ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी 48 हजार नवे रुग्ण; 52 बाधितांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 21, 2022, 9:49 PM IST

Updated : Jan 21, 2022, 11:16 PM IST

राज्यात कोरोनाची 48 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. पैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 42 हजार 391 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के इतके आहे. सक्रिय रुग्ण मात्र वाढत असून आज दोन लाख 64 हजार रुग्णांची नोंद आहे. ( Maharashtra Corona Update on 21 January 2022 )

Maharashtra Corona Update on 21 January 2022
राज्यात शुक्रवारी 48 हजार नवे रुग्ण; 52 बाधितांचा मृत्यू

मुंबई - राज्यात कोरोनाची 48 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. पैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ( Maharashtra Corona Update on 21 January 2022 ) तर 42 हजार 391 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के इतके आहे. ( Corona Positivity Rate in Maharashtra ) सक्रिय रुग्ण मात्र वाढत असून आज दोन लाख 64 हजार रुग्णांची नोंद आहे. तर 144 ओमायक्रोन रुग्णांची नोंद झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ( Maharashtra Heath Department )

राज्यात मागील चार दिवसांपासून दिवसागणिक 40 हजार रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत 69 लाख 67 हजार 432 रुग्ण सापडले आहेत. 48 हजार 270 रुग्णांची यात आज भर पडली आहे. त्यामुळे आजपर्यंतची संख्या 74 लाख 20 हजार 27 इतकी झाली आहे. तर 1 लाख 42 हजार 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात आजच्या 52 मृतांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर 1.91% एवढा आहे. तर 42 हजार 391 इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत 70 लाख 9 हजार 823 करोना बाधित बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 94.47% एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 29 लाख 51 हजार 286 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 74 लाख 20 हजार 27 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 87 हजार 593 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 68 हजार 388 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रोनचे 144 रुग्ण

राज्यात आज ओमायक्रोनचे 144 नव्या बाधितांची नोंद झाली. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने 80 तर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने 64 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळने तपासले आहेत. पुण्यातील 125, सोलापूर 8, पुणे ग्रामीण 6 तर परभणी, जळगाव, मुंबई, रायगड, सातारा आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत 2 हजार 343 एवढे रुग्ण आहेत.

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 3 लाख 4 हजार 746 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 95 हजार 335 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 574 आणि इतर देशातील 666, अशा एकूण 1240 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 5674 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 74 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा - Proposal of Reopen Colleges : महाविद्यालयं सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर - मंत्री उदय सामंत

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 5008
ठाणे - 377
ठाणे मनपा - 920
नवी मुंबई पालिका - 1238
कल्याण डोबिवली पालिका - 425
मीरा भाईंदर - 226
वसई विरार पालिका - 219
नाशिक - 871
नाशिक पालिका - 1866
अहमदनगर - 905
अहमदनगर पालिका - 315
पुणे - 3052
पुणे पालिका - 8464
पिंपरी चिंचवड पालिका - 4943
सातारा - 1559
नागपूर मनपा - 3659

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण

पुणे मनपा- 989
मुंबई - 688
पिंपरी चिंचवड - 118
नागपूर - 116
पुणे ग्रामीण - 62
सांगली - 59
मीरा भाईंदर - 52
सांगली - 59
मीरा-भाईंदर - 54
ठाणे मनपा - 50
अमरावती - 25
औरंगाबाद - 20
कोल्हापूर - 19
पनवेल - 18
सातारा - 15
नवी मुंबई - 13
उस्मानाबाद, अकोला, कल्याण डोंबिवली - 11
सोलापूर - 10
वसई - विरार - 7
बुलढाणा - 6
भिवंडी मनपा - 5
अहमदनगर, नाशिक - 4
नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, परभणी आणि लातूर - 3 प्रत्येकी
गडचिरोली, नंदुरबार, जळगाव आणि रायगड - 2 प्रत्येकी
भंडारा, बीड आणि वर्धा - प्रत्येकी 1
इतर राज्य - 1

Last Updated : Jan 21, 2022, 11:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.