ETV Bharat / state

पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर

कुपोषित बालकांच्या वर्गीकरणासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या पोषण ट्रॅकर यंत्रणेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा दावा, महिला व बाल विकास विभागाने केला आहे. अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती याद्वारे संकलन केली जाते.

मंत्रालय
मंत्रालय
author img

By

Published : Nov 11, 2021, 8:43 PM IST

मुंबई - कुपोषित बालकांच्या वर्गीकरणासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या पोषण ट्रॅकर यंत्रणेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा दावा, महिला व बाल विकास विभागाने केला आहे. अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती याद्वारे संकलन केली जाते.

महाराष्ट्र अग्रेसर

देशातील कुपोषित मुलांच्या माहितीसाठी केंद्र शासनाने ट्रॅकर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मुलांची उंची, वजनाद्वारे कुपोषित, अति तीव्र कुपोषित व सुपोषित वर्गीकरण केले जात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या होत्या. त्या दूर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने 9 मार्च ते 9 सप्टेंबर, 2021 रोजीच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंग मिटींगवेळी दोष दूर करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. महाराष्ट्र शासनाने यावेळी यंत्रणेतील त्रुटी केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानुसार केंद्र सरकारने पोषण ट्रॅकर ॲप तयार केले. या ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याच्या सूचना केल्या. संगणक प्रणालीद्वारे मुलांची माहिती गोळा केली जाऊ लागली. 10 नोव्हेंबर 2021 रोजी आकडेवारीनुसार पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तीव्र कुपोषित 6 हजार 760, अति तीव्र कुपोषित 6 हजार 526 मुलांची संख्या असल्याचे महिला व बालविकास विभागाचे म्हणणे आहे.

इतर राज्यात वापर प्रमाण कमी

इतर राज्यांनी पोषण ट्रॅक ॲपचा वापर कमी प्रमाणात केला आहे. राज्यांमध्ये कुपोषित मुलांच्या नोंदी या ॲपवर कमी प्रमाणात झाल्या आहेत. त्या राज्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी आहे हे सिद्ध होत नाही, असेही महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले.

हे ही वाचा - Fadnavis Vs Malik Allegations : 'बिगडे नवाब' म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांना मलिकांच्या मुलीचं उत्तर; म्हणाली...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.