ETV Bharat / state

सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज - संजय राऊत - Priyanka Gandhi

महाराष्ट्राला 80 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. परंतु, भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Apr 22, 2021, 3:37 PM IST

मुंबई - "महाराष्ट्रामध्ये ८० हजार रेमडेसिवीरची गरज असून, महाराष्ट्राला अधिक आरोग्य सुविधा मिळाव्यात ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचणीची संख्या मोठी आहे. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिवीर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते? हा गंभीर प्रश्न आहे. भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत". सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.

'केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा'

महाराष्ट्राची 80 हजार रेमडेसिवीरची गरज आहे. केंद्र महाराष्ट्राला लस कमी का देत आहेत? राज्यातील उच्च न्यायालयाला ऑक्सिजनबाबत हस्तक्षेप करायला लागतो, हे केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. केंद्र सरकार किती ऑक्सिजन प्लँट तयार करत आहेत हे सांगावे. देशभरात अनेक राज्यात टेस्ट होत नाही, त्यामुळे कोरोनाचा आकडा कमी आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी आहे. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिवीर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते? हा गंभीर प्रश्न आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा,असेही राऊत म्हणाले.

'महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे'

गेल्या 24 तासांमध्ये देशात तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकार सर्व जबाबदारी आता राज्यांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पैसा खर्च करत आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या जीएसटी थकबाकीचे पैसे अदा करावेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

प्रियांका गांधी यांनी केलेले व्यक्तव्य हे 'देश के मन की बात'

प्रियांका गांधी म्हणाल्या, "पहिल्या आणि दुसर्‍या लाटेदरम्यान आमच्याकडे कित्येक महिने होते. या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही अगोदर तयारी केली असती. आपला देश ऑक्सिजनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे, तरीही ऑक्सिजनची कमतरता आहे. सरकारकडे 8 ते 9 महिन्यांचा कालावधी होता. सर्वेक्षण सांगत होते की दुसरी लाट येणार आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, प्रियांका गांधी यांनी केलेले व्यक्तव्य हे 'देश के मन की बात की है'. अन्य देश आपल्या देशाविषयी विचार करत आहेत मग आपण उदारवादी होत आहोत?

हेही वाचा - मुंबईत बसून अभिनेता सोनू सूदला जे जमते, ते स्थानिक नेत्यांना का नाही?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.