ETV Bharat / state

IAS Officers Transfers: राज्यातील 11 सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट; तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात 20वी बदली - maharashtra government transfers 11 ias officers

राज्यातील 11 सनदी अधिकाऱ्यांची मंगळवारी खांदेपालट करण्यात आली. खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दरम्यान झालेल्या मनुष्यहानी प्रकरणी नेमलेल्या एक सदस्यीय चौकशी समितीची जबाबदारी डॉ. नितीन करीर यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे वित्त खात्याची जबाबदारी सोपवली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी विभाग सोपवला आहे. ही तुकाराम मुंढे यांची 16 वर्षात 20वी बदली आहे. मंगळवारी या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

IAS Officers Transfers
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
author img

By

Published : May 3, 2023, 7:41 AM IST

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्याचा सपाटा सुरू झाला आहे. आज एकूण 11 सनदी अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत बदली करण्यात आली. डॉ. नितीन करीर यांच्याकडे असलेला महसुल, नोंदणी आणि स्टॅम्प विभागातून वित्त खाते दिले आहे. त्यांच्याकडे नुकतीच खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या हलगर्जीपणाच्या चौकशी समितीवर नेमणूक केली होती. तर मिलिंद म्हैस्कर यांची हवाई वाहतूक आणि राज्य उप्तादन शुल्क विभागातून आरोग्य विभागात बदली केली आहे. अतिशय शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्याकडे कृषी विभागाचा पदभार सोपवला आहे. डी. टी. वाघमारे यांना गृह विभागात बदली केली आहे. तर राधिका रस्तोगी यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग दिला आहे.

मुंबईवर फोकस : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार चाचपणी करत आहे. अधिकाऱ्यांची फौज दिमतीला घेतली जात आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजीव कुमार यांना महाट्रास्नोच्या सीईमडी म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यांच्या जागी श्रवण हर्डीकर यांचीबबदली केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर विभागाचे सह आयुक्त जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त पडू निवड केली आहे. तर छत्रपती संभाजीनगर पालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची उचलबांगडी करून नगर येथील राज्य कर विभागात सह आयुक्त म्हणून बदली केली आहे.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या : नागपूर येथील टेक्सटाईल्स कंपनीचे संचालक पी. शिवाशंकर यांची श्री साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड केली आहे. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रवारी महिन्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. राजेंद्र भोसले यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदावरून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून बदली केली आहे. तर दीपा मुधोळ-मुंडे यांची औरंगाबाद येथील सिडकोच्या मुख्य प्रशासक पदावरून बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

11 सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट : बीड जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांना पदावरून औरंगाबाद येथील सिडकोच्या (न्यू टाऊनशिप) मुख्य प्रशासकपदी बदली केली आहे.अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी सिद्धराम सालिमठ यांची निवड करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विक्रीकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि त्यापूर्वी रायगडच्या जिल्हाधिकारी होत्या.

हेही वाचा : Shivsena Activist Entered In Shinde Group: ठाकरे गटाची गळती थांबेना! आता 'या' दिग्गजाचा शिंदे गटात प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.