ETV Bharat / state

सर्वाधिक FIR दाखल झालेल्या राज्यांत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर, तर महिलांसंदर्भातील गुन्हे दिल्लीपेक्षा कमी - Maharashtra Crime Rate

Maharashtra Crime Rate: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दिल्लीपेक्षा महिलांवरील गुन्ह्यांची नोंद (Crimes Against Women) कमी झाली असल्याचे 'एनसीआयआरबी'च्या (NCIRB Report) आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे 'एफआयआर' दाखल होण्याचं जास्त प्रमाण उत्तर प्रदेश, त्यानंतर बिहार आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे.

Maharashtra Crime Rate
एफआयआर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 8:54 PM IST

मुंबई Maharashtra Crime Rate : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात २ हजार २९५ 'एफआयआर' दाखल झाले असल्याची माहिती 'एनसीआयआरबी'च्या आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे महिलांसाठी सुरक्षित असलेल्या मायानगरी मुंबईत दिल्लीपेक्षा महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे प्रमाण ७ हजार ९८२ ने कमी आहे. (Financial Capital of Nation)

'या' 19 महानगरांची ओळख 'क्राईम सिटी': राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये 19 मेट्रो शहरांमध्ये 12.3 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अहमदाबाद, बेंगळुरु, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, गाझियाबाद, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, कोझिकोड, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, पुणे आणि सुरत 19 महानगरांमध्ये 2022 मध्ये एकूण 48 हजार 755 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. 2021 च्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी वाढ झाली असून २०२१ मध्ये 43 हजार 414 गुन्हे दाखल झाले होते.

महिलांवरील गुन्ह्यांची वाढती आकडेवारी: महिलांवरील गुन्ह्यातील बहुतांश प्रकरणे ही पती किंवा त्याच्या नातेवाईकांद्वारे छळ केल्याप्रकरणी 32.6 टक्के गुन्हे दाखल तर त्यानंतर महिला मिसिंग आणि अपहरण प्रकरणी 19.4 टक्के गुन्हे नोंदविण्यात आले. विनयभंग आणि महिलांवर हल्ला प्रकरणी 17.9 टक्के गुन्हे आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा, 2012 पॉक्सो प्रकरणी 13.2 टक्के गुन्हे गेल्या वर्षी दाखल करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत 72.4 टक्के आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण असून 14 हजार 158 महिलां विरोधातील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 80.6 टक्के आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण असून 6 हजार 176 महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर बेंगळुरुमध्ये 74.2 टक्के आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण आहे. महिलां विरोधातील 3 हजार 924 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

राज्यनिहाय आकडे जाणून घ्या: गेल्या वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ३ हजार ४९१ 'एफआयआर' दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बिहार राज्यात 2 हजार 930, महाराष्ट्र राज्यात 2 हजार 295, मध्य प्रदेशात 1 हजार 978 आणि राजस्थान राज्यात 1 हजार 834 'एफआयआर' नोंद करण्यात आले होते. या पाचही राज्यांत 43.92 टक्के खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचा:

  1. चहापाण्यासाठी थांबलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची १८ लाखांची रोकड लांबवली
  2. मणिपूरमध्ये दहशतवाद्यांच्या दोन गटांमध्ये चकमक; तब्बल 13 ठार
  3. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; ललित पाटीलला मदत करणाऱ्या कारागृह मेडिकल ऑफिसरला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.