ETV Bharat / state

Maharashtra Got The First Rank Again : पोषण पंधरवड्यात महाराष्ट्र पुन्हा देशात अव्वल - सुपोषित भारत

सुपोषित भारत या संकल्पनेखाली आता पोषणाची चळवळ सर्वत्र पसरू लागली आहे. मात्र, महाराष्ट्राने सातत्याने या चळवळीत अग्रेसर राहून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नुकताच झालेल्या पोषण पंधरवड्यात महाराष्ट्राचा देशात पुन्हा एकदा पहिला क्रमांक आला आहे. महिला बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी घेतलेली मेहनत या सर्वांचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांनी व्यक्त केली आहे.

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर
author img

By

Published : Apr 5, 2022, 5:43 PM IST

मुंबई - सुपोषित भारत या संकल्पनेखाली आता पोषणाची चळवळ सर्वत्र पसरू लागली आहे. मात्र, महाराष्ट्राने सातत्याने या चळवळीत अग्रेसर राहून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नुकताच झालेल्या पोषण पंधरवड्यात महाराष्ट्राचा देशात पुन्हा एकदा पहिला क्रमांक आला आहे. महिला बाल विकास विभागाच्यावतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, अधिकारी आणि अंगणवाडी सेविकांनी घेतलेली मेहनत या सर्वांचा हा परिपाक असल्याची प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांनी व्यक्त केली आहे.

आरोग्य आणि पोषण विषयांमध्ये जागृती करून आहार आणि आरोग्य विषयक सवयींमध्ये मूलगामी बदल करण्यासाठी पोषण अभियान सर्व स्तरावर राबविले जाते. कुपोषण निर्मूलनाची वार्षिक उद्दिष्टे निश्चित करून शासनाच्या विविध विभागांमधील अभिसरण पद्धतीने ही उद्दिष्टे साध्य करण्याबाबत कार्यवाही केली जाते. महिला आणि बालविकास विभाग पोषण अभियानात नोडल विभाग म्हणून कार्य करतो. तर नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग सार्वजनिक, आरोग्य विभाग हे पोषण अभियानाचा एक भाग आहेत. समाजामध्ये आहार आणि आरोग्य विषयासंदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी, स्वच्छतेचे भान निर्माण व्हावं आणि आरोग्याची चळवळ उभी व्हावी, यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम शासनाच्यावतीने आयोजन केले जातात.

यापैकी मुख्य कार्यक्रम म्हणजे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण महिना म्हणून साजरा केला जातो, तर मार्च महिन्यात पोषण पंधरवडा साजरा केला जातो. या दोन्ही जनचळवळींमध्ये महाराष्ट्राने सातत्याने पहिला क्रमांक मिळवला आहे. यावर्षी पोषण पंधरवडा मध्ये पाण्याचे महत्त्व, ॲनिमियाबाबत जनजागृती आणि आहारामध्ये स्थानिक पदार्थांच महत्त्व या संकल्पनावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात आले होते. या उपक्रमांना लाभार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या उपक्रमांची संख्या आणि लाभार्थ्यांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. देशात पहिला क्रमांक मिळवताना महाराष्ट्राने सुमारे १ कोटी ४५ लाख ५८ हजार ६८० कार्यक्रम घेतले. तर दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. लाभार्थ्यांच्या संख्येतही महाराष्ट्र अग्रेसर असून ११३ कोटी ४६ लाख ३५ हजार ५५२ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. लाभार्थ्यांच्या संख्येबाबत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या जिल्ह्यांनी मारली बाजी - राज्यात कार्यक्रमांच्या संख्येबाबत अनुक्रमे रायगड, सातारा आणि पुणे हे जिल्हे अग्रेसर आहेत. लाभार्थ्यांच्या सहभागाबाबत अनुक्रमे रायगड, परभणी आणि सातारा या जिल्ह्यांनी क्रमांक पटकावला आहे. पोषण पंधरवडा आणि सप्टेंबर, २०२१ मध्ये साजरा करण्यात आलेल्या पोषण माह या दोन्ही कार्यक्रमांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या कार्यक्रमांच्या संख्येत आणि सहभागी लाभार्थ्यांच्या संख्येतही प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल मंत्री ठाकूर यांनी विभागाच्या सर्व अधिकारी आणि अंगणवाडी सेविकासह राज्यातील सर्व महिला, स्तनदा माता आणि गरोदर माता यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा - Uke and Anti-BJP Cases : भाजपच्या या नेत्यांविरुध्द लढल्या अ‍ॅड. सतीश उकेंनी केसेस त्यामुळेच ईडीची कारवाई झाल्याचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.