉल कंपाऊंडच्या आत केल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीमाल ने -अन करण्यासाठी होणार नसल्याने सिन्नर तालुक्यातील दुसिंगपूर येथे शेतकऱ्यांनी व छावा संघटनेने ठिय्या करत घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवून लोकार्पण सोहळ्याचा निषेध केला
14:18 December 11
शिंदे भाजपकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू -उद्धव ठाकरे
विकासकामे एका रात्रीत होत नसतात. विकासकामे करून जनतेवर उपकार करत नाहीत. मी म्हणजे सर्वकाही अनेकांचा असा गैरसमज झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. शिंदे भाजपकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
12:28 December 11
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पोहोचले हिमाचल प्रदेशात, हे आहे कारण
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पदनाम सुखविंदर सिंग सुखू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी संजौली हेलिपॅडवर पोहोचले.
09:09 December 11
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी तीन जणांना अटक
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्या प्रकरणी तीन जणांवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर घोषणाबाजी करत शाई फेकण्यात आली होती. या प्रकरणी आता चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नाव आहेत.
08:50 December 11
चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालत्या कारमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विजय कुशवाहाविरुद्ध पीएस मांडवी, पालघर जिल्ह्यात 304 आणि 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिलेच्या 10 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. ती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे: पोलीस
08:04 December 11
काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू आज हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
काँग्रेस नेते सुखविंदर सिंग सुखू आज हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
08:04 December 11
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार
पीएम मोदी आज महाराष्ट्रात 75,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. ते आज गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही करणार आहेत.
08:03 December 11
सीबीआय आज टीआरएस आमदार कविता यांची करणार चौकशी
दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आज टीआरएस आमदार कविता यांची बंजारा हिल्स येथील निवासस्थानी चौकशी करणार आहे.
07:26 December 11
मन की बातच्या नावाने फसवणूक, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
मुंबईतील अभ्युदय वात्सल्य नावाच्या बनावट मासिकाचा मालक आलोक तिवारी नावाच्या व्यक्तीने थेट केंद्र सरकारची फसवणूक केली आहे. पंतप्रधानांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा त्याने सारांश तयार केला होता. मन की बातच्या सर्व कार्यक्रमांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2023 साली पुस्तक प्रकाशित होणार असल्याची खोटी बातमी पसरवून शेकडो लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 11 ने गुन्हा दाखल केला आहे.
06:57 December 11
पंतप्रधान आज गोव्यातील विमानतळाचे करणार उद्घाटन
पंतप्रधान मोदी आज गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
06:30 December 11
Breaking News : शिंदे भाजपकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू -उद्धव ठाकरे
मुंबई : लोणावळ्यातील कार्ल्या येथील एकवीरा देवीच्या मंदिर निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. 15 वर्षापासून मंदिराच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली नाही. मात्र मंदिराची मूळ घटनाच गहाळ झाल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली. त्यावर मंदिराची मूळ घटनाच अस्तित्वात नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून का दिले नाही? असा संतप्त सवाल खंडपीठाने उपस्थित केला आणि राज्य सरकार आणि धर्मदाय आयुक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. या याचिकावर पुढील सुनावणी 4 जानेवारी रोजी होणार आहे.