सातारा - नगरविकास खात्याने साताऱ्यातील शिवतीर्थाच्या सुशोभिकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
Marathi Breaking Live : साताऱ्यातील शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी ८ कोटींचा निधी मंजूर - ईटीव्ही भारत ब्रेकिंग न्यूज

22:55 December 13
साताऱ्यातील शिवतीर्थाच्या सुशोभीकरणासाठी ८ कोटींचा निधी मंजूर
22:07 December 13
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली; रितेश कुमार नवे पोलीस आयुक्त
पुणे :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या बादल्या केल्या जात आहे.तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या जात आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली करण्यात आली असून रितेश कुमार आत्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे.
20:36 December 13
येऊर पर्यटन स्थळ संपुष्टात-निसर्गरम्य येऊरला काँक्रिटीकरणाची कीड आणि पहाटे पर्यंत भरते मद्यपींची जत्रा
ठाणे शहराच्या नकाशात जरी येऊर पर्यटन स्थळाच्या यादीत असले तरीही प्रत्यक्षात येऊरच्या निसर्गरम्य वातावरणातून पर्यटन संपुष्ठात आलेले आहे. येऊर या हिल स्टेशनला काँक्रिटीकरणाची कीड लागली असून ढाबे आणि विनापरवाना मद्य पुरवणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेल्सची भरमार आहे. यामुळेच या निसर्गरम्य पर्यटनस्थळ मद्यपींचा अड्डा झाल्याची तक्रार आता स्थानिक करत आहेत आहे. मात्र येऊर हिल स्टेशनवर सुरु असलेली बेकायदेशीर हॉटेल्स, ढाबे आणि मद्यपींची पहाटेपर्यंतची जत्रा सुरूच आहे.
20:36 December 13
बंद गटारात अडकून पडलेल्या 'श्वाना'ची,स्लॅब तोडून सुखरूप सुटका..
ठाणे : बंद गटारात अडकून पडललेले श्वान जीवाच्या आकांताने विव्हळत होतं, या श्वानाला अग्निशमन दलाच्या जवानांनी गटरावरील स्लॅब तोडून सुखरूप सुटका केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील त्रिशूल अपार्टमेंट लगतच्या गटारात घडली आहे. विशेष म्हणजे अर्धातास अथक प्रयत्नानंतर श्वानाला गटारातून बाहेर काढण्यात जवानांना यश आले.
20:35 December 13
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा भावपूर्ण सेंड ऑफ.. अधिकारी आणि कर्मचारी झाले भावुक
ठाणे - अनेक वर्षे आपल्या कामाचा ठळक शिक्का उमटवून आज कळवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांचे आज मुंबई येथे बंदली झाली. आजपर्यंत पोलीस खात्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या परंतु आव्हाड यांना त्यांच्या अधिकारी वर्गाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेंड ऑफ ची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या सन्मानार्थ बनवलेल्या चित्रफितीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
20:29 December 13
परीक्षेला डमी उमेदवार बसवल्याबद्दल आयकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना अटक
मुंबई - 2012-14 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला डमी उमेदवार बसवल्याबद्दल नागपूरच्या आयकर विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, याबाबतची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने दिली आहे.
19:23 December 13
फादर स्टॅन स्वामी यांच्या संगणकात आक्षेपार्ह कागदपत्रे पेरण्यात आली होती - अमेरिकन संस्था
नवी दिल्ली : एका अमेरिकन न्यायवैद्यक संस्थेच्या अहवालानुसार फादर स्टॅन स्वामी यांच्या संगणकात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे बाहेरून ठेवण्यात आली अर्थात पेरण्यात आली होती. 2020 मध्ये कथित दहशतवादी संबंधांच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. 83 वर्षीय स्वामी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे. स्वामींच्या वकिलांनी नियुक्त केलेल्या बोस्टनस्थित फॉरेन्सिक संस्थेच्या आर्सेनल कन्सल्टिंगने आपल्या निष्कर्षांमध्ये म्हटले आहे की, तथाकथित माओवादी पत्रांसह जवळपास ४४ दस्तऐवज अज्ञात सायबर हल्लेखोराने त्यांच्या संगणकात पेरली होती.
18:51 December 13
मुंबई पोलिसांनी 50 लाखांच्या हेरॉईनसह केली एकाला अटक
मुंबई - मुंबईतील मालवणी पोलिसांनी आरोपी सोहेल अहमद शेख याला 50 लाख रुपयांच्या 126 ग्रॅम हेरॉईनसह अटक केली आहे. नवीन वर्षाच्या पार्टीसाठी आरोपी राजस्थानहून मुंबईत ड्रग्जची तस्करी करत होता. एनडीपीएस कायद्यान्वये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती एपीआय साळुंखे यांनी दिली आहे.
18:20 December 13
प्रकाश आंबेडकरंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रालयात शिंदेंची भेट घेतली. मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात ही भेट असल्याची चर्चा आहे. मात्र ठाकरे यांच्या भेटीनंतर दोघे भेटत असल्याने दोघांमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
17:57 December 13
नोटिसा काय देता, मूलभूत सुविधा द्या, सोलापूर सीमाभागातील ग्रामस्थ चिडले
सोलापूर - नोटिसा काय देता, मूलभूत सुविधा द्या, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ग्रामस्थ चिडले. कर्नाटकात जाऊ म्हणणाऱ्या सबंधित गावांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये चोवीस तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
17:29 December 13
पवार धमकी प्रकरणावरुन राजेश टोपे यांचा राज्य सरकारला इशारा
जालना - शरद पवारांच्या केसालाही धक्का लागू नये, ही सरकारची जबाबदारी असल्याचा इशारा राष्ट्रावादीचे आमदार राजेश टोपे यांनी राज्य सरकारला दिलाय. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र वारंवार फोन करून पवारांना एक माथेफिरु शिव्या देत असल्याची माहिती टोपे यांनी दिली. त्यामुळे या माथेफिरुचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी टोपे यांनी केली आहे. पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही टोपे यांनी केली आहे.
16:58 December 13
नेत्यांच्या वाढदिवशी जन्मलेल्या 12 बालकांना सोन्याची अंगठी, बीएम प्रतिष्ठानचा उपक्रम
बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा काल वाढदिवस होता. त्याच निमित्ताने 12 डिसेंबर रोजी जन्म झालेल्या नवजात बालकांना बीएम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के यांच्याकडून सोन्याची अंगठी आणि मातांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. गेवराई शासकीय रुग्णालयात जन्म घेतलेल्या 12 नवजात बालकांचेही यावेळी औक्षण करण्यात आले.
16:44 December 13
शौचालयाच्या बकेटमध्ये मृत अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह दोन महिलांना अटक
बीड - शौचालयाच्या बकेटमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेसह दोन महिलांना अंबाजोगाई शहर पोलिसांनी अटक केली आहे. अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या अपघात विभागातील शौचालयात 8 दिवसापूर्वी सकाळी सफाई कर्मचाऱ्यांना बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले होते. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
16:39 December 13
किरकोळ महागाई दर गेल्या 11 महिन्यात सर्वात कमी 5.88 टक्के
नवी दिल्ली : देशात किरकोळ महागाई दर 5.88 टक्क्यांवर आला आहे. गेल्या 11 महिन्यातील हा सर्वात कमी महागाईदर आहे. येत्या काही दिवसात महागाई अजून कमी होण्याचा अंदाज आहे.
16:31 December 13
शरद पवारांना धमकी देणाऱ्यास बिहारमधून अटक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी वारंवार धमकीचे फोन करणाऱ्या एका व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अशी माहिती आज दिली. एन सोनी (45) याला मुंबई पोलिसांच्या पथकाने पाटणा येथे अटक केली. त्याला येथे आणण्यात आले आहे. गमदेवी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
15:59 December 13
होस्टेलमध्ये मुलीची आत्महत्या पित्याची चौकशीची मागणी
नांदेड - आदिवासी होस्टेलमध्ये मुलीच्या आत्महत्येवर पित्याने संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. हदगांव तालुक्यातील केदारगुडा इथल्या आश्रम शाळेत विश्रांती देशमुखे या चौथीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केली होती. वसतिगृह प्रशासनाने याबाबत कुटुंबाला कळवले होते. त्यानंतर रात्री शाळेत नातेवाईकांनी मोठी गर्दी करत आश्रम शाळेच्या व्यवस्थापनाबाबत संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केलीय.
15:55 December 13
काजू बोर्डची स्थापना करून 200 कोटीचा निधी देणार - केसरकर
मुंबई - काजू बोर्डाची स्थापना करणार असून त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. 1175 कोटी कोकणच्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. राज्यातील घोषित अघोषित शाळा आणि तुकड्यांना 20 टक्के ते 40 टक्के अनुदान मिळेल असेही ते म्हणाले.
15:52 December 13
दिल्लीतील वायू प्रदूषणापेक्षा मुंबईतील प्रदूषण जास्त
मुंबई - दिल्लीतील वायू प्रदूषणापेक्षा मुंबईतील प्रदूषण जास्त आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे असे यासंदर्भातील अहवालात दिसून आले आहे. मुंबईत काही ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाने 300 चा टप्पा ओलांडला आहे. काही ठिकाणी 345 पर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे. प्रदुषणाची ही पातळी अत्यंत खराब मानली जाते.
15:34 December 13
आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला
महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला.
15:26 December 13
कॅबिनेट बैठकीत महत्वाचे निर्णय, आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार
कॅबिनेट बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात येईल. खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालण्यात येईल. राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविण्यात येणार. गगनबावडा आणि जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय होणार आहे. शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना राबवण्यात येईल. यासह इतर निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ. कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी वाढीव दंडाची तरतूद करावी. १३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार. पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार. पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता. महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझिनेसाठी निर्गुन्हेगारीकरण करणार.
14:31 December 13
न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांचा बिल्किस बानो प्रकरणी सुनावणीस नकार
सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांनी बिल्किस बानो प्रकरणी त्यांच्यापुढे सुनावणीस नकार दिला आहे. गुजरातमधील 2002 च्या गोध्रा दंगलीत सामूहिक बलात्कार आणि कुटुंबियांची हत्या करणाऱ्या 11 दोषींच्या सुटकेला आव्हान देणारी याचिका बिल्किस बानो यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करण्यापासून स्वतःला त्यांनी बाजूला केले आहे.
13:24 December 13
आज पुण्यात कडकडीत बंद
पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी झाली. त्यासाठी आज पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील सहभागी झाले आहेत. पण बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
13:14 December 13
किमान 3 आठवड्याचे अधिवेशन घ्यावे, अजित पवार यांची मागणी
मुंबई - कोरोनामुळे दोनवर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. यासंदर्भात पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिली.
13:07 December 13
राज कुंद्रा, शर्लिन चोप्रासह पूनम पांडेला सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामिन मंजूर
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने व्यावसायिक आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, मॉडेल शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे तसेच उमेश कामत यांना अश्लील सामग्री तयार करणे आणि OTT प्लॅटफॉर्मवर दाखवल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
13:00 December 13
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 10 जानेवारीला पुढील सुनावणी
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भातील खटल्यांची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. यावेळी कोर्टाने वादी तसेच प्रतिवादींना काही सूचना केल्या. तसेच त्यासंदर्भातील निवेदन आणि अर्ज कोर्टाला करण्यास सांगितले. त्यानंतर पुढील सुनावणी 10 जानेवारीला करण्याचे नियोजन कोर्टाने केले.
12:42 December 13
नागपूर हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान होणार
मुंबई - नागपूर हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहे. आज याबाबतची घोषणा करण्यात आली. मात्र यावर विरोधक खुष नाहीत. अधिवेशन किमान 3 आठवडे व्हायला पाहिजे अशी भूमिका काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे.
12:39 December 13
दोन लोकल एकमेकांवर धडकता-धडकता थोडक्यात वाचल्या?
मुंबई - पहिल्यांदाच पश्चिम उपनगरात दोन लोकल एकमेकांवर धडकता-धडकता थोडक्यात वाचल्या. प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरावे लागले. पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मात्र दावा केला आहे की, अशी कोणतीही घटना घडलेली नाही. तांत्रिक कारणामुळे मागची लोकल त्याच ठिकाणी उभे राहिली.
12:24 December 13
शेकोटीमध्ये पडून 60 वर्षीय व्यक्तीचा जळून मृत्यू, घातपाताचा संशय
जालना - शेकोटीमध्ये पडून 60 वर्षीय व्यक्तीचा जळून मृत्यू झाला आहे. पिरसावगी फाटा जवळील राजस्थानी ढाबा येथील ही घटना आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बदनापुर तालुक्यातील जालना औरगाबाद हायवे रोडवर पिरसावंगी फाटा जवळ राजस्थानी ढाबा आहे. तेथे वॉचमन म्हणून काम करत असलेले तुकाराम सखाराम शिंदे वय 60 वर्ष हे दिनाक १ ३ डिसेंबर मंगळवार पहाटे १ ते 6 वाजेच्या दरम्यान शेकोटी पेटवून बसलेले होते. अगीत पडून त्यांचा मृत्यू झाला आहे, घटनेची माहिती मिळाल्याने बदनापुर पोलीस ठाण्याचे पो नि शिवाजी बंटेवाड, नारायण शेळके, कांबळे, शिवाजी भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालय बदनापूर येथे पाठवण्यात आला आहे. मात्र नागरीकांत अशी चर्चा आहे की, हा घातपात असल्याची शंका आहे. पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
12:19 December 13
जामिनावर सुटल्यावर निर्दोष आहे असं समजू नका - सुधीर मुनगंटीवार
मुंबई - कोर्टाला समजायला एवढा वेळ लागला का असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ते अनिल देशमुख यांच्या जामिनावर बोलत होते. काहीजण जामिनावर बाहेर आल्यावर मोठ्या बाता मारत आहेत. मात्र जामिनावर सुटल्यावर निर्दोष आहे असं समजू नका, असे संजय राऊत यांचे नाव न घेता मुनगंटवार म्हणाले. तर धमकी देणारा घाबरलेला माणूस आहे. पंतप्रधान असो किंवा शरद पवार जीव हातावर घेऊन धमक्या देणाऱ्यांना पोलीस शोधून काढतात. याप्रकरणी निश्चित पोलीस कारवाई करतील असे मुनगंटीवार म्हणाले.
12:16 December 13
नवाब मलिकांच्या जामीनावर तातडीने सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई - नवाब मलिकांच्या जामीनावर तातडीने सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकेवरील सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यानच्या काळात गरज पडल्यास सुट्टीकालीन कोर्टात दाद मागण्याची नवाब मलिकांना मुभा देण्यात आली आहे. जामीनावरील पुढील सुनावणी 6 जानेवारीला होईल. दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
12:03 December 13
3,50,000 रुपये किमतीच्या दुर्मीळ 20 स्टार बॅक कासवांची तस्करी, 1 अटकेत
मुंबई - मुंबईत PSI डॉ दीपक हिंदे यांना MHB कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्टार बॅक प्रजातीची दुर्मीळ कासव विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. याची माहिती वरिष्ठ पीआय सुधीर कुडाळकर यांना दिली असता त्यांनी तात्काळ पीएसआय डॉ दीपक हिंदे, पोलीस हवालदार घोडके, पोलीस हवालदार शिरसाट यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कारवाई करण्यात आली. गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक 4 समोर, न्यू लिंक रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई येथून 33 वर्ष वयाच्या तस्करास अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण 20 स्टार बॅक कासव जप्त करण्यात आली. त्याची एकूण किंमत अंदाजे 3,50,000 रुपये आहे. वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या कलम 9, 39, 44, 48, 48, 51 अन्वये कॉलनी पोलिस स्टेशन वि सीआर क्रमांक 1134/2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
11:57 December 13
आजच्या पुणे बंदला मनसेचा पाठिंबा नाही
पुणे - आजच्या पुणे बंदला मनसेचा पाठिंबा नाही. मनसेचा एकही कार्यकर्ता बंदमध्ये सहभागी नाही. छत्रपती शिवरायांचा सन्मान करतो पण आजचा मोर्चा राजकीय असल्याने सहभागी होणार नसल्याची भूमिका मनसेने घेतली असल्याची माहिती मिळत आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे राज ठाकरे यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा सुरू आहे.
11:39 December 13
शरद पवार यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम २९४,५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.
11:12 December 13
आमदार रोहित पवार हे बेळगावमध्ये दाखल
आमदार रोहित पवार हे बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
10:59 December 13
पुण्यातील बंदमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी
पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुणे बंद असून सकाळपासून कडकडीत पुणे बंद पाळण्यात आले आहे.पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे बंद च्या मोर्च्याला सुरुवात होणार आहे या मोर्चामध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार शिवसेना उपनेते सुषमा अंधारे उपस्थित राहणार आहेत. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले असून लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत मोर्च्यात सहभागी झाले आहेत.
10:12 December 13
राजनाथ सिंह यांनी भारत-चीन सीमेवरील स्थिती माहिती घेतली
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, सर्व्हिसेस चीफ्स संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुरक्षा परिस्थितीची माहिती दिली आहेत. सुरक्षा दलांनी अलीकडेच त्याला तवांगमध्ये दोन्ही बाजूंच्या सैन्यात झालेल्या चकमकींबद्दल अपडेट माहिती दिली आहे.
09:50 December 13
बंदुकीच्या धाकावर एका महिलेची चेन आणि मुलाचा मोबाईल हिसकावला!
गाझियाबादच्या लोणी परिसरात भरदिवसा बंदुकीच्या धाकावर एका महिलेची चेन आणि मुलाचा मोबाईल हिसकावण्यात आला.
09:34 December 13
नेते राजकारणात असल्याने चीनची हिंमत वाढली-संजय राऊत
मोदी सरकार राजकारणामध्ये गुंतले आहे. त्यामुळे चीनची दडपशाही सुरू आहे. मोदी सरकारने सीमेकडे लक्ष द्यावे. नेते राजकारणात असल्याने चीनची हिंमत वाढली. तवांगचा मुद्दा संसदेत उपस्थित करू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
09:23 December 13
खासदार काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
खासदार काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान मोदींना मारावे, असे त्यांनी वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
08:00 December 13
एफटीएक्सचे संस्थापक सॅम्युअल बँकमन-फ्राइडला बहामासमध्ये अटक
एफटीएक्सचे संस्थापक सॅम्युअल बँकमन-फ्राइड याला अमेरिकन सरकारच्या विनंतीवरून बहामासमध्ये अटक करण्यात आली आहे.
07:58 December 13
चीनचे सैनिक अधिक जखमी झाले- अरुणाचल-पूर्वच्या खासदाराचा दावा
अरुणाचल-पूर्वचे भाजप खासदार, तापीर गाओ म्हणाले, की मी ऐकले की काही भारतीय सैनिक जखमी झाले आहेत. पण चीनचे सैनिक अधिक जखमी झाले आहेत. सीमेवरून भारतीय सैनिक एक इंचही हलणार नाही. ही घटना निषेधार्ह आहेत.
07:56 December 13
हैदराबादमध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विक्री रॅकेटचा पर्दाफाश
रचकोंडा पोलिसांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विक्री रॅकेटचा पर्दाफाश करून दोन तस्करांना अटक केली. 8.5 किलो स्यूडोफेड्रिन (अमली पदार्थ नियंत्रण पदार्थ), रोख रक्कम आणि 9 कोटी रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली.
07:12 December 13
चिनी सैन्यावर विश्वास ठेवता येत नाही-संरक्षण तज्ज्ञ
चिनी सैन्यावर विश्वास ठेवता येत नाही, गस्तीच्या ठिकाणांना नियंत्रण रेषा बनवायला हवे, असे संरक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.
07:11 December 13
इस्लामिक स्टेटने काबुलमधील हल्ल्याची स्वीकारली जबाबदारी
इस्लामिक स्टेटने चिनी नागरिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मध्य काबुलमधील हॉटेलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
07:10 December 13
जगातील सर्वाधिक जीवाश्म इंधन वापरणाऱ्या देशात भारताचा समावेश-नितीन गडकरी
संपूर्ण जग कार्बन न्यूट्रॅलिटीकडे वाटचाल करत आहे. जोपर्यंत भारतीय परिस्थितीचा संबंध आहे, आपण जगातील सर्वाधिक जीवाश्म इंधन वापरणारा देश आहोत. आर्थिक दृष्टिकोनातून, हे मोठे आव्हान आहे आणि प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून ही मोठी समस्या असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
06:11 December 13
Breaking News : G२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे
मुंबई - G२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. या निमित्ताने देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईमध्ये G20 परिषदेच्या निमित्ताने १३ते १६ डिसेंबर कालावधीमध्ये पहिली बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी जगभरातून या परिषदेचे सदस्य येणार असून त्यांच्या स्वागतासाठी मुंबई शहर सजलेले असताना हे सदस्य मुंबईतील बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंह सफारीचा आनंद सुद्धा घेणार आहेत.