ETV Bharat / state

Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; सीमा भागात तणाव राजकीय पक्षांची टीका जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाने ( Maharashtra Karnataka border dispute ) वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रती सरकारी बसेस कर्नाटकात जाळ्याण्यात आल्या आहेत. त्यावर जितेंद्र अव्हाड ( NCP MLA Jitendra Awad ) यांनी कर्नाटक करकार तसेच राज्यातील शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहे. बेगळगावातील मराठी माणसांच्या पाठीमागे राज्य सरकर उभे आहे असे दाखवण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.

Border Dispute
Border Dispute
author img

By

Published : Dec 7, 2022, 1:22 PM IST

Updated : Dec 7, 2022, 8:08 PM IST

मुंबई / कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि सीमा भागातील तणावाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरातून बेळगावकडे जाणारी बससेवा तात्काळ बंद ( Kolhapur to Belgaon bus stopped ) केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाचा निर्णय बस सेवा बंद केली. कर्नाटक पोलीस ( karanatak police ) महाराष्ट्राच्या बसेस बेळगाव शहराच्या हद्दीत अडवत आहेत. सकाळ पासून कोल्हापूर आगारातून फक्त दोनच बस बेळगाव कडे रवाना केल्या होत्या. त्यामुळे सीमेनजीक राहणाऱ्यादोन्ही राज्यांतील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सीमेवरील भागात तणाव : कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई यांनी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील (Karnataka and Maharashtra border disputes) काही खेड्यांवर दावा केला, त्यावर अनेक विधाने केली. त्यानंतर सांगली जिल्ह्यात कर्नाटकचे पाटाचे पाणी देखील सोडले. राज्याच्या सरकारकडून समजुतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र वातावरण काही मिटता मिटत नाही. याचा परिणाम सीमेवरील भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ह्या पार्श्वभूमीवर पोलीसांच्या सुचनेनुसार (instructions of police) महाराष्ट्र एस टी महामंडळच्या वतीने देखील बस पाठवणे (Lalpari not go to Karnataka until matter clears)स्थगित केले आहे. Border Disputes

महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला : राज्यातील राजकारण सध्या वेगवेगळ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कर्नाटक मुख्यमंत्री बोंम्मई यांच्या चिथावणीखोर विधानानंतर मविआचे मार्गदर्शक जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील कणखर भूमिका घेतली. राज्यभर कर्नाटक विरोधात निदर्शनं होताना दिसून येत आहे. पुण्यातही त्या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद चिघळला

र्नाटकाच्या बसेसला फासले काळे : महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. त्याला उत्तर देण्याची तयारी देखील महाराष्ट्र सीमा भागातील जनतेने केली आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर देखील महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा वाद दिसून आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाच्या बसेसला काळे फासले.

मराठी माणसाच्या मागे सरकार आहे का : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awad ) यांनी राज्य सरकारला आव्हान देत म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत बेळगाव मधील मराठी माणसाच्या मागे महाराष्ट्र सरकार उभे आहे का? हे राज्य सरकारने दाखवून द्यायला पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई ज्या पद्धतीने बोलतात ती, पद्धत संविधानाला धरून नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाला धक्का बसत आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकला येऊन दाखवा, असे जाहीर आव्हान कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई करता आहेत. वर्षानुवर्ष कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाचा प्रश्न सुटत नाही. यामध्ये बेळगाव, निपाणी, कारवारसह महाराष्ट्र तयार व्हावा ही मागणी जुनी आहे.

कर्नाटकने महाराष्ट्राकडे पाहू नये - मात्र आता नव्यानेच महाराष्ट्रातले काही गाव स्वतःहून कर्नाटक, गुजरातला जाण्याचा वक्तव्य करत आहेत. मुंबईसह महाराष्ट्र तयार झाला तेव्हाच निपाणी, बेळगाव, कारवार या प्रांतासाठी देखील मराठी माणूस अडून बसला असता तर, ते देखील नक्कीच मिळाले असते, अस पत्रकारांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. महाराष्ट्राकडे लाल डोळे करून कर्नाटकने पाहु नये महाराष्ट्र हा नामर्दाचा प्रदेश नाही. आम्ही सहनशील आहोत याचा अर्थ आम्ही षंढ आहोत असा होत नाही.

सरकारची ठोस भूमिका नाही: कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात असताना राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावाद प्रश्नाला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे त्यांचं काय राजकारण आहे, याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. मात्र ते चुकीचं राजकारण करत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमुळे सीमा भागातील मराठी बांधवांवर हल्ले सुरू झाले आहेत. वाहनांची तोडफोड सुरू झाली आहे. हे अत्यंत निषेधार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आणि त्या परिस्थितीत राज्य सरकार नेमके कोणते धोरण घेणार याबाबत सर्व पक्ष नेत्यांशी चर्चा केली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

खळखट्याचा इशारा : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सीमावादावर समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांची नियुक्ती केली. हे दोन्ही मंत्री कर्नाटकातील बेळगाव येथे जाऊन सीमावादावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) कार्यकर्त्यांची भेट घेणार होते. मात्र, ऐन वेळी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाण्याचा दौरा रद्द केला. तर, दुसरीकडे या सीमाभागातील गावांमध्ये तसेच बेळगावात मराठी तरुणांवर सातत्याने हल्ले होऊ लागले आहेत. या सीमावादाच्या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना खळखट्याचा इशारा दिला आहे.

Last Updated : Dec 7, 2022, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.