ETV Bharat / state

एअर इंडिया इमारतीमध्ये लवकरच सुरू होणार मंत्रालय, 1600 कोटी रुपयांना होणार खरेदी

शिंदे-फडणवीस सरकार आता मंत्रालयासाठी इमारत खरेदी करणार आहे. नरिमन पॉईंट येथे एअर इंडियाचे मुख्यालय असलेली ही इमारत राज्य सरकार १६०० कोटी रुपयांना खरेदी करणार आहे. ही इमार ऐतिहासिक अशीच आहे.

Air India purchase
एअर इंडिया इमारत खरेदी
author img

By

Published : Apr 5, 2023, 10:29 AM IST

मुंबई - मुंबापुरीत येणाऱ्या प्रत्येकाला मुंबईमधील ऐतिहासिक इमारती पाहण्याची संधी मिळते. नरिमन पॉईंट येथे असलेली एअर इंडियाचे मुख्यालय असलेली इमारत पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. दिवारसह अनेक चित्रपटांमध्येही या इमारतीमधून मुंबईतील श्रीमंतीचे दर्शन घडविले आहेत. आता याच इमारतीमधून राज्य सरकारचे कारभार चालवले जाणारे मंत्रालय सुरू करणार आहे.

इमारतीला मागील सरकारपेक्षा देण्यात येणार 1050 कोटी रुपये जादा - एअर इंडियाने ही इमारत 2 हजार कोटी रुपयांना विक्रीला काढली आहे. महाविकास आघाडी सरकारने या इमारतीसाठी 1450 कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 1600 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी विमान सेवा विभागाच्या विभागाचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सिंधिया यांची भेट घेऊन ही इमारत मंत्रालय म्हणून वापरण्यासाठी विकत देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे.

मंत्रालय म्हणून ओळखली जाणार आता ही इमारत - राज्याच्या मंत्रालयाला काही वर्षांपूर्वी आग लागली होती. या आगीनंतर ही इमारत पुनर्विकास करून नव्याने बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र मंत्रालय कुठे हलवावे हा प्रश्न सरकारला होता. आता मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेली एअर इंडियाच्या मुख्यालय असलेली इमारत राज्य सरकार खरेदी करणार आहे. या इमारतीमध्ये मंत्रालय सुरू केले जाणार आहे. त्यानंतर सध्याचे असलेल्या मंत्रालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे.

अशी आहे एअर इंडियाची इमारत - एअर इंडियाने नरिमन पॉईंट येथे 1970 मध्ये 99 वर्षाच्या भाडेतत्त्वावरती एक प्लॉट घेतला होता. या प्लॉट वरती 23 मजली इमारत बांधण्यात आली आहे. तळमजला आणि 23 मजली असलेले इमारत एअर इंडियाचे मुख्यालय म्हणून ओळखली जात होती. 2013 मध्ये एअर इंडियाने आपले मुख्यालय नवी दिल्ली येथे हलविले. त्यानंतरही तळमजल्यामध्ये एअर इंडियाचे बुकिंग ऑफिस आजही या ठिकाणी आहे. ही इमारत 4.99 लाख स्क्वेअर चौरस फूट इतकी आहे.

मुंबईची ओळख -मुंबईला स्वप्ननगरी म्हटले जाते. या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देतात. त्याचप्रमाणे मुंबईत अनेक ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग केले जाते. चित्रपटाच शूटिंग करताना मुंबईची ओळख म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट त्याचप्रमाणे एअर इंडियाच्या इमारत बहुसंख्य चित्रपटांमध्ये दाखवण्यात आली आहे. या वास्तू मुंबईच्या ओळख म्हणून चित्रपटात दिसून येतात.

इमारती खरेदीसाठी आरबीआयदेखील आहे तयार- एअर इंडियाच्या इमारतीला 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटमध्येदेखील लक्ष्य करण्यात आले. त्यावेळी बॉम्बस्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला होता. राज्य सरकारसोबतच भारतीय आयुर्विमा महामंडळ, जे एन पी टी आणि भारतीय रिझर्व बँकेनेदेखील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. राज्य सरकारने ही इमारत खरेदी केली तर मंत्रालयातील विविध विभागांचा विस्तार या इमारतीत करणे शक्य होणार आहे. तसेच मंत्र्यालयातील नागरिकांची गर्दी आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचाFadnavis Criticized Thackeray: मैं झुकेगा नही, घुसेगा साला .. देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना 'काडतूस' प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.