ETV Bharat / state

Maharashtra Mantralaya: मंत्रालयाच्या व्हरांड्यातदेखील जाळी! अतुल लोंढे म्हणाले, ट्रिपल इंजिन अयशस्वी... - Mantralaya Guidelines

Maharashtra Mantralaya: राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश करण्यावर आता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर पारदर्शक स्टीलची जाळी (Security Net In Mantralaya) लावण्यात येत आहे.

Maharashtra Mantralaya
मंत्रालयाच्या व्हरांड्यात जाळी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 8:19 PM IST

माहिती देताना अतुल लोंढे

मुंबई : Maharashtra Mantralaya: मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांचा राज्यातील महायुती सरकारने धसका घेतला आहे. मंत्रालयात सामान्य जनतेला प्रवेश देण्यासंदर्भात अटी (Mantralaya Guidelines) घालण्यावरून विरोधक पहिलेच सरकारवर आक्रमक झाले आहे. मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून आंदोलन (Suicide Attempts In Mantralaya) करण्याचा प्रकार वाढले होते. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती. यावर उपाय म्हणून मंत्रालय प्रशासनाने युक्ती शोधली आहे. त्यामुळे संरक्षक जाळीवर उड्या मारणाऱ्या आंदोलनास आता आळा (Security Net In Mantralaya) बसणार आहे.

सरकारने शोधली युक्ती : मंत्रालयात होणाऱ्या जाळीवर उड्या मारण्याच्या प्रकारानंतर मंत्रालयाच्या व्हरांड्यातदेखील जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारुन आंदोलनाचे प्रकार सुरू झाल्यानंतर मंत्रालय प्रशासनाकडून याबाबत पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारीदेखील मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर एका तरुणाने उड्या मारून आंदोलन केले होते. त्यानंतर मंत्रालयात अशा परिस्तिथीला समोरे जाण्यासाठी उपयोजना करत अनेक महत्वाचे बदल करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्रलयात जातांना सरकार ठरवणार खिशात पैसे किती ठेवायचे : राज्यातील सामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारकडून अटी घालण्यात आल्या आहे. यावर काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रतक्रिया दिलीय. अशा प्रकारे अटी घालणे ही घटना सरकारचं अपयश दाखवणारी आहे. राज्यात हे सरकार आल्यावर जाळ्या बसवण्याची वेळ आली होती. याआधी कधी जाळ्या लावण्याची गरज पडली नाही. 'सरकार आपल्या दारी आणि जनता मात्र दारोदारी' अशी स्थिती आहे.

मंत्रालयात पैशांची देवाण घेवाण : ट्रिपल इंजिनच्या सरकारचे तिनही इंजीन फेल ठरली आहेत. त्यामुळेच आता ट्रेनच म्हणजे सरकारच बदलण्याची वेळ आली असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ता लोंढे यांनी केली आहे. तसेच मंत्रालयात प्रवेश करते वेळी किती पैसे खिशात असावेत हे सरकार सांगतंय. याचा अर्थ मंत्रालयात पैशांची देवाण घेवाण होऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे सरकारच मान्य करत असल्याचा घणाघात अतुल लोंढे यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Protest Jalna: अखेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार मनोज जरांगेची भेट! शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची फसवणूक- अतुल लोंढेंचा आरोप
  2. Congress Allegation : 'मोदींना देश चालवता येत नाही आणि तुम्हाला महाराष्ट्र'
  3. Atul Londhe On BJP : भाजप सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा वरवंटा आदिवासी बांधवांवर - अतुल लोंढे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.