ETV Bharat / state

Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन, आज घेणार राज्यपालपदाची शपथ - रमेश बैस

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. बैस आज दुपारी राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पदाची शपथ घेतील.

Governor Ramesh Bais
राज्यपाल रमेश बैस
author img

By

Published : Feb 18, 2023, 7:02 AM IST

मुंबई : महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देहरादूनला रवाना झाले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे काल मुंबईत आगमन झाले. ते आपल्या पत्नीसह मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राजभवनच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी : राज्यपालांच्या स्वागताला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्रीमती मनीषा म्हैसकर तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. रमेश बैस हे आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. संजय गंगापूरवाला जे मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती आहेत ते रमेश बैस यांना राज्यपाल पदाची शपथ देतील. शपथविधीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील इतर सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी त्रिपुरा व झारखंडचे राज्यपाल : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे राष्ट्रीय राजकारणातील मोठे नाव आहे. तसेच ते मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या राजकारणातही सक्रीय होते. त्यांना समाजकारण, संसदीय राजकारण तसेच संघटन कार्याचा पाच दशकांहून अधिक कालावधीचा अनुभव आहे. ते छत्तीसगड मधून खासदार राहिले आहेत. त्यांनी लोकसभेत रायपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. बैस यांनी आपल्या कार्यकाळात नगरसेवक पदापासून तर राज्यपाल तसेच केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या आहेत. ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही मंत्री होते. यापूर्वी २०१९ साली बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. ते २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या काळात त्रिपुराचे राज्यपाल राहिले आहेत. त्यानंतर जुलै २०२१ पासून त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना खेळाची आणि शेतीची आवड आहे.

हेही वाचा : Shivsena Party Name Symbol : शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; निकालानंतर संजय राऊत, शरद पवार, राज ठाकरे यांच्या प्रतिक्रिया, वाचा कोण काय म्हणाले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.