मुंबई : राज्यात 14 मार्च रोजी 155 रुग्णांची नोंद झाली आहे. 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 68 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 662 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 38 हजार 653 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी 79 लाख 89 हजार 565 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 426 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11 मार्चला 114 तर आज 12 मार्चला 101, 10 मार्चला 93, 9 मार्चला 90, 7 मार्चला 80 तर 3 मार्चला 66 रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईत 36 रुग्णांची नोंद : मुंबईत 14 मार्च रोजी 36 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 144 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 55 हजार 601 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 11 लाख 35 हजार 710 रुग्ण बरे झाले आहेत, तर 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 11 मार्चला 25 रुग्ण, 12 मार्चला 19 रुग्ण, 10 मार्चला 21 रुग्ण, 9 मार्चला 18 रुग्ण तर 2 मार्चला 18 रुग्णांची नोंद झाली होती.
रुग्णालयातील बेड रिक्त : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये सध्या विविध रुग्णालयात 4351 खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी 6 खाटांवर रुग्ण दाखल आहेत. सध्या रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करण्याची गरज कोरोना रुग्णांना भासत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास स्टँडबाय वर असलेली कोविड सेंटर सुरू करून तेथे रुग्णांवरती उपचार केले जातील, अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सध्या राज्यात H3N2 चे रुग्ण देखील वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची चिंता अधिकच वाढल्याची दिसून येत आहे.