ETV Bharat / state

Maharashtra Corona Update: राज्यात 177 नवीन कोरोना रूग्णांची नोंद, एकाचा मृत्यू - सक्रिय कोरोना रूग्ण

महाराष्ट्रात सोमवारी 177 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली. एका दिवसापूर्वी 425 नवीन रूग्ण नोंदवले होते. रुग्णसंख्या कमी झाली आहे.

Maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : May 2, 2023, 9:58 AM IST

मुंबई : सोमवारपर्यंत राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 3932 आहे, असे आरोग्य विभागाच्या निवेदनात म्हटले आहे. सोलापूर जिल्ह्यात कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,48,515 वर पोहोचली आहे. मुंबईत सोमवारी 61 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात रविवारी 425 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईतील 105 रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 81,66,068 वर पोहोचली आहे.

सक्रिय कोरोना रूग्ण : 1 जानेवारी 2023 पासून कोरोनामुळे 97 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 73.2 टक्के मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये झाले आहेत. मृतांपैकी 88 टक्के लोकांमध्ये कॉमोरबिडीटी होती. 12 टक्क्यांमध्ये कोणत्याही प्रकारची कॉमोरबिडीटी नव्हती, असे निवेदनात म्हटले आहे. नाशिकमध्ये 11 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. नाशिकमध्ये सोमवारी 22 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 4,83,023 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 8,904 वर कायम आहे, असे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या 11 ने वाढून 4,74,046 वर पोहोचली आहे. जिल्ह्य़ात 73 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत, असे ते म्हणाले आहेत.

कोरोना रूग्ण : 30 एप्रिलला एकाही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही. एकूण कोरोना रूग्णांची संख्या 1,48,514 वर राहिली, असे आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले होते. रविवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रविवारी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 5,31,533 झाली होती. त्यात 25 मृत्यू झाले होते. ज्यात केरळमध्ये नऊ जणांचा समावेश होता. दिल्लीमध्ये कोरोना रूग्णांची संख्य 20,38,317 वर पोहोचली. मृतांची संख्या 26,627 वर गेली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी 9,300 हून अधिक कोरोनाव्हायरसचे रूग्ण नोंदवले गेले होते. एकूण कोरोना रूग्णांची संख्या 57,410 वर पोहोचली होती.

हेही वाचा : Heatstroke and Corona Deaths : राज्यात कोरोना वाढ अन् उष्माघात एकाचवेळी; मृत्यूचा आकडा शंभरी पार...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.