मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात विधिमंडळाचे तीन दिवस कामकाज होणार आहे. संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल केलेली वादग्रस्त वक्तव्ये, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर आमदारांना मिळणाऱ्या धमकीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे.
- येत्या तीन वर्षात सौर ऊर्जेच्या माध्यमातून सतरा हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात याची माहिती दिली. यासाठी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असेही ते म्हणाले.
- महिला अत्याचारावरील प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. महाराष्ट्राने गेल्या अनेक वर्षांपासून धोरण ठरवले आहे. या धोरणानुसार महिलांच्या संदर्भात कोणतीही तक्रार आली तर ती एफ आय मध्ये नोंदवून घ्यायची आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची केवळ ओरड आहे असे ते म्हणाले. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. तिथे छप्पन हजार तक्रारी नोंदवल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. तिथे चाळीस हजार आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. राज्यात 39 हजार गुन्ह्यांची नोंद आहे. तुलनात्मक दृष्ट्या प्रति लाख व्यक्ती मागे किती गुन्हे याप्रमाणे केली जाते. त्यात महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर आहे, असे ते म्हणाले आहेत.
- शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल सभागृहात बोलू न दिल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभात्याग केला. विधान परिषदेत संभाजी भिडे यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. सभागृहाचे कामकाज ५ मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
- आपल्या राज्यात कधीही औरंगजेबाचे उद्दात्तीकरण होत नव्हते. या पाठीमागे कोण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे का? औरंगजेब या देशात कुणाचा नेता होऊ शकत नाही. एपीजे अब्दुल कलाम हे देशात नेते होऊ शकतात. महाराष्ट्र हे औद्योगिक विकास असल्याने दंगे होणे योग्य नाही. त्यामुळे औरंगजेब स्टेटसची एसआयटी चौकशी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले.
- औरंगजेब तुमचा बाप आहे, अशा घोषणा दिल्या जातात. सर तनसे जुदा है, असे म्हणत राज्यात वातावरण खराब केले जाते, असा आरोप नितेश राणे यांनी केला. यावेळी घोषणा करणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी पाकिस्तानात निघून जावे, असे राणे यांनी लक्षवेधी दरम्यान म्हटले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांच्या मास्टरमाईंडची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी राणे यांनी मागणी केली.
- हा माणूस ( संभाजी भिडे) फ्रॉड आहे. कितीतरी टनाने हा माणूस (भिडे) सोने गोळा करतो. याची चौकशी व्हावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
- राष्ट्रपित्याविरोधात कुणी बोलले तर खपून घेणार नाही. ट्विटरवर धमकी आली आहे. कोण झाले तर जबाबदार कोण, असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला शोधून तुरुंगात टाकले जाईल, असे सांगितले.
- विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भिडे गुरूजी हिंदुत्वासाठी चांगले काम करतात. पण, त्यांना महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसचे मुखपत्र शिदीरीमध्ये वीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिहिण्यात आले. वीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिहिणाऱ्या शिदोरीवर कारवाई करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भिडे गुरुजी असा उल्लेख केल्याने विरोधक आक्रमक झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना समज देत खाली बसून घेण्याची विनंती केली.
- संभाजी भिडे हा टोपणनाव बदलून मराठी मुलांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजी भिडे या माणसाने राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी कारवाई करणार असल्याचा इशारा देऊनही कारवाई केली नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
- संभाजी भिंडेंना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट- काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव असलेले पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहे. हे पत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दिले. याबाबतचे ट्विट माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
वडेट्टीवार यांची ओबीसी नेते अशी ओळख- काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी सोमवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भातील विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत. यापूर्वी त्यांनी शिवसेनेत महत्त्वाची पदे भूषविली आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून काम पाहिले होते.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यापासून विरोधी पक्षनेते पद रिक्त- अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिकामे आहे. आमदारांचे सर्वाधिक मनुष्यबळ असल्याने काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. 288 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसकडे आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 105 जागा जिंकल्या होत्या. जुनी शिवसेना (अविभक्त) 56, जुनी राष्ट्रवादी (अविभक्त) 54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. सद्यस्थितीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे.
हेही वाचा-