ETV Bharat / state

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 'या' तारखेपासून मिळणार हॉल तिकिट - बारावी परीक्षा २०२१ हॉल तिकीट डाऊनलोड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून येत्या 23 एप्रिलपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे.

Maharashtra Board Exams 2021: hall tickets to be released from April 3
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 'या' तारखेपासून मिळणार हॉल तिकिट
author img

By

Published : Apr 2, 2021, 2:31 AM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडून येत्या 23 एप्रिलपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेचे प्रवेश पत्र 3 मार्चपासून राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मंडळाकडे संपर्क करा-
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा एप्रिल-मे २०२१ साठी सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना बारावी परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ३ एप्रिलपासून उपलब्ध करून दिले जाणार आहे. संकेतस्थळावरील कॉलेज लॉगिनमधून हे प्रवेशपत्र महाविद्यालयांना डाऊनलोड करता येणार आहे. या संदर्भात तांत्रिक अडचण उद्भवल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे आवाहन राज्य मंडळाकडून उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना करण्यात आले आहे.

महाविद्यालयांना सूचना -
परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रिंट करून द्यावयाची आहेत. प्रवेशपत्राच्या प्रिटिंगसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. तसेच प्रवेशपत्राच्या प्रिंटवर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माद्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव यासंदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायाची आहे. अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिल्या आहेत.

ऑफलाईन परीक्षा घेण्यावर शिक्षण विभाग ठाम-
राज्यात वाढत्या कोरोना प्रकोपामुळे दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत विद्यार्थी व पालकांकडून वारंवार मागणी केली जात असताना शालेय शिक्षण विभाग मात्र परीक्षा ऑफलाईन घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. याचबरोबर लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटांचा अधिक वेळ देण्यात आला आहे.

हेही वाचा - फरार हिरा व्यापारी नीरव मोदीच्या बहिण आणि मेहुण्याविरूद्ध जारी वॉरंट कोर्टाने नाकारला

हेही वाचा - महाराष्ट्रात उच्चांकी लसीकरण, ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.