ETV Bharat / state

Belgaum Visit Canceled : कर्नाटकसमोर राज्य सरकारने टेकले गुडघे ; ६ डिसेंबरचा मंत्र्यांचा दौरा रद्द - मंत्री चंद्रकांत पाटील

दिवसेंदिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka dispute) प्रकरण चिघळले जात आहे. या वादावर महाराष्ट्र सरकारने समिती नेमून बेळगाव दौऱ्याचे आयोजन केले होते. परंतु, र्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असे सांगितल्याने सरकारने हा दौरा रद्द केला (Maharashtra government canceled Belgaum Visit) आहे.

Belgaum Visit Canceled
बेळगाव दौऱ्यातून माघार
author img

By

Published : Dec 5, 2022, 9:40 AM IST

मुंबई : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राला डिवचले जात असल्याने महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रकरण चिघळले आहे. कर्नाटकला जशाच तसे उत्तर देण्यासाठी सीमा प्रश्नावर समन्वयासाठी नेमलेल्या समितीने ३ डिसेंबरचा बेळगावचा दौरा दोन दिवस म्हणजे ६ डिसेंबरपर्यंत पुढे (Belgaum Visit Canceled) ढकलला. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा इशारा दिल्याने राज्य सरकारने कर्नाटकसमोर गुडघे टेकत उद्याचा बेळगाव दौरा रद्द केला आहे. दरम्यान कर्नाटक - महाराष्ट्र सीमा वाद आणखी चिघळू नये, यासाठी माघार घेतल्याचे सरकारने स्पष्ट केले. सरकारच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात (Maharashtra government canceled Belgaum Visit) आहे.

बेळगावचा दौरा : सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोट जतसह विविध ४० गांवावर दावा केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. हा वाद पेटला असतानाच कर्नाटकने जत गावात पाणी सोडून महाराष्ट्र सरकारला डीवचले. कर्नाटक सरकारच्या सततच्या भूमिकेमुळे महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला जशास तसे उत्तर देण्यासाठी समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची समिती नेमली. या समितीने शनिवारी 3 डिसेंबर रोजी बेळगावचा दौरा करण्याचे जाहीर केले. मात्र स्थानिकांच्या मागणीमुळे दोन दिवसांपूर्वी हा दौरा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले (Belgaum Visit over Maharashtra Karnataka dispute) होते.

कर्नाटकात येऊ नका : महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, यासाठी सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून दौरा रद्द करण्याची सूचना केली. सरकार दौऱ्यावर ठाम राहिल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे यात नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी बेळगावमध्ये जाणारच अशी ठाम भूमिका मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी घेतली. मात्र कर्नाटक सरकारचा दबाव वाढल्याने, दौरा रद्द करण्यात आला आहे. कर्नाटक महाराष्ट्रातील गावांवर दावा करत असताना, राज्य सरकारने कर्नाटक समोर माघार घेत, शरणागती पत्करल्याने आश्चर्य व्यक्त केले जात (Maharashtra government) आहे.

सीमा भागात बंदोबस्त : राज्यातील दोन्ही मंत्र्यांना सीमाभागात रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने कागलजवळील कोगनोळी नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य सरकारने कर्नाटक सरकारला या आक्रमक भूमिका प्रतिउत्तर देण्यासाठी विरोधकांनी सरकार दबाव वाढवला आहे. सरकारने मात्र वाद चिघळू नये, यासाठी सावध भूमिका घेतल्याचे म्हटले (Maharashtra Karnataka dispute) आहे.

गृहमंत्र्यांपुढे मांडणार गाऱ्हाणे : महाराष्ट्रातील गावांच्या बाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडून सातत्याने विधाने करून वाद निर्माण केला जातो आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार असून राज्यातील सीमा वादाचे गाऱ्हाणे मांडणार आहेत. तसेच कर्नाटक सरकारला सबुरीची भूमिका घेण्याबाबत सूचना करावे, अशी मागणी करणार असल्याचे समजते. दरम्यान, सीमा भागाचा प्रश्न वाढू नये यासाठी उद्याचा दौरा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच लवकरच सीमा भागातील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पुढील रणनीती आखली जाणार असल्याचे समजते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.