ETV Bharat / state

'वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षांसाठी तातडीने निर्णय घ्या' - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहेत.

Maharashtra medical edu minister asks Health Sciences University to exam decision immediately
वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षांसाठी तातडीने निर्णय घ्या - अमित देशमुख
author img

By

Published : Jun 3, 2020, 6:45 AM IST

मुंबई - कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहेत.

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणे नर्सिंग परीक्षांचा समावेश आहे. मात्र, सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पालक यांना परीक्षांबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठ काय निर्णय घेणार याबद्दल कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाने स्पष्ट भूमिका घेऊन याबाबतची अनिश्चितता तातडीने दूर करण्याचे निर्देश देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिले आहेत.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या केंद्रीय परिषदांवर अवलंबून असतो. हे खरे असले तरीही या संस्थांशी तातडीने विचारविनिमय करून परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशा सूचनाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, दुसरीकडे राज्यातील कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्या घोषणेला आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेत अशा प्रकारे परीक्षा रद्द करता येत नाहीत, त्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसारच निर्णय घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. राज्यपालांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या सूचनांमुळे राज्यातील तब्बल ८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा अंतिम परीक्षेच्या संदर्भात चिंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षेवर राज्यपालांचा पुन्हा हस्तक्षेप

हेही वाचा - Nisarga Cyclone : चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज, दोन दिवस घराबाहेर पडू नका - मुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.