मुंबई महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. यावेळी सभागृह सुरु होण्याआधी सत्ताधारी विरोधक आमनेसामने आले. विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची जागा सत्ताधारी आमदारांनी काबीज केली आणि त्या नंंतर हो गोंधळ उडाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Former Chief Minister Uddhav Thackeray तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar यांच्यावर या आमदारांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला.
ठाकरे यांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांचे उत्तर कालच शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. शिंदे गटाच्या 50 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता सातत्याने आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावर टीका होत आहे. या टीकेला आज शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या आमदारांसोबत विधान भवनाच्या पायऱ्यांवर बॅनरबाजी करून उत्तर दिले. यावेळी विविध प्रकारचे बॅनर झलकविण्यात आले होते.
उध्दव ठाकरेंवर टीका कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी, युवराजांच्या चेल्यानी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहचले यांच्या घरी, अशी टीका विरोधकांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली. आता पक्ष टिकवण्यासाठी फिरतात दारोदार लढणारे गद्दार, पक्ष संपवणार यांच्यासाठी मोठे खुद्दार, खुर्चीसाठी केले हिंदुत्व हद्दपार, खुर्चीत बसल्यावर शिवसैनिक केले वेशीपर, खुर्ची गेल्यावर आता फिरतात दारोदार अशा पद्धतीचे बॅनर झळकावून व नारेबाजी केली. आता शिंदे गटाच्या आमदारांनी भाजप आमदारांना सोबत शिवसेना व राष्ट्रवादीशी दोन हात करण्याचाच इशारा दिला आहे. भ्रष्टाचाराचे खोके, मातोश्री ओके अनिल देशमुख खोके सिल्व्हर ओक ओके, लावसाचे खोके सिल्व्हर ओक ओके, बेस्टचे खोके मातोश्री ओके, अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.
मिटकरींचा आरोप विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकात बुधवारी सकाळी चांगलाच वाद रंगला. विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यावर केला. तर अशा लोकांवर कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते म्हणाले, विरोधकांनी आमची जागा हायजॅक केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अंगावर धावल्याचे चित्र होते.
अजित पवार म्हणाले पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा सत्ताधारी आमदारांच्या फार जिव्हारी लागली. त्यामुळेच सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांकडून आमच्या अंगावर धावून येण्याचा प्रकार घडला असा प्रकार लाजीरवाणा आहे. अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकारानंतर बोलताना दिली.
आवाज दाबण्याचे काम मीटकरी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमीका मांडणार होतो. परंतू सत्ताधारी आमदारांनी विरोध केला. आम्ही आंदोलन करून घोषणाबाजी करीत होतो. तेव्हा शिंदे गटातील आमदारांनी मला आम्हाला शिवीगाळ करून धक्काबुकी केली. एका अर्थाने विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी आमदारांकडून केला जात आहे. विधीमंडळाच्या इतिहासात हा लाजीरवाणा प्रकार आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
तर शिंगावर घेऊ विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आंदोलन केले. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ असे सांगत त्यांनी कोणी आमच्या नादी लागु नये असाच इशारा दिला.
महेश शिंदे म्हणाले गालबोट लावण्याचा प्रकार आमच्या आंदोलनालाला गालबोट लावण्याचा प्रकार काही जणांकडून झाला आहे. आम्ही मिडीयासमोर गैरकारभार सांगत असल्याने त्यांना ते सहन झाले नाही. महाराष्ट्राच्या विचारधारेवर पडलेला काळा डाग असा उल्लेख अमोल मिटकरीं यांच्या बाबतीत त्यांनी केला आणि अशा लोकांमुळे लोकशाहीला धोका आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली सत्य कटू असल्याने त्यांना पचले नाही. बारामतीला गेलेले आणि लुटलेले पैसै बघा असे शिंदेंनी म्हटले आहे. विरोधकांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली आम्ही केली नाही बाळेसाहेबांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक असे ही त्यांनी स्पष्ट केले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, याठिकाणी कायदे-सुव्यवस्था आपण बनवत असतो. त्यामुळे याठिकाणी अशाप्रकारे भांडणे चुकीचे आहे. धमकावणे सुरुच आहे. आज महाविकास तोडण्याचा जो प्रकार झाला तो ईडी सीबीआयचा वापर करुन झाला. विरोधकांना संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला आहे. विरोधकांचा आवाज तुम्ही थांबवू शकत नाही.
उदय सामंत म्हणाले विरोधकांनी टीका करताना विचार करुन टीका करायला हवी. अंगावर आले तर कुणीही शिंगावर घेते. सुरूवात झाली नसती तर असे झाले नसते, समोरुन बोलताना विचार केला पाहिजे त्यांचे पडसाद असे असतात. प्रवीण दरेकर म्हणाले आमच्याकडून कुणाला धमकावण्याचा प्रयत्न नाही, विरोधीपक्ष वैफल्यग्रस्त आहे.विरोधकांना केवळ राडा करायचा आहे. त्यांना केवळ नौटंकी करायची आहे. लक्ष वेधण्यासाठी विरोधकांकडून हे सर्व सुरूआहे.
हेही वाचा Hangama on steps of Maharashtra Assembly विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे आणि भाजप गटाचा राडा