ETV Bharat / state

Breaking News Live : पाटण गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयिताच्या मुलाच्या फिर्यादीवरून १० जणांवर गुन्हा दाखल - भारत ब्रेकिंग न्यूज

Maharashtra India World Breaking News Live Updates
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Mar 22, 2023, 7:12 AM IST

Updated : Mar 22, 2023, 9:47 PM IST

21:46 March 22

पाटण गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयिताच्या मुलाच्या फिर्यादीवरून १० जणांवर गुन्हा दाखल

सातारा - शिवसेनेचा माजी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम याने पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम, त्याची पत्नी आणि दोन मुले, अशा चौघांना अटक केली आहे. दरम्यान, मुख्य संशयित मदन कदमचा मुलगा गौरव कदम यानेही फिर्याद दिली आहे. त्यावरून गोळीबार मृत्यू झालेल्या श्रीरंग जाधव याच्यासह १० जणांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. श्रीरंग जाधवसह अन्य ९ जणांनी मारहाण, शिवीगाळ आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचे गौरव मदन कदम याने फिर्यादीत म्हटले आहे.

20:40 March 22

अलिबाबा आणि त्यांचे 40 लोक उद्धव ठाकरेंमुळे पळून गेले

राज ठाकरे भाषण -

महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेले

शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली

निकाल लागल्यावर यांचा खेळ सुरू झाला

सहानभुतीसाठी राज्यभर कशाला फिरता

जाहीरपणे का अमित शाह यांनी अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पदाबाबत सांगितले नाही

मोदींच्या सभेत फडणवीस हे मु्ख्यमंत्री होतील हे जाहीर होत असताना उद्धव ठाकरे कुठे होते.

20:27 March 22

ऐकाला धनुष्यबाण झेपले नाही, दुसऱयाला झेपेल का नाही माहिती नाही - राज ठाकरे

शिवसेना पक्ष फक्त पाहिला नाही तर जगलो

शिवसेना पक्ष तुझा की माझा हे पाहून वेदना झाल्या

बाळासाहेब ठाकरेंना सोडून धनुष्यबाण कोणाला झेपले नाही

शिवसेना प्रमुख व्हायचे हे माझ्या मनातही नव्हते

20:20 March 22

भरधाव बोलोरोची एसटीला धडक; दोन लहान मुलींचा मृत्यू, तर 14 प्रवासी जखमी

दारव्हा : भरधाव बोलेरो कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांची प्रचंड मोडतोड झाली. तसेच बसमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन बालिका जागीच ठार झाल्या. शिवाय, एक महिला प्रवाशी गंभीर जखमी असून, 14 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. भीषण अपघाताची ही गंभीर घटना आज बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास येथील दारव्हा मार्गावरील कामठवाडा शिवारात घडली.

19:17 March 22

खासदार निधीतून बिड्या जरी वाटल्या तरी निधी कमी पडेल - रावसाहेब दानवे

जालना : आमदारांना एका विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 5 कोटी रुपये मिळतात. तर मला माझ्या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघासाठी 5 कोटी रुपये निधी मिळतो. त्यामुळे मला मिळणाऱ्या 5 कोटी रुपयांच्या सगळ्यांना बिड्या जरी घेऊन द्यायचे ठरवले तरी पुरणार नाही, असे सांगत दानवे यांनी खासदारांना मिळणाऱ्या कमी निधीवर बोट ठेवले.

18:26 March 22

भारतात सर्वप्रथम श्रेणीमध्ये आयआयटी मुंबई तर जागतिक स्तरावर 47 व्या स्थानावर

मुंबई - देशोदेशीच्या तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या उच्च शिक्षण संस्था कोणत्या पद्धतीने ज्ञान देतात आणि ज्ञानाची निर्मिती करतात या संदर्भात आयआयटी मुंबई जागतिक स्तरावर 47 व्या स्थानावर आहे तर भारतात मात्र तिचा क्रमांक पहिला आहे 2023 च्या श्रेणी अहवालानुसार शंभर पैकी 80.4 गुण आयआयटीने मिळवलेले आहे.

18:26 March 22

रमजानसाठी मुंबईतील मोहम्मद अली रोड सजला

मुंबई - रमजानच्या पवित्र महिन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील मोहम्मद अली रोड विविध दुकानांनी सजू लागला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी ही नवनवीन शक्कल लढवल्या आहेत. यंदा मोठा उत्साहात रमजान महिना साजरा केला जाईल अशा प्रतिक्रिया दुकानदार आणि ग्राहकांनी व्यक्त केल्या आहेत.

16:42 March 22

मुश्ताक नाडियाडवाला प्रकरण; पाकिस्तान सरकारने मुलांचा ठावठिकाणा अद्याप दिला नाही: केंद्राची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

मुंबई - चित्रपट निर्माते मुश्ताक नाडियाडवाला यांच्या दोन अल्पवयीन मुलांचा ठावठिकाणांबाबत पाकिस्तान सरकारकडून तपशील मागितला होता, असे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. नाडियाडवाला यांच्या पत्नीने दोन मुलांना पाकिस्तानमध्ये २०२० पासून ठेवले असल्याचा आरोप आहे. त्याबाबत पाकिस्तानकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असे केंद्राने सांगितले.

16:16 March 22

नितीन गडकरी खंडणी प्रकरण; नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगाव तुरुंगात दाखल

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगाव तुरुंगात दाखल झालेलं आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी ज्या तरूणीचे नाव पुढे आले आहे,ती मुलगी बंगलोरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे,त्यामुळे बंगलोर पोलीस तरुणीची चौकशी करत आहे. मात्र,प्राथमिक तपासात त्या तरुणीचा सहभाग दिसून येत नसल्याने अद्याप तीला ताब्यात घेण्यात आले नसल्याची माहिती नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

12:29 March 22

अमृतपाल सिंगवर कारवाईने पंजाबचे ९९ टक्के लोक आनंदी

पूर्वी काँग्रेस, शिरोमणी अकाली दल त्याला (अमृतपाल सिंग) अटक करू म्हणत होते आणि आम्हाला निरुपयोगी म्हणत होते. पण आता आम्ही कारवाई करत असताना ते वेगळे बोलत आहेत. पंजाबचे लोक पाहत आहेत आणि 99% लोक आनंदी आहेत: पंजाबचे मंत्री इंदरबीर सिंह निज्जर

12:27 March 22

'मोदी जी छुपी तोडिये', अदाणींवरून काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल

जेपीसीची स्थापना 1992 मध्ये काँग्रेस सरकार असताना करण्यात आली होती, ती वाजपेयी सरकारच्या काळात 2001 मध्ये देखील स्थापन करण्यात आली होती. हे दोन्ही शेअर बाजार घोटाळे होते. हा घोटाळा केवळ शेअर बाजारापुरता मर्यादित नाही तर तो पंतप्रधान मोदी आणि सरकारच्या धोरणांशी आणि हेतूशी संबंधित आहे. आम्ही 'अदानी जी छुपी तोडिये' म्हणत नाही आहोत. आम्ही म्हणतोय 'मोदी जी छुपी तोडिये' : काँग्रेस खासदार जयराम रमेश

12:27 March 22

बिल्किस बानो प्रकरण: ११ आरोपींना सोडण्याच्या विरोधातील याचिकेसाठी नवीन खंडपीठ

बिल्किस बानो प्रकरण: 11 दोषींच्या लवकर सुटकेच्या विरोधात याचिका ऐकण्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्यास SC सहमत आहे

12:04 March 22

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ मार्चपर्यंत मदत जाहीर करणार: कृषिमंत्री सत्तारांची घोषणा

अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ मार्चपर्यंत मदत जाहीर करणार असल्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

09:11 March 22

गुजरातमधील पॅकेजिंग कंपनीला भीषण आग

गुजरातमधील भरुच GIDC मध्ये एका पॅकेजिंग कंपनीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ५ हून अधिक गाड्या घटनास्थळी हजर आहेत

09:08 March 22

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पारंपारिक नवीन वर्षाची सुरुवात करणाऱ्या विविध सणांच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा दिल्या आणि लोकांना आनंद आणि समृद्धीची शुभेच्छा दिल्या. ट्विट करत मोदींनी लोकांना चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. प्राचीन 'विक्रम संवत' या पारंपारिक हिंदी नवीन वर्षाच्या प्रारंभाच्या दिवसासह, पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की देश प्रगतीच्या नवीन उंचीवर पोहोचेल. त्यांनी सिंधी समुदायाला चेती चंदच्या शुभेच्छा दिल्या आणि मणिपूरमध्ये खास साजरे होणाऱ्या साजिबू चेराओबाला शुभेच्छा दिल्या. गुढीपाडवा आणि नवरे निमित्त मोदींनी लोकांना शुभेच्छा दिल्या.

07:33 March 22

पंतप्रधान मोदींच्या विरोधात दिल्लीत लावले पोस्टर्स.. १०० गुन्हे दाखल, ६ जणांना अटक

दिल्ली पोलिसांनी 100 एफआयआर नोंदवले तर 06 जणांना शहरभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील आक्षेपार्ह पोस्टर्ससाठी अटक करण्यात आली. पोस्टर्समध्ये प्रिंटिंग प्रेसचा तपशील नव्हता. प्रिंटिंग प्रेस ऍक्ट आणि डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या कलमांखाली एफआयआर दाखल: स्पेशल सीपी दीपेंद्र पाठक

दिल्ली | आप कार्यालयातून बाहेर पडताच एक व्हॅनही अडवण्यात आली. काही पोस्टर्स जप्त करण्यात आले आणि अटक करण्यात आली: स्पेशल सीपी दीपेंद्र पाठक

07:27 March 22

पाकिस्तानात भूकंप.. ९ ठार तर, १०० हुन अधिक जखमी

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ६.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात खोऱ्यात किमान नऊ जण ठार झाले, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले, असे एपीच्या वृत्तात म्हटले आहे.

07:14 March 22

ठाण्यातील शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

ठाणे : ठाण्यातील शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत.

07:02 March 22

Maharashtra India World Breaking News Live Updates

मुंबई: राज्यभरात ठिकठिकाणी गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबई, डोंबिवली, नागपूर, ठाणे, नाशिक यासह विविध शहरात शोभायात्रा काढण्यात येत आहेत.

Last Updated : Mar 22, 2023, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.