कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न - आमच्या भूमिकेत कोणताही बदल नाही, सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढा चालणार: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर
Breaking News : बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे केली चर्चा - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
23:01 December 06
बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे केली चर्चा
21:34 December 06
तलवारीने केक कापणे आणि बाळगणे महागात; चौघांची कारागृहात रवानगी, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचाही समावेश
ठाणे - तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे, आणि जवळ तलवारी बाळगणे राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्यासह चौघांना चांगलेच महागात पडले. या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी याचाही समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
21:33 December 06
मालाड येथील मालवणीमधून एक कोटींचे हेरॉईन मुंबई पोलिसांनी केले जप्त
मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिटने मोठी कारवाई केली आहे. मालाड येथील मालवणी परिसरातून हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. 20 वर्षीय आणि 19 वर्षीय आरोपींना अटक करण्यात आली असून हे दोघेही नालासोपारा येथील रहिवासी आहेत. या दोघां विरोधात एन डी पी एस कायदा 1985 कलम 8 क सह 21 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
19:52 December 06
किरीट सोमैया यांची अधिकाऱ्यांविरोधात साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई हायकोर्टात अवमान याचिका
मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया यांनी दापोली स्थित वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी मुंबई हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. रत्नागिरी जिल्हाधिका-यांनी न्यायालयात चुकीची माहिती देत कोर्टाची दिशाभूल केली असल्याचा याचिकेत आरोप केला आहे. कनिष्ठ न्यायालयात सरकारी अधिकारी आणि सदानंद कदम यांनी चुकीची माहिती देऊन बेकायदेशीर बांधकाम संदर्भात सत्य परिस्थिती लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. लवकरच साई रिसॉर्ट प्रकरणातील मुख्य याचिकेसह अवमान याचिकेवरही हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र 9 जानेवारीपर्यंत साई रिसॉर्टवरील कारवाई यथास्थिती ठेवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
19:41 December 06
... तर सौंदत्तीला गेलेल्या कोल्हापूरकरांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकात यावे लागेल, संभाजीराजेंचा इशारा
कोल्हापूर - कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा वाद चांगलाच चिघळला आहे. आज बेळगावजवळ महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचे पडसाद राज्यातील शहरांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली. संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, 'छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत, त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.
19:18 December 06
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद -आदित्य ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई - महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादासंदर्भात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मौनावर टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, 'एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का?'.
19:06 December 06
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावमध्ये जाताना पोलिसांनी घेतले ताब्यात
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावमध्ये आंदोलन आयोजित केले होेत. यावेळी शहरात प्रवेश करण्याची परवानगी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
18:54 December 06
अल्पवयीन मुलीचे चुंबन घेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला 5 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा
मुंबई - अल्पवयीन 8 वर्षाच्या पीडित मुलीचे चुंबन घेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या 31 वर्षीय दोषी व्यक्तीला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टाने 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2015 मधील आहे. आरोपीने पीडित मुलगीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिचे चुंबन घेतले होते. पीडित अल्पवयीन मुलीने तिथून पळ काढत घरी आले असता सर्व प्रकार आईला सांगितल्यानंतर या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. आरोपीला अटक करण्यात आले होते.
18:21 December 06
मुंबईत ऑनलाइन फसवणूक, तरुणाला घातला 50.68 लाख रुपयांचा गंडा
मुंबई - येथील एका सॉफ्टवेअर कंपनीतील 28 वर्षीय कर्मचाऱ्याला गुंतवणुकीच्या योजनेत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 50.68 लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी मंगळवारी (आज) ही माहिती दिली. या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांच्या सायबर विभागाने नुकताच गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सायबर शाखा करत आहे.
17:44 December 06
मुंबईत एक कोटी बारा लाखांचे 280 ग्राम हेरॉईन जप्त
मुंबई - अमली पदार्थ विरोधी कक्ष कांदिवली युनिटने एक कोटी बारा लाखांचे 280 ग्राम हेरॉईन जप्त केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
17:41 December 06
वातावरण निवळेपर्यन्त एसटी कर्नाटकात जाणार नाही - आयुक्त शेखर चन्ने
मुंबई - पोलिसांच्या सूचनेनुसार वातावरण निवळेपर्यन्त एसटी कर्नाटकात जाणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे. कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील दोन्ही बाजूच्या पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. आपापल्या बस सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. एस टी महामंडळाचे आयुक्त शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली.
17:29 December 06
टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील दोन आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर गुरुवारी निर्णय
टॉप्स सिक्युरिटी प्रकरणातील दोघा आरोपींच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर उच्च न्यायालयात गुरुवारी निर्णय. अर्जदार आणि ईडीतर्फे युक्तिवाद पूर्ण. प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय अमित चांडोले आणि टॉप्स सिक्युरिटीचे मराठा शशीधरन यांच्यातर्फे सी समरी अहवालाच्या आधारे दोषमुक्ततेसाठी दाद मागण्यात आली आहे. ईडी सी समरी अहवालाला आव्हान देवू शकत नसल्याचा दावा केला आहे. ईडीकडून तपास अधिकाराची सीमा ओलांडली जात असल्याचाही युक्तिवाद यामध्ये करण्यात आला. तक्रारदाराने प्रतिपत्र दाखल केले आहे. एमएमआरडीएने प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणात आमचा आक्षेप नसल्याचे सांगितले. ईडीकडून अर्जांवर तीव्र आक्षेप घेण्यात आला. सी समरी अहवालाच्या आधारे दोष मुक्ततेसाठी दावा केला जावू शकत नाही असा ईडीतर्फे दावा करण्यात आला. दोन्ही युक्तिवाद ऐकून घेत न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निकाल राखून ठेवला. या प्रकरणी न्यायालय गुरुवारच्या सुनावणीवेळी निकाल जाहीर करणार आहे.
17:11 December 06
अनिल देशमुख यांच्या CBI प्रकरणात जामीन अर्जावर सुनावणी सुरू
मुंबई - अनिल देशमुख यांच्या CBI प्रकरणात दाखल जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. देशमुख हे राज्याचे माजी गृहमंत्री आहेत. देशमुख यांना ईडी प्रकरणात यापूर्वीच जामीन मिळाला आहे. मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टाने देशमुख यांना जामीन नाकारला होता. CBI कोर्टाच्या या निर्णयाला देशमुखांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या बेंचसमोर याची सुनावणी सुरू आहे.
16:57 December 06
आर्थर रोड कारागृहात सापडले 134 ग्रॅम चरस
मुंबई - मुंबईतील आर्थर रोड कारागृहात 134 ग्रॅम चरस सापडले आहे. अर्धा डझनहून अधिक औषधी गोळ्याही सापडल्या आहेत. ही औषधे बॅरेक 11 जवळ सापडली आहेत. जिथे हाय-प्रोफाइल कैदी राहतात. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
16:39 December 06
कोरियन महिलेचा विनयभंग प्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर
मुंबई - कोरियन महिलेचा विनयभंग आणि छेडछाड प्रकरणी दोन्ही आरोपींना वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मोबिन चांद मोहम्मद (19) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (20) या दोघांची कारागृहातून सुटका करण्यात आली. दोन्ही आरोपींना प्रत्येकी 15 हजारांचा जामीन मंजूर झाला. आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर मंगळवारी खार पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दोघांनाही देण्यात आले.
15:27 December 06
मोदींनी फोन करुन केली लालू यादव यांची विचारपूस
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर बोलून राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. कालच लालू यादव यांचे किडनी ट्रान्सप्लँट करण्यात आले आहे.
14:52 December 06
चिंचवडमध्ये अगरबत्ती कारखान्याला भीषण आग
पिंपरी - चिंचवडमध्ये अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. शेजारील शाळेतील 200 विद्यार्थ्यांना त्यामुळे स्थलांतरित करण्यात आले.
14:10 December 06
जलपर्णी अंगावर परिधान करून संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
सोलापूर - शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. तलावातील जलपर्णी अंगावर परिधान करून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते महानगरपालिकेत आले. अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना जलपर्णीचे पुष्पगुच्छ त्यांनी दिले. संभाजी ब्रिगेडचे दत्ता जाधव यांनी अंगावर जलपर्णी वस्त्र धारण करून यावेळी सर्वांचे लक्ष वेधले.
14:06 December 06
संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे कार्यकर्ते कर्नाटकात आंदोलन करणार
कोल्हापूर - जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शिवसेना कार्यकर्ते कर्नाटकात जाणार आहेत. संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यकर्ते कर्नाटकात जाणार आहेत. तिथे जाऊन हे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.
14:04 December 06
भोर एसटी आगार व्यवस्थापक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
पुणे : कर्मचाऱ्याकडून ड्युटी बदल आणि रजा मंजुरीसाठी 4000 रुपयांची लाच घेताना पुण्यातील भोर एसटी आगार व्यवस्थापक आणि आगारातील चालक लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. कर्मचाऱ्याकडून 4000 रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहात पकडल आहे. त्यानंतर आगार व्यवस्थापक युवराज कदमसह चालक विजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची एका 49 वर्षीय कर्मचाऱ्याने तक्रार दिली होती.
13:59 December 06
कन्नड रक्षण वेदिकेला कुणाचा पाठिंबा आहे हे तपासा - केशव उपाध्ये
मुंबई - कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेला कुणाचा पाठिंबा आहे हे तपासा असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्याने कर्नाटकात आंदोलन होत आहे असा आरोपही त्यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. गाड्या फोडण्याच्या घटनांचा त्यांनी निषेध केला. महविकास आघाडीने १७ तारखेचा मोर्चा नैराश्यातून आयोजित के आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचा अपमान मविआने कितीवेळा केला, हे नव्याने सांगण्याची गरज नाही असे उपाध्ये म्हणाले.
13:31 December 06
शिवसेना पक्षफुटीसंदर्भातील दोन्ही गटाच्या याचिकांवर 13 जानेवारी 2023 ला सुनावणी - सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली - शिवसेना पक्षांतरासंदर्भात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 13 जानेवारी 2023 रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.
13:18 December 06
बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला
बंगळुरू - बेळगावात महाराष्ट्राच्या 5 वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. कन्नड रक्षण वेदिका ही संघटना दोन्ही राज्यातील सीमा प्रश्नावरुन आक्रमक झाली आहे.
13:10 December 06
आश्रम शाळेतील 20 विद्यार्थिनींना विषबाधा
गडचिरोली : भामरागड तालुक्यात कोठी येथील शासकीय आश्रम शाळेत 20 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालय भामरागड येते उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
13:06 December 06
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक
नवी दिल्ली: गुजरात पोलिसांनी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक केली आहे. त्यांना राजकीय सूडबुद्धी म्हणून अटक केली आहे असा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. एका ट्विटमध्ये, टीएमसीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्य दाभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी कोणत्या परिस्थितीत अटक करण्यात आली याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.
12:51 December 06
महाराष्ट्र कर्नाटक मुद्याचा निवडणुकीशी संबंध नाही
बंगळुरू - महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर कर्नाटकच्या भूमिकेचा निवडणुकीशी काहीही संबंध नव्हता, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे. हा महाराष्ट्राने बराच काळ ताणून धरलेला मुद्दा आहे. हा तणाव महाराष्ट्रामुळे निर्माण झाला आहे. सीमा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे आणि मला खात्री आहे की आम्ही कायदेशीर लढाई जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
12:36 December 06
भारताचा GDP 6.5% नाही तर 6.9%, जागतिक बँकेचा अंदाज
जागतिक बँकेने भारतातील मजबूत आर्थिक प्रक्रियेमुळे 2022-23 चा GDP अंदाज 6.5% नाही तर 6.9% वर जाईल असे स्पष्ट केले आहे. जागतिक बँकेने अशा पद्धतीने अंदाज व्यक्त केल्याने आर्थिक विश्वामध्ये समाधान व्यक्त होत आहे.
11:46 December 06
ईस्टर्न एक्सप्रेस वे जाम, वाहतूक मंदावली
ठाणे - ठाणेहून मुंबईच्या दिशेने जाणारा ईस्टर्न एक्सप्रेस वे जाम झाला आहे. दादरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोंडी झाली आहे. पर्यायी मार्गीका वापरण्यावर नागरिकांचा भर दिसत आहे. एक्सप्रेस हायवेवर गाड्यांचा वेग मंदावला आहे.
10:36 December 06
पाच दिवसांत प्रति तोळा ११०० रुपयांची वाढ
आंतरराष्ट्रीय पातळीवर दर वाढू लागल्याने गेल्या पाच दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. पाच दिवसात सोन्याचे भाव एक हजार १०० रुपयांनी वाढून ५४ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. चांदीतही दोन हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ६६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे
10:29 December 06
संविधानाचा रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर-नाना पटोले
महामानवाला अभिवादन करण्यासाठी मी येथे आलोय. आजचा दिवस राजकारणचा नाही. संविधानाचा रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर सद्यस्थितीत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
08:48 December 06
इंदू मिलमधील स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करू-देवेंद्र फडणवीस
-
बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. विचारावर चालण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. देशाची दिशा आणि दशा बदलण्याचे काम बाबासाहेबांनी केले. जगाच्या पाठीवरचे संविधान आम्हाला दिले. लोकशाही जिवंत ठेवली. यामुळे देश प्रगती करत आहे. समतेचा बंधुतेचा आणि मानवतेचा मंत्र दिला आहे. तो मौल्यवान आहे. संविधान असल्याने पंतप्रधान झालो असे मोदी ही म्हणतात. त्यांच्यासाठीही हा धर्मग्रंथ आहे. इंदू मिलमधील स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर म्हटले आहे.
08:19 December 06
इंदू मिलचे काम 2024 पर्यत तयार झाले पाहिजे, यात कुणी राजकरण करू नये- अजित पवार
मुंबई - दोन वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी दर्शनाची रांग लावली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सकाळी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
08:10 December 06
मुंबई पोलिसांकडून महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शासकीय सलामी
मुंबई पोलिसांकडून शासकीय सलामी दिली जात आहे.
08:03 December 06
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा चैत्यभूमी परिसरात पोहोचले.

07:50 December 06
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल इतर देशांच्या राष्ट्रीय सल्लागारांची घेणार भेट
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज दिल्लीत मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट घेणार आहेत.
07:50 December 06
कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर अभिनेत्री कर्स्टी अॅली यांचे निधन
कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर अभिनेत्री कर्स्टी अॅली यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी जाहीर केले. त्या 71 वर्षांच्या होत्या.
07:46 December 06
जी 20 परिषदेतून राज्याला जगासमोर प्रदर्शित करता येईल - मुख्यमंत्री
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात आज जी 20 परिषदेसंदर्भात सूचना, चर्चा आणि धोरण ठरविण्याबाबत सर्वपक्षीय आढावा घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला हजर होते. दरम्यान, जी 20 परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
07:21 December 06
कोलंबियात मोठी नैसर्गिक आपत्ती, भूस्खलनात किमान 27 जण ठार,
कोलंबियातील भूस्खलनात किमान 27 जण ठार झाले आहेत.
07:20 December 06
दक्षिण कोरियाला हरवून ब्राझील पोहोचला उपांत्यपूर्व फेरीत
ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. 16 फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाला ब्राझीलने 4-1 ने पराभूत केले.
07:19 December 06
केवळ एकसंध आणि शून्य-सहिष्णुता दृष्टिकोनच दहशतवादाला पराभूत करू शकतो
दहशतवाद त्याच्या सर्व स्वरूपातील एक जागतिक आव्हान आहे. केवळ एकसंध आणि शून्य-सहिष्णुता दृष्टिकोनच त्याला पराभूत करू शकतो, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी म्हटले आहे.
07:17 December 06
पेन्सिल व विशिष्ट रंग माध्यमातून चित्र रेखाटन करून महामानवाला अभिवादन
डॉ.भीमराव आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन. ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते. दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. शांततेच्या मार्गाने घडून आलेले हे जगातील सर्वात मोठे धर्मांतरण होते. कला शिक्षक तथा चित्रकार यांनी 6 डिसेंबर डॉ. भीमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन निमित्य फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून केलेले चित्र रेखाटन व 60 × 75 से. मी. कागदाच्या आकारामध्ये चारकोल पेन्सिल व विशिष्ट रंग माध्यमातून चित्र रेखाटन करून आपल्या कलेद्वारे त्यांना त्रिवार अभिवादन केले. अजय जिरापुरे हे से. फ. ला. हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावती येथे कला शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.
06:46 December 06
Breaking News : चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने आज सकाळी ७.४५ ते ९ या कालावधीमध्ये चैत्यभूमी (दादर) स्मारकावर शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरवर्षी हजारो अनुयायी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात.