ETV Bharat / state

MAHA CORONA : राज्यात एका दिवसात १,२३० रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २३,४०१वर..

Corona Update
कोरोना अपडेट
author img

By

Published : May 11, 2020, 10:24 AM IST

Updated : May 11, 2020, 9:46 PM IST

21:43 May 11

राज्यात एका दिवसात १,२३० रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २३,४०१वर..

मुंबई - राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १,२३० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २३,४०१वर पोहोचली आहे. तसेच, राज्यात आज झालेल्या ३६ मृत्यूंनंतर एकूण कोरोना बळींची संख्या ८६८वर पोहोचली आहे.

20:26 May 11

मुंबईत आज 791 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 14355

20:20 May 11

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 176, तर 23 रुग्ण कोरोनामुक्त

19:30 May 11

सोलापुरात आज 11 जण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण आकडा 275

18:59 May 11

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2, तर 314 जण संस्थात्मक अलगीकरणात

18:57 May 11

अकोल्यात आणखी 5 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अकोला - दिवसेंदिवस अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. आज (सोमवार) आणखी कोरोनाचे 5 रुग्ण सापडले आहेत. तर एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 159 वर पोहोचली आहे.

17:51 May 11

कल्याण-डोंबिवलीत नवीन 23 कोरोनाबाधितांची नोंद; रुग्णांमध्ये एक महिन्याच्या बालिकेचा समावेश, एकूण रुग्णांची संख्या 344

14:39 May 11

corona virus : मुंबईत 2 हजार 646 कंटेनमेंट झोन, प्रतिबंधित क्षेत्राची 13 दिवसात तिप्पटीने वाढ

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. रोज कोरोनाची लागण झालेले शेकडो रुग्ण आढळून येत असल्याने कंटेनमेंट झोनच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सध्या 2 हजार 646 कंटेनमेंट झोन असून गेल्या 12 ते 13 दिवसात या झोनच्या संख्येत तिप्पटीहून अधिक वाढ झाल्याचे पालिकेने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

14:38 May 11

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३६ जण कोरोनामुक्त; १४ रुग्णांवर उपचार सुरू

अहमदनगर - जिल्ह्यातील नेवासा येथील एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन सोमवारी घरी परतला आहे. बूथ हॉस्पिटलमधून या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. तसेच सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ आहे. १४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

11:12 May 11

धक्कादायक...राज्यात आतापर्यंत 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाची लागण; 106 पोलिस अधिकारी, तर 901 पोलिसांचा समावेश

10:38 May 11

औरंगाबादेत १० वर्षाच्या मुलाची कोरोनावर मात, गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

औरंगाबाद - शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे देखील होत आहेत. दौलताबाद येथील कोरोनाची लागण झालेला 10 वर्षीय मुलगा बरा होऊन घरी परतला. यावेळी त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.

10:38 May 11

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर दहा जणांना डिस्चार्ज

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दिवसभरात दोन जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भोसरी येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १६९ पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या करोनामुक्त व्यक्तींची संख्या १०७ वर पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आत्तापर्यंत ४ जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.

10:05 May 11

अकोल्यात आणखी 7 जणांना कोरोना, एकूण संख्या १५४ वर

अकोला - रविवारी दिवसभरात सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे १७२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १६५ अहवाल निगेटिव्ह तर 7 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या १५४ झाली आहे.

10:04 May 11

सोलापुरात कोरोनाचा कहर : एकाच दिवशी 48 रुग्णांची वाढ, बाधितांची संख्या 264 वर

सोलापूर - सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 264 वर पोहोचली आहे. रविवारी तब्बल 48 पॉझिटिव्ह नवे रूग्ण एका दिवसात आढळून आले आहेत. तर मृतांची संख्या 14 आहे. आत्तापर्यंत एकूण 3 हजार 124 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील 2 हजार 972 अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 2 हजार 708 निगेटिव्ह तर 264 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

10:02 May 11

नवी मुंबईत कोरोना कहर सुरूच... 82 रुग्णांची वाढ, संख्या 674 पार

नवी मुंबई- नवी मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असून, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी नवी मुंबईत 82 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आतापर्यत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत रविवारी झालेली वाढ सर्वाधिक आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्यामुळेनवी मुंबई महानगरपालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

10:02 May 11

औरंगाबादमध्ये आज आणखी 58 कोरोनाग्रस्तांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 616

09:55 May 11

राज्यात आतापर्यंत 1 हजार 7 पोलिसांना कोरोनाची लागण; 106 पोलिस अधिकारी, तर 901 पोलिसांचा समावेश

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १७१ झाली आहे. रविवारी १ हजार २७८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ३९९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ४ हजार १९९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Last Updated : May 11, 2020, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.